scorecardresearch

Premium

Bank Recruitment 2023: ‘IDBI’ बँकेत २१०० पदांसाठी होणार मेगाभरती! जाणून घ्या वयोमर्यादा, पात्रता आणि पगार

IDBI Bank Recruitment 2023: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) पदासाठी तब्बल ८०० रिक्त जागा आहेत आणि १३०० रिक्त पदे एक्झुक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशन (ESO) पदासाठी आहेत

IDBI Bank Recruitment 2023 Apply for 2100
: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) २१०० जागांसाठी भरती केली जाणार आहे. (फोटो सौजन्य – IDBI अधिकृत संकेतस्थळ)

IDBI Bank Recruitment 2023: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) २१०० जागांसाठी भरती केली जाणार आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) पदासाठी तब्बल ८०० रिक्त जागा आहेत आणि १३०० रिक्त पदे एक्झिक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशन (ESO) पदासाठी आहेत. सर्व इच्छुक उमेदवार ६ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

पात्रता

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर

Indian Army SSC Tech Recruitment 2024
भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी! शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ३८१ पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करावा अर्ज
Money Mantra
Money Mantra : NEFT, RTGS, IMPS यामध्ये फरक काय असतो?
Reserve Bank is indifferent to prevent cyber crimes
सायबर गुन्हे रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकच उदासीन; ऑनलाइन बँकिंगविषयक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी अपुऱ्या उपाययोजना
Information about future vehicles and fuels in the automotive industry Pune print news
वाहन उद्योगातील भविष्यवेधी संकल्पनांचा वेध! जाणून घ्या भविष्यातील वाहने अन् इंधनाविषयी…

उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे. पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा सरकार संस्थेच्या उदा., AICTE, UGC, इ. कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. सामान्य आणि ओबीसी श्रेणींसाठी किमान ६० टक्के गुणांसह (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ५५ टक्के गुण) पदवीधर असणे आवश्यक आहे.

एक्झिक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशन

उमेदवाराचे किमान वय २० आणि जास्तीत जास्त२५ असावे. शासन/शासनाद्वारे मान्यताप्राप्प्त विद्यापीठातून अथवा संस्थेच्या उदा., AICTE, UGC, इ. कोणत्याही शाखेतील पदवीधर असावे.

हेही वाचा – १० वी पास आणि ITI उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी! उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत ११०४ जागांसाठी भरती सुरु

‘आयडीबीआय’ बँक भरती २०२३ : पगार

कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) आधारावर, ज्युनियर असिस्टंट मॅनेजरला भरतीच्या वेळी पगार रुपये ६.१४ लाख पासून ते रु. ६.५० लाखपर्यंत (वर्ग अ शहर) मिळू शकतो. एक्झिक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशनच्या उमेदवारांना एकरकमी/ निश्चित मोबदला म्हणून पहिल्या वर्षी दरमहा २९,००० रुपये आणिदुसऱ्या वर्षी दरमहा ३१००० रुपये दरमहा रक्कम भरावी लागू शकते.

‘आयडीबीआय’ बँक भरती २०२३: निवड प्रक्रिया

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड ‘O’ : निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (OT), कागदपत्र पडताळणी (DV), वैयक्तिक मुलाखत (PI) आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (PRMT) यांचा समावेश असेल.

एक्झिक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशन (ESO): निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (OT), कागदपत्र प पडताळणी (DV) आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (PRMT) यांचा समावेश असेल.

भरतीची अधिसुचना – https://www.idbibank.in/pdf/careers/Detailed_-Advertisement.pdf

हेही वाचा – प्रसार भारती अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

आयडीबीआय’ बँक भरती २०२३: अर्ज कसा करावा

१) बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx
२) तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी.
३) पुढे जाण्यापूर्वी फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा, हस्तलिखीत स्वयंमघोषणापत्र आणि scribe declaration (जर scribe पर्याय निवडलेा असेल) अपलोड करा.
४) अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Idbi bank recruitment 2023 apply for 2100 posts check salary eligibility age and education qualification snk

First published on: 30-11-2023 at 13:21 IST

संबंधित बातम्या

×