HPCL recruitment 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक अशा अनेक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष या सर्व आवश्यक गोष्टींची माहिती पाहा. तसेच या नोकरीसाठी अर्ज कसा करावा व अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख काय हेदेखील जाणून घ्या.

HPCL recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

विविध इंजिनियर [engineering] पदासाठी एकूण १४८ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

विविध वरिष्ठ अधिकारी [senior officer] पदासाठी एकूण २४ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

विविध व्यवस्थापक [manager] पदासाठी एकूण पाच रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त चार्टर्ड अकाउंटंट, क्वॉलिटी कंट्रोल अधिकारी, आयएस अधिकारी या पदांसाठी मिळून ६० रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण २४७ रिक्त पदांवर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

HPCL recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेची अचूक माहिती ही नोकरीच्या अधिसूचनेत दिलेली आहे. नोकरीच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती वाचावी.

हेही वाचा : BAVMC Pune Recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची मोठी संधी! पाहा भरतीची अधिक माहिती…

HPCL recruitment 2024 – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाइट लिंक –
https://www.hindustanpetroleum.com/

HPCL recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.hindustanpetroleum.com/doc

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि अचूक माहिती ही नोकरीच्या अर्जात भरणे अनिवार्य आहे.
अर्ज अर्धवट असल्यास वा अर्जात चुकीची माहिती भरल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा आणि अर्ज शुल्कासंबंधी माहिती ही नोकरीच्या अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्जासह उमेदवारांनी आवश्यक असल्यास आपली कागदपत्रे जोडावीत.
नोकरीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना आणि अर्ज वाचून आणि समजून मगच पुढे पाठवावा.
उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे.
नोकरीची अंतिम तारीख ही ३० जून २०२४ अशी आहे.

वरील सर्व पदांसंबंधी अधिक माहिती घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचनेची लिंक वर नमूद करण्यात आली आहे.