एकूण रिक्त पदे – १०८.

पोस्ट कोडनिहाय रिक्त पदांचा तपशील –

  • (१) एग्झिक्युटिव्ह ऑफिसर/२६०२ – चार्टर्ड अकाऊंटंट – ७५ पदे.

पात्रता – चार्टर्ड अकाऊंटंट. (अनुभव आवश्यक नाही.)

  • (२) एग्झिक्युटिव्ह ऑफिसर/२६०३ – लिगल – १५ पदे.

पात्रता – कायदा विषयातील पदवी. (अनुभव आवश्यक नाही.)

  • (३) एग्झिक्युटिव्ह ऑफिसर/२६०४ – कंपनी सेक्रेटरी – २ पदे.

पात्रता – कंपनी सेक्रेटरी. (अनुभव आवश्यक नाही.)

  • (४) एग्झिक्युटिव्ह ऑफिसर/२६०५ – सस्टेनेबिलिटी – ३ पदे.

पात्रता – सस्टेनेबिलिटीमधील पीएच.डी. (अनुभव आवश्यक नाही.)

  • (५) एग्झिक्युटिव्ह ऑफिसर/२६०६ – इकॉनॉमिक्स – १ पद.

पात्रता – इकॉनॉमिक्समधील पीएच.डी. (अनुभव किमान २ वर्षांचा आवश्यक.)

  • (६) एग्झिक्युटिव्ह ऑफिसर/२६०७ – इन्फ्रास्ट्रक्चर – २ पदे.

पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किंवा आर्किटेक्चर पदवी. (अनुभव किमान २ वर्षांचा आवश्यक.)

  • (७) एग्झिक्युटिव्ह ऑफिसर/२६०८ – इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी – १० पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी). (अनुभव किमान २ वर्षांचा आवश्यक.)
इष्ट पात्रता – एआय/एमएल/क्लाऊड कॉम्प्युटिंग (एडब्ल्यूए/Azure)/सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशनसह.

सर्व पदांसाठी सुरूवातीला दिल्ली/नॉयडा येथे नेमणूक दिली जाईल. भारतभरात कोठेही बदली होऊ शकते.
वयोमर्यादा – (दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी) पद क्र. १ ते ३ – २५ वर्षे, पद क्र. ४ व ५ – ३० वर्षे, पद क्र. ६ व ७ – २७ वर्षे.

  • वेतन – पे-लेव्हल – १० (५६,१०० – १,७७,५००) रु. १५,५१ लाख प्रतिवर्ष.
  • निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) आणि डिस्क्रीप्टिव्ह – (I) जनरल सेक्शन – पार्ट-ए – एमसीक्यू ३० प्रश्न, ३० गुण. पार्ट-बी – डिस्क्रीप्टिव्ह – २ प्रश्न, प्रत्येकी १५ गुण. (II) टेक्निकल सेक्शन – एमसीक्यू ९० प्रश्न, ९० गुण, एकूण १५० गुण, वेळ १५० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

अंतिम निवड लेखी परीक्षा आणि इंटरह्यूमधील एकत्रित गुणवत्तेनुसार.
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमधील Annexure मध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीमध्ये नमूद केलेले जॉब प्रोफाईल आणि पदासाठी इष्ट असलेले स्किल्स आपली पात्रता तपासून पहावी.
ऑनलाइन अर्ज icai.org या वेबसाईटवर १५ एप्रिल २०२६ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.