नितीन निगडे
कला आणि तंत्रज्ञान या दोहोंचे संपूर्ण एकत्रीकरण असलेले प्रभावी माध्यम म्हणजे ॲनिमेशन आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी १२वी नंतर बऱ्याच प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. बी.एस.सी., बी. डेस (B.Des.) किंवा अन्य डिप्लोमा कोर्सेसच्या आधारे उडी-मॉडेलिंग, स्टोरीबोर्डीग तसेच व्हीएफएक्स (V.F.X.) शिकणे सहज शक्य आहे. आणि उत्तम अर्थार्जन करण्यासाठी फिल्म्म, गेमिंग, जाहिरात अशा क्षेत्रांत अणि नव्याने बदल होत असलेल्या शिक्षण क्षेत्रात ॲनिमेटर, व्हिज्युअल इफेक्टस आर्टिस्ट म्हणून नोकऱ्या उपलब्ध आहेत.
ॲनिमेशन क्षेत्रात येण्यासाठी विविध कोर्सेस, त्यामधील करिअरच्या संधी, कामाची क्षेत्रे आणि आवश्यक असणारी कौशल्ये पुढीलप्रमाणे आहेत.
- ॲनिमेशन कोर्सेसमध्ये बारावी नंतर विद्यार्थी ॲनिमेशन क्षेत्रासाठीचे पदवी किंवा डिप्लोमा करू शकतात.
- पदवी कोर्सेस मध्ये साधारणतः तीन ते चार वर्षांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बीएसई इन ॲनिमेशन, बीए इन ॲनिमेशन, बी.डेस. (बॅचलर ऑफ डिझाइन) इन ॲनिमेशन.
- तांत्रिक कौशल्यावर भर देणारे एक ते दोन वर्षाये डिप्लोमा/सर्टीफिकेट कोर्सेस हे खासगी संस्थांमधून करता येऊ शकतात.
- कटोरी बोर्डीग, कॅरेक्टर डिझाईन, ३डी मॉडेलिंग, व्ही.एफ. एक्स., मोशन ग्राफिक्स आणि एडिटिंग या महत्त्वाच्या बाबी अनिमेशन कोर्सेस मधे शिकवल्या जातात.
यामधे करिअरच्या संधींचा विचार केल्यास खालील पदे ॲनिमेशनमधील पदवीनंतर उपलब्ध होतात.
ॲनिमेटर – 2D, 3D कॅरॅक्टर्सना जिवंत केल्याचा आभास निर्माण करणे.
3D मॉडेलर – गेम किंवा फिल्मसाठी 3D वस्तू किंवा एखादे पात्र निर्माण करणे.
व्हीएफएक्स कलाकार – सिनेमातील घटनांमध्ये आवश्यक ते विशेष परिणाम (इफेक्ट्स) जोडणे
स्टोरी बोर्ड आर्टिस्ट – कथेतील दृश्यांचे रेखाचित्रांमधे (त्यातील सातत्य विचारात घेऊन) रुपांतर करणे.
गेम डिझायनर – व्हिडीओ गेम्ससाठी डिझाइन तयार करणे.
तसेच प्री-ॲक्च्युअल आणि पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस विचारात घेतल्यास त्यातही विविध पदे ही आपल्या निर्मितीक्षम गुणवत्तेनुसार प्राप्त करता येऊ शकतात.
ॲनिमेशनमधील कामाची क्षेत्रे म्हणजेच (उद्योगातील वाव) पुढीलप्रमाणे –
चित्रपट आणि टी. व्ही. मालिका
गेमिंग इंडस्ट्री
जाहिरात एजन्सी
ई-लर्निंग कंपन्या
ॲनिमेशनसाठी आवश्यक कौशल्ये –
कलात्मक दृष्टी
सॉफ्टवेअरचे ज्ञान (MAYA, BLENDER, ADOBE PREMIRE, AFTER FEECTS.
कल्पकता आणि संयम
यावरून एकंदर असे दिसून येते की या क्षेत्रात अंगीभूत कलाकौशल्य सिद्ध केल्यास सुरुवातीलाच चांगले अर्थार्जन करता येणे शक्य आहे. तसेच अनुभवानंतर या क्षेत्रात करिअरचा आलेख हा उंचावणारा आहे. तांत्रिक ज्ञान आणि उत्तम कलात्मक कौशल्य याची सांगड घातल्यास या क्षेत्रात यश हे निश्चित स्वरूपाचे असे आहे.
ॲनिमेशनसाठी आणि व्हीएफएक्ससाठी आवश्यक असणारी कलाकौशल्ये पुढीलप्रमाणे आहेत.
