Career in Theater : लाइट, कॅमेरा, ॲक्शन! हे तीन शब्द ऐकले ती नाटकाची आठवण येते. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी नाटकाचा अनुभव घेणे खूप जास्त गरजेचे आहे. अनेक लोक नाटकामध्ये काम करायची इच्छा यासाठी दाखवतात कारण त्यांना मालिकेत किंवा चित्रपटात काम करायचे असते पण तुम्हाला माहिती आहे का, जरी तुम्हाला अभिनय येत नसेल तरी सुद्धा तुम्ही नाटकांमध्ये चांगले करिअर करू शकता.

आज आपण नाट्यविश्वातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे नाट्यविश्वात मोठे योगदान आहे आणि तुम्ही त्यात करिअर करू शकता.

Success Story: A boy from A Small Village in Rajasthan Chose Hindi and Cracked the UPSC CSE 2023
UPSC Success Story: कोटींच्या पॅकेजची नोकरी नाकारत पठ्ठ्यानं वडिलांची इच्छा पूर्ण केली; यूपीएससीत मारली बाजी
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
A young man saket from a small town built a company worth 600 crores
Success Story: स्वप्नाला जोड मेहनतीची! छोट्या शहरातल्या तरुणाने कष्टाच्या जोरावर उभी केली तब्बल ६०० कोटींची कंपनी
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
Kolkata Doctor Murder Case
Kolkata Doctor Murder : डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
German Invasion of Poland
Germany invades Poland: पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरमध्ये स्थलांतर का केले? नेमके काय घडले होते?
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
UP Govt Teacher Demands Kiss
Video: हजेरी लावण्यासाठी महिला शिक्षिकेकडे शिक्षकाची संतापजनक मागणी; म्हणाला, “आधी गालावर..”

स्टेज मॅनेजर (Stage Manager)

नाटकांमध्ये स्टेज मॅनेजर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. दररोजचे महत्त्वाचे इव्हेंट्स, नाटकाच्या तारखा, सर्वांची सुव्यवस्था, नाटका पूर्वी आणि नंतरच्या सर्व गोष्टी हाताळतो. ते कलाकार आणि इतर क्रू सदस्यांशी संपर्क साधतो आणि समन्वय साधतो. नाटक सुरळीत यशस्वी पार पाडण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते.

फाइट कोरियोग्राफर (Fight Choreographer)

आपण चित्रपटांमध्ये जे स्टंट किंवा फाइट सीन पाहतो, ते स्टंटमॅन करतात पण नाटकामध्ये आलेले सर्व स्टंट आणि फाइट हे कलाकारालाच करावे लागतात. अशा फाइट सीनची कोरियोग्राफी करण्यासाठी एक आवश्यक व्यावसायिक फाइट कोरियोग्राफर असावा लागतो जेणेकरू कलाकार सुरक्षित अभिनय करू शकणार.

हेही वाचा : Success Story: दिल्लीतील भाजीविक्रेत्याने करोना काळात गावी जाऊन सुरू केली शेती; महिन्याला कमावतो लाखो रुपये

कथा लेखक(Scriptwriter)

कोणत्याही नाटकाचे किंवा चित्रपटाचे यश हे त्या नाटकाच्या किंवा चित्रपटाच्या कथेवर अवलंबुन असते. कथा कशी लिहिली जाते आणि प्रेक्षकांपर्यंत कशी पोहचवली जाते, हे या दोन गोष्टीवरून अवलंबून आहे. या लेखकाचे काम आव्हानात्मक असते कारण चांगल्या कथेशिवाय तुम्ही प्रेक्षकांचे मन जिंकू शकत नाही.

सेट डिझाइनर (Set Designer)

सेट कसा तयार करायचा हे ठरवण्यासाठी सेट डिझाइनर हा दिग्दर्शक आणि डिझाइन टीमबरोबर काम करतो. सेट तयार करण्यासाठी आवश्यक सामान आणि इतर बाबींची तो काळजी घेतो.

लाइटनिंग/साउंड टेक्निशियन (Lightning/Sound Technician)

नाटकामध्ये लाइट आणि साउंड या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाइट आणि साउंड योग्य असणे गरजेचे आहे. यासाठी लाइटनिंग व साउंड टेक्निशियनची भूमिका महत्त्वाची असते.

मार्केटिंग असिस्टंट (Marketing Assistant)

नाट्यविश्वात मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मार्केटिंग असिस्टंटची गरज असते कारण नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगची आवश्यकता भासते. मार्केटिंग असिस्टंट नाटकाच्या प्रचाराची जबाबदारी घेतो आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. हे तिकिटांची विक्री वाढवतात व जास्तीत जास्त प्रेक्षकांना नाट्यगृहात घेऊन येतात

क्रू मेंबर (Crew Member)

क्रू मेंबर हे पडद्यामागे काम करणारे सर्वात कमी दर्जाचे कर्मचारी आहेत. कोणतेही नाटक यशस्वी पार पाडण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. नाटकाच्या टीमबरोबर समन्वय साधणे, हे क्रू सदस्यांचे महत्त्वाचे काम आहे. उदा. लाइट आणि साउंड चेक करणे, सेट डिझाइनर, स्टेज मॅनेजर आणि कलाकारांमध्ये समन्वय साधणे.

प्रॉप डिझायनर (Prop Designer)

प्रॉप्स हा कोणत्याही नाटकाचा महत्त्वाचा भाग असतो. एक प्रॉप डिझाइनर नाटकाच्या सेटवर आवश्यक गोष्टींची काळजी घेतो.प्रत्येक मिनिटांचा पाठपुरावा घेतो. सेटवर कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये, ही त्याची जबाबदारी असते.