How To build confidence for a Job Interview : अनेकदा नोकरीच्या संधी येतात पण मुलाखतीच्या वेळी आत्मविश्वास कमी असल्यामुळे आलेली संधी आपण गमावून बसतो. त्यामुळे मुलाखतीच्या वेळी कधीही आत्मविश्वास कमी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.आज आम्ही तुम्हाला अशा दहा गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला मुलाखतीत कधीही अपयश येणार नाही. जाणून घेऊ या सविस्तर.

मुलाखतीच्या वेळी कोणता पोशाख निवडता, हे महत्त्वाचं आहे

मुलाखतीच्या वेळी आपण कोणता पोशाख निवडतो, हे खूप महत्त्वाचे आहे. दिसण्यापलीकडे आपला पोशाख हा आपल्याला आरामदायी वाटला पाहिजे ज्यामुळे आपण आत्मविश्वासाने संवादावर लक्ष केंद्रित करू शकतो.

तुमचा रेझ्युमे आणि पोर्टफोलिओ मुलाखतीला जाताना बरोबर ठेवा

मुलाखतीला जाताना तुमचा रेझ्युमे आणि पोर्टफोलिओ आणणे ही कोणत्याही प्रकारची औपचारिकता नाही तर यामागे महत्त्वाचा उद्देश आहे. तुम्ही किती कार्यक्षम आहात, हे त्यावरून लक्षात येते. रेझ्युमे आणि पोर्टफोलिओ जर बरोबर असेल तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता.

मुलाखती दरम्यान कम्फर्ट झोन सोडा

कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणे खूप जास्त गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोन सोडता, तेव्हा तुम्ही भीतीवर मात करू शकता आणि तुमचा आत्मविश्वास चांगल्याप्रकारे वाढवू शकता. यावरून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत काम करण्यास सक्षम असल्याचे दाखवू शकता.

तुमच्या सामर्थ्याकडे लक्ष केंद्रित करा

मुलाखतीत यश मिळवायचे असेल तर तुमच्या सामर्थ्याकडे लक्ष द्या. तुमच्या चांगल्या किंवा सकारात्मक गोष्टींचा उल्लेख करा. तुम्ही केलेले मोठे बदल, चांगले काम आणि अनुभवाविषयी बोला. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

हेही वाचा : Success story: IIT मधून घेतलं शिक्षण; नोकरी नाकारून बनला उद्योजक; वाचा करोडोंची कंपनी उभारणाऱ्या ‘या’ हुश्शार विद्यार्थ्याची यशोगाथा

मुलाखतीचा सराव करा

मुलाखतीपूर्वी एखाद्या विश्वासू मित्राबरोबर मुलाखतीचा सराव करा. यामुळे तुम्हाला मुलाखतीच्या वेळी तणाव येणार नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मुलाखतीला सामोरे जाऊ शकता.

मुलाखतीला चांगला प्रतिसाद द्या

मुलाखतीच्या वेळी हावभावातून विचारलेल्या प्रश्नांना चांगला प्रतिसाद द्या. यामुळे तुमची ऐकून घेण्याची क्षमता दिसून येते. त्यासाठी संवाद कौशल्यावर भर द्या. मुलाखतीदरम्यान सर्व प्रश्नांची उत्तरे ही सकारात्मक द्या.

मुलाखतीला जाण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या

मुलाखतीपूर्वी ४, ७, ८ ही श्वास घेण्याची टेक्निकचा वापर करा. यामुळे मुलाखती दरम्यान तुम्हाला तणाव जाणवणार नाही.

स्वत: ला वेळ द्या

संयम हा अतिशय चांगला गुण आहे. स्प्रेडशीट आणि चेकलिस्ट टूल्सचा वापर करून तुम्ही ध्येय प्राप्तीसाठी वेळमर्यादा ठरवू शकता.

नकारात्मकता दूर करा

स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करायता असेल तर स्वत:मध्ये असणारे नकारात्मक विचार आणि शंका दूर करणे आवश्यक आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती करायची असेल सकात्मक मानसिकता जोपासा.

प्रश्न तयार करा

मुलाखतकारांना चांगले प्रश्न विचारून तुमची उत्सुकता दाखवा. कंपनीविषयी तुमची उत्सुकता पाहून तुमचे ज्ञान आणि काम करण्याची तुमची आवड दिसून येते. हा सकारात्मक दृष्टिकोन मुलाखतीमध्ये फायदेशीर ठरू शकतो.