scorecardresearch

मुंबईत आयकर विभागाच्या बॅंकेत काम करण्याची मोठी संधी; ‘या’ पदासांठी भरती, आजच अर्ज करा

निवड झालेल्या पात्र उमेदवारांच्या नोकरीचे मुंबई असणार आहे.

The Income Tax Department
भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Photo :www.incometaxbank.co.in )

Income Tax Bank Recruitment 2023: आयकर विभाग को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Income Tax Department Co-Operative Bank) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२३ आहे. तर या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊया.

‘या’ पदासाठी होणार भरती –

आयकर विभाग को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत एक्सिक्युटीव्ह ऑफिसर आणि क्लर्क या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

एकूण पदे – ११

  • एक्सिक्युटीव्ह ऑफिसर –
  • क्लर्क – ८

शैक्षणिक पात्रता –

हेही वाचा- SBI Recruitment 2023: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना बॅंकेत नोकरीची मोठी संधी; पगार व अर्जाची पद्धत जाणून घ्या

एक्सिक्युटीव्ह ऑफिसर पदासाठी ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेला तसेच MS-CIT आणि ३ वर्षे ऑफिसर पदावरील बँकेतील अनुभव आवश्यक आहे.

क्लर्क पदासाठी ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT गरजेचं.

या भरतीबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठी https://www.incometaxbank.co.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

हेही वाचा- महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधील सरकारी रुग्णालयात ५ हजार जागांसाठी मेगाभरती; सविस्तर माहिती जाणून घ्या

वयोमर्यादा –

एक्सिक्युटीव्ह ऑफिसर – २१ ते ३५ वर्षे

क्लर्क – २१ ते ३० वर्षे

अर्ज शुल्क –

एक्सिक्युटीव्ह ऑफिसर – १०० रुपये

क्लर्क – ८०० रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>

महत्वाच्या तारखा-

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १३ मार्च २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०२३

भरतीची जाहीरात पाहण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या https://drive.google.com/file/d/1Z_5vOeqd4yP0VCbOeYFEOGb23ndbGskN/view

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 17:15 IST

संबंधित बातम्या