सुहास पाटील suhassitaram@yahoo.com
आयडीबीआय बँक (IDBI Bank) (Advt.No. 03/2023-24) ‘एक्झिक्युटिव्ह’ पदांची करार पद्धतीने भरती.




एकूण रिक्त पदे – १,०३६ (अजा – १६०, अज – ६७, इमाव – २५५, ईडब्ल्यूएस – १०३, खुला – ४५१) (५० पदे दिव्यांग (कॅटेगरी VH – १९, HH – ११, OH – १०, MD/ID – १०) साठी राखीव).
निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला करार पद्धतीने १ वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. उमेदवाराची समाधानकारक कामगिरी आणि नेमून दिलेल्या अनिवार्य ई-सर्टिफिकेशन्स पूर्ण केल्यास कराराचा कालावधी एक-एक वर्षांने वाढवून जास्तीत जास्त २ वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.
३ वर्षांचा कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास निवड प्रक्रिये मार्फत उमेदवार ‘असिस्टंट मॅनेजर’ (ग्रेड-ए) पदावर बँकेत कायम केले जाऊ शकतात.
पात्रता : १ मे २०२३ रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवी.
वयोमर्यादा : दि. १ मे २०२३ रोजी २० ते २५ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ मे १९९८ ते १ मे २००३ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, माजी सैनिक – ५ वर्षे)
दरमहा एकत्रित वेतन : पहिल्या वर्षी – रु. २९,०००/-; दुसऱ्या वर्षी रु. ३१,०००/-; तिसऱ्या वर्षी रु. ३४,०००/-.
निवड पद्धती : भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन टेस्ट, कागदपत्र पडताळणी (DV) आणि भरतीपूर्व वैद्यकीय तपासणी (PRMT) यांचा समावेश असेल.
ऑनलाइन टेस्ट : (१) लॉजिकल रिझिनग, डेटा अॅनालिसिस अॅण्ड इंटरप्रिटेशन – ६० प्रश्न, (२) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, (३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड – ४० प्रश्न, (४) जनरल/इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस/ कॉम्प्युटर/आयटी – ६० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, एकत्रित वेळ २ तास. उमेदवारांना प्रत्येक टेस्टमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण किंवा ०.२५ गुण वजा केले जातील.
ऑनलाइन अर्जासोबत फोटो, सिग्नेचर, Thumb Impression आणि Hand Written Declaration स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक. (यासाठी Annexure- I मधील सूचना वाचाव्यात.) अर्जाचे शुल्क : (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी रु. २००/-) (फक्त इंटिमेशन चार्जेस); इतर उमेदवारांसाठी रु. १,०००/- (इंटिमान चार्जेससह). प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग (PET) – अजा/ अज/ इमाव उमेदवारांसाठी भरती पूर्व प्रशिक्षण (PET) बँक ऑनलाइन अथवा ऑफलाइन मोडने आयोजित करणार आहे. PET साठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात तशी निवड करणे आवश्यक. PET चे ठिकाण अथवा लिंक, तारीख, वेळ इ. माहिती उमेदवारांना ई-मेल/ SMS द्वारे कळविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज www.idbibank.in या संकेतस्थळावर दि. ७ जून २०२३ पर्यंत करावेत. ( Careers/Current Opening; Recruitment of Executives (on Contract) 2023-24;Apply Online)