Maharashtra Board Result Website List : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा घेण्यात आली. आज निकालाची प्रतीक्षा लवकरचं संपणार आहे. कारण बारावी बोर्डाचा निकाल २ मे २०२६ रोजी लागणार आहे. १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ५० हजार विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल खालील अधिकृत वेबसाईट्सवर शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल. यासाठी विद्यार्थी कोण-कोणत्या वेबसाई्ट्सवर हा निकाल पाहू शकतात जाणून घेऊ…

बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईट्स लिंक ( List of Websites to Check Maharashtra Board HSC Result 2026)

१) mahahsscboard.in
२) hscresult.mkcl.org
३) sscboardpune.in
४) sscresult.mkcl.org
५) https://results.digilocker.gov.in/

या वेबसाईट्सववर आपला निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२६ अधिकृतपणे जाहीर झाल्यावर तो कसा तपासायचा? (How to check Maharashtra HSC Result 2026)

१) महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.
२) HSC result link या लिंकवर क्लिक करा.
३) आता तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव एंटर करा.
४) सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर View Result वर क्लिक करा.
५) आता गुणपत्रिका डाऊनलोड करा आणि ती सेव्ह करा.

SMS द्वारे निकाल पाहण्याची प्रक्रिया काय? (Steps to Get Maharashtra Board CLass 12 2026 Result via SMS)

MHSSC असे टाईप करा आणि 5776 या क्रमांकावर SMS पाठवा

डिजीलॉकरद्वारे निकाल पाहण्याची पद्धत ( (How to check HSC Board Result 2026 In Digilocker )

डिजीलॉकरमध्ये लॉग इन करा .
महाराष्ट्र बोर्ड विभाग निवडा.
गुणपत्रिका पाहण्यासाठी सीट क्रमांक प्रविष्ट करा.

बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण गरजेचे? (HSC Result 2026 How Many Marks Required In Maharashtra)

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेडदेखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार ७५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. तर ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. तसेच ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३५ पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना किमान गुणही मिळू शकले नाहीत, त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.