IBPS RRB PO Clerk Recruitment 2023 Begins: आयबीएसद्वारे पीओ क्लार्क भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईट ibps.in भेट देऊन ०१ जून ते २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. याआधी बुधवारी, ३१ मे रोजी २०२३-२४ वर्षासाठी आयबीएस क्लार्क पीओ परिक्षेची अधिसुचना CRP RRB -XI बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती.

IBPS RRB Recruitment 2023: ८६०० जागांसाठी होणार भरती

या भरती प्रक्रियेंतर्गत देशभरातील असलेल्या ग्रामीण बँकेच्या ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/पीओ ( असिस्टंट मॅनजेर) आणि ऑफिसर स्केल २ (मॅनेजर) आणि ऑफिस स्केल ३ (सिनियर मॅनेजर) पदासाठी साधारण ८६१२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. सीआपी आरआरबी १२वी परिक्षा सामान्य भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आयोजित केली जाईल.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
scuffle in JNU
Video: JNU मध्ये पुन्हा राडा; अभाविप व डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, निवडणुकीचं वातावरण तापलं!
Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
Pimpri-Chinchwad mnc
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वादग्रस्त निर्णय : एका बँकेत ९८४ कोटी अडकल्यानंतरही ठेवी पुन्हा खासगी बँकेत

हेही वाचा – WFH साठी मनमानी चालणार नाही, महिन्यातून १२ दिवस ऑफिसला या अन्यथा…; TCS ने कर्मचाऱ्यांना पाठवलेला मेमो चर्चेत

IBPS RRB Recruitment 2023:पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता

  • ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल १ या पदासाठी पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असावी.
  • ऑफिसर स्केल २ जनरल बँकिंग ऑफिसर, ऑफिसर स्केल ३या पदासाठी पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह तो उतीर्ण असवा. बँकिंग, वित्त (फायनान्स), विपणन (मार्केटिंग), कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखाशास्त्र या विषयांतील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • ऑफिसर स्केल-२ या पदासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर) या पदासाठी यामध्ये वेगवेगळ्या स्पेशलायझेशनसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.

अर्ज शुल्क

ऑफिसर स्केल १, २ आणि ३ आणि ऑफिस असिस्टंट या पदांसाठी इतर सर्वांसाठी ₹ ८५०/- आणि एसी/ एसटी/ पीडब्यबीडीउमेदवारांसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.

IBPS RRB Recruitment 2023: परिक्षेबाबत माहिती

ऑफिस असिस्टंट (लिपिक) आणि ऑफिसर स्केल १ (PO) पदांसाठी परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. पण, ऑफिसर स्केल २ आणि ३ साठी एकच परीक्षा असेल. बँकेने आपल्या परीक्षा कॅलेंडरमध्ये ०५, ०६, १२, १३ आणि १९ ऑगस्ट २०२३ रोजी IBPS RRB लिपिक परीक्षा आणि IBPS RRB PO परीक्षा शेड्यूल केली आहे. IBPS RRB ऑफिसर स्केल २ आणि ३ ची परीक्षा १० सप्टेंबर २०२३ रोजी घेतली जाईल. त्याच प्रक्रियेअंतर्गत, गट “ए” – अधिकारी (स्केल-१, २ आणि ३) च्या भरतीसाठी नोडल प्रादेशिक ग्रामीणद्वारे मुलाखती घेतल्या जातील. बँका नाबार्ड आणि IBPS च्या मदतीने नोव्हेंबर 2023 पर्यंत आयोजित केले जातील.

हेही वाचा – दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे समजत नाहीये? हे आहेत १० पर्याय, मिळू शकतो चांगला पगार

अधिकृत अधिसुचना – https://www.ibps.in/wp-content/uploads/Final_Ad_CRP_RRB_XII.pdf

IBPS RRB Recruitment 2023 भरतीची तपशीवार माहिती

पदाचे नाव आणि रिक्त जागा

  • क्लार्क – ५५३८ पदे
  • पीओ -२४८५ पदे
  • अधिकारी स्केल-द्वितीय सामान्य बँकिंग अधिकारी -३३२ पदे
  • अधिकारी स्केल २ आईटी-६८ पदे
  • अधिकारी स्केल २ सीए – २१ पदे
  • अधिकारी स्केल २ कायदा अधिकारी- २४ पदे
  • ट्रेझरी ऑफिसर स्केल २ – ८ पदे
  • मार्केटिंग ऑफिसर स्केल २- ३ पदे
  • कृषि अधिकारी स्केल २- ६० पदे
  • ऑफिसर स्केल ३- ७३ पदे
  • IBPS RRB भरती 2023 या तारखा का लक्षात ठेवा
  • अधिसूचना जाहीर झाल्यासी तारिख:३१ मे २०२३
  • ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०१ जून २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ जून २०२३
  • पीईटी परिक्षा तारीख :१७ जुलै ते २२ जुलै २०२३
  • पीईटी प्रवेश पत्र तारीख: १० जुलै २०२३
  • लिपिक प्राथमिक परीक्षेच्या संभाव्य तारखा: ०५ ऑगस्ट, ०६, १२, १३ आणि १९ ऑगस्ट २०२३