CBI Officer Recruitment: भारताच्या सर्वोच्च तपास संस्थेला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) म्हणतात. सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभाग याबाबत तुम्ही अनेकदा पेपरमध्ये वाचले असेल, वृत्तवाहिन्यांवर ऐकले असेल. सीबीआय ही भारत सरकारची मुख्य संस्था आहे जे गुन्हेगार आणि राष्‍ट्रीय सुरक्षेसंबधीत तपासापासून ते भिन्न-भिन्‍न प्रकारच्‍या घटनांची तपासणी करण्‍याचे काम करतात. भारत सरकारचे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय त्यांच्या कामकाजाची जबाबदारी घेते. भारतात, सीबीआय अधिकाऱ्यांच्या नोकरीमध्ये हाय-प्रोफाइल प्रकरणे हातळण्याचे काम असते.

तुम्हालाही सीबीआय अधिकारी व्हायची इच्छा आहे का? पण कसे? तुम्हाला याबाबत काहीच माहिती नसेल तर काळजी करु नका, आम्ही तुमची मदत करणार आहोत.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये काम करण्यासाठी, तुम्हाला स्पर्धा परिक्षेची तयारी करावी लागेल. केंद्रीय अन्वेषण विभागाद्नारे पात्र उमेदवाराची भरती करण्यासाठी, विभागीय स्पर्धा परीक्षा, कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) घेतली जाणारी संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा आणि युपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षा या तीन पद्धती आहेत.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या 7 शाखा आहेत. प्रत्येक शाखा एका विशिष्ट प्रकारच्या तपासावर लक्ष केंद्रित करते.

  • १. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)
  • २. विशेष गुन्हे विभाग
  • ३. आर्थिक गुन्हे विभाग
  • ४. धोरण आणि इंटरपोल सहकार्य विभाग
  • ५. प्रशासकीय व्यवस्थापन विभाग
  • ६. अभियोजन विभाग संचालनालय
  • ७. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा विभाग

भारतीय केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे सदस्य होणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. या उच्चभ्रू संस्थेसाठी निवड होण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये भरतीचे मार्ग:

SSC CGLपरीक्षेद्वारे सीबीआय उपनिरीक्षक (SI)) भरती –

SSCच्या CGL भरती परीक्षेद्वारे, २० ते ३० वयोगटातील अर्जदार केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) पदासाठी अर्ज करू शकतात. CBI मधील उपनिरीक्षक (SI) साठी किमान शैक्षणिक आवश्यकता ही एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा कोणत्याही शाखेतील समकक्ष पदवीधर असणे ही आहे. तर, २० ते ३० वयोगटातील पदवीधर या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

पदाचे नाव –

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये उपनिरीक्षक (SI in CBI)

अधिकृत वेबसाइट –

ssc.nic.in

वर्गीकरण –

गट “बी”

वेतन –

रु.४४९०० ते १४२४००रु. ४६०० ग्रेड पेसह

वयोमर्यादा-

20 ते 30 वर्षांच्या दरम्यान आवश्यक

शैक्षणिक पात्रता-

मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
अभिनेता, अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत करियर करायचं? जाणून घ्या मानधन आणि संभाव्य करियरच्या संधी

UPSC नागरी सेवा परीक्षा (IPS) द्वारे सीबीआय अधिकारी भरती :

सीबीआय अधिकाऱ्यांसाठी (गट अ) भरती UPSC नागरी सेवा परीक्षाद्वारे केली जाते. आयएएस(IS), आयपीएस(IPS), आयएफएस(IFS) आणि इतर संलग्न सेवा या नागरी सेवांपैकी आहेत ज्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग भरती करते. UPSC नागरी सेवा परीक्षा उतीर्ण होण्यासाठी तीन टप्पे आहेत. UPSC प्रिलिम्स, UPSC मुख्य, आणि व्यक्तिमत्व चाचणी किंवा UPSC मुलाखत.

पदाचे नाव –

सीबीआय अधिकारी (गट अ)

अधिकृत वेबसाइट-

upsc.gov.in

वर्गीकरण –

गट ‘अ’

वेतन –

रु. ५६१००

वयोमर्यादा –

उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे

शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी धारण केलेली असावी.

केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची ही एक विलक्षण संधी असेल, जिथे तुम्हाला चांगला पगार आणि इतर भत्ते असलेले प्रतिष्ठित सरकारी पद मिळेल.