रेखाटन आणि रेखाचित्र कौशल्य : तुम्ही उत्तम चित्रकार असण्यापेक्षा मूलभूत ड्रॉईंग ज्यामध्ये आकार आणि प्रमाण यांची योग्य समज असणे खूपच गरजेचे आहे.
लाईफ ड्रॉईंग : मानवी शरीराची प्रमाणबद्ध रचना आणि देहबोलीतून होणारे हावभाव समजव्यासाठी हे कौशल्य अत्यावश्यक आहे.
जेस्चर ड्रॉईंग : कोणत्याही शारीरीक हालचाली आणि त्याचे पोझिंग अचूकपणे रेखाटनातून टिपता येणे. तितकेच गरजेचे आहे.
निरीक्षण क्षमता : वास्तविक जीवनातील सभोवतालच्या हालचाली, छाया-प्रकाश, वस्तूंचे विविध पोत यांचे सघोळ निरिक्षण करणे. उदा. चालणे, धावणे, वस्तू पडणे, इ. हालचाली प्रत्यक्षात जशा होतात त्या-प्रमाणे वास्तव असल्याचे ॲनिमेशन मधून दाखवणे.
कल्पकता आणि सर्जनशीलता : ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स हे क्षेत्र पूर्णतः कल्पकतेवर आधारित असणारे क्षेत्र असून त्यातील पाले, त्या पात्रांचे जग आणि कथा ही सर्जनशील असावी.”
रंग सिद्धांत आणि रचना : दृश्यातीत्र वातावरणाचे योग्य परिणाम दाबविण्यासाठी रंग संयोजन आणि त्याची मांडणी यांची उत्तम समज असणे हे तितकेच गरजेचे आहे, ज्यामुळे वातावरणातील भावविष्यत्ती यांचे योग्य प्रकटीकरण करता येते.
दृश्य मांडणी : कम्पोझिशन किंवा दृश्य संयोजन हे त्यातील वस्तूंची योग्य तिथे मांडणी करून मगच करावेत
हालचालीवरील शास्त्राधारीत ॲनिमेशनची तत्त्वे नीट अभ्यासणे, ज्यामधे शरीराच्या अथवा वस्तूच्या आकारातील कथेच्या गरजेनुसार करावे लागणारे विस्तार आणि आकुंचन यांचा ॲनिमेशन करताना अवलंब करावा. तसेच सॉलिड ड्रॉइंग आणि टायमिंग याचाही विचार करून प्रत्येक फ्रेमला न्याय देणे गरजेचे आहे.
3D मा डेनिंग आणि शिल्पकला : डिजिटल क्लेच्या सहाय्याने त्रिमितीय आभासात्मक पात्र रचना करणे.
स्टोरीबोर्डीग आणि दृश्य कथाकथन यामधे संपूर्ण कथेचे सिनेमॅटोग्राफीच्या अनुषंगाने चित्ररूपात रूपांतर करणे.
ॲनिमेट होणाऱ्या प्रत्येक पात्राचे संपूर्ण देहबोलीसाठी पूरक असे हावभाव भाणि भावनांचे समर्थक प्रकटीकरण हे योग्य अभिनय कौशल्यातून मांडणे गरजेचे आहे.
व्हीएफएक्स प्रक्रियेमधे प्रत्येक तपशील हा लक्षपूर्वक साकारलेला असावा. रिअल तसेच डिजिटल भाग एकत्र करताना सूक्ष्मपणे प्रत्येक पिक्सलवर बारकाईने काम करावे. उदा. प्रकाश किती प्रमाणात परावर्तित होत आहे आणि कोणत्या पृष्ठभागांवर होत आहे. तसेच केसांची होणारी हालचाल.
संपूर्ण ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स प्रक्रिया सादर करण्यास टीमसोबत काम करण्याची, कामासंबंधीच्या प्रतिक्रिया स्वीकारण्याची आणि विविध कल्पना साकार करण्याची क्षमता असणे आवश्यक.
तसे पाहिल्यास यासाठी लागणारी तंत्र साधने ही पूर्णपणे मानवी कौशल्य, निरीक्षण, आणि कल्पकता यावर आधारली आहेत. याशिवाय सतत नवीन तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात खूप बदल देखील होत असतात. यासाठी सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची मानसिकता असणे हा ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स मध्ये यशस्वी होण्याचा खरा गुरुमंत्र आहे.
(लेखक अर्कचित्र, इलस्ट्रेटर, ॲनिमेटर आहेत. NMIMS च्या ॲनिमेशन कॉलेजचे ते प्रमुख आहेत.)
