इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरती २०२३ ची माहिती जाहिरात क्रमांक IGCAR/02/2023 मध्ये देण्यात आली आहे.
एकूण रिक्त पदे – १००




पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो.
हेही वाचा- ७ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्य उत्पादन शुल्क विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरु
शैक्षणिक पात्रता – ५५ टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीयांना ५ वर्षांची सूट.
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २९ मे २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.igcar.gov.in/
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता –
सहाय्यक कार्मिक अधिकारी [R], भरती विभाग, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र, चेंगलपट्टू जिल्हा, कल्पक्कम- ६०३ १०२, तामिळनाडू ईमेलवर सॉफ्ट कॉपी: jrfrect@igcar.gov.in
भरतीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1xAvZ_1VF8xgibfBSOxVtyuuRdUl0gzga/view?usp=sharing या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.