Cheaper Medical Education : पालकांना नेहमीच वाटतं आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन नावलौकीक करावं. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, यासाठी पालक मुलांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलांनी इंजीनियर, डॉक्टर व्हावं, असं अनेक पालकांना वाटतं. पण मेडिकल एज्यूकेशन घ्यायचं असल्यावर सर्वात आधी बजेट किती आहे? याचा विचार करावा लागतो. कारण मेडिकल एज्यूकेशनसाठी खूप जास्त फी भरावी लागते. हे शिक्षण खूप महागडं असल्याने सामान्य माणसांना फी भरण्यात नाकी नऊ येतात. मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चामुळं काही कुटुंबावर आर्थिक संकटही ओढावलं आहे.

स्वस्तात मेडिकल एज्यूकेशन घेऊन डॉक्टर व्हायचं, याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला खोटी डिग्री मिळेल. तसंच तुम्हाला एखाद्या छोट्या संस्थेमधून शिक्षण घ्यावं लागेल, असंही नाही. भारतात मेडिकल एज्यूकेशन खूप महागडं आहे. पण आम्ही तुम्हाला कमी फी असणाऱ्या मेडिकल एज्यूकेशनबाबत माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत, जिथे तुमच्या शिक्षणाचा तसेच खाण्यापिण्याचा खर्चही कमी होईल. विद्यार्थी किर्गिस्तान, कजाकिस्तान किंवा रशियात अॅडमिशन घेऊ शकतात. रशियाच्या सरकारी विद्यापीठात विद्यार्थ्यांना NRI कोट्यातूनही अॅडमिशन दिलं जातं. याची फी सुद्धी खूप कमी आहे. याशिवाय कजाकिस्तान मध्ये विद्यार्थी २५ लाखांच्या खर्चात शिक्षण आणि हॉस्टेलची फी भरु शकतात.

nita ambani buys a personalised rolls royce phantom viii worth over 12 crore
स्पिरिट ऑफ एक्स्टसी सोन्याचं अन्…; नीता अंबानींनी खरेदी केली आलिशान गाडी, जाणून घ्या किंमत
desi jugaad video man prepare solar bike with 200 km range harsh goenka share video
ना पेट्रोल, ना वीज! तरुणाने जुगाडद्वारे बनवली ७ सीटर सोलर बाईक; VIDEO पाहून हर्ष गोयंका अवाक्, म्हणाले, क्या होगा उनका?
virat kohli corrects dj alan walker
Video : “तुला मुलगी झाल्याचं ऐकलं…”, विराट कोहलीने दुरुस्त केली एलन वॉकरची ‘ती’ चूक; व्हिडीओ व्हायरल
a young man made 5 seater cycle jugaad video
Jugaad Video : पाच सीटर सायकल बनवली! तरुणाने केला अनोखा जुगाड; पाहा व्हिडीओ

नक्की वाचा – भारतात मेडिकल एज्यूकेशन खूप महागडं आहे. पण आम्ही तुम्हाला कमी फी असणाऱ्या मेडिकल एज्यूकेशनबाबत माहिती देणार आहोत.

विदेशातील विद्यापीठात अॅडमिशन घेण्यासाठी कॅंडिडेट्सला योग्य विद्यापीठातून एखाद्या चांगल्या चॅनलच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. काही विद्यापीठांच्या वेबसाईट्सवर त्यांच्या अर्जाची लिंक उपलब्ध असते. तर अनेक विद्यापीठात इमेलच्या माध्यमातूनही अर्ज स्विकारले जातात. कोणत्याही विदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी अर्ज करण्याआधी तेथिल खर्च, विद्यापीठाची मान्यता, इ. तपासून पाहा. कारण एखाद्या ठिकाणी विद्यापीठाच्या फी पेक्षा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च जास्त असता कामा नये.