IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूर शहरातील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत सध्या ‘सीनियर रिसर्च फेलो’ (Senior Research Fellow [SRF]) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी नेमक्या किती जागा रिकाम्या आहेत ते उमेदवारांनी पाहावे. तसेच, नोकरीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष व अर्जाची अंतिम तारीख काय आहे अशी सर्व आवश्यक माहिती जाणून घ्या.

IIIT Nagpur Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

सीनियर रिसर्च फेलो [SRF] या पदासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत एका रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

IIIT Nagpur Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

सीनियर रिसर्च फेलो [SRF] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशनमधील/ इलेक्ट्रिकल/ इुस्ट्रुमेंटेशन अॅण्ड कंट्रोल इंजिनियरिंग क्षेत्रातील M.E. / M.Tech. अशी पदवी असणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांकडे RF आणि मायक्रोवेव्ह इंजिनियरिंगसारख्या संबंधित क्षेत्रातील अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा : HPCL recruitment 2024 : ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ अंतर्गत मोठी भरती! पाहा माहिती

IIIT Nagpur Recruitment 2024 : वेतन

ज्या उमेदवाराची सीनियर रिसर्च फेलो म्हणून निवड होईल, त्या उमेदवारास दरमहा ३५,०००/- रुपये + १८% HRA असे वेतन देण्यात येईल.

IIIT Nagpur Recruitment 2024 – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अधिकृत वेबसाइट लिंक –
https://www.iiitn.ac.in/

IIIT Nagpur Recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://iiitn.ac.in/Downloads/recruitments/2024/june/SRF_IIITN_Recruitment%20Notice%202024-25.pdf

IIIT Nagpur Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील सीनियर रिसर्च फेलो पदासाठी नोकरीचा अर्ज पाठविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
अर्ज कसा आणि कुठे पाठवायचा याची माहिती नोकरीच्या अधिसूचनेत दिलेली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ४० वर्षे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
नोकरीच्या अर्जात उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे अनिवार्य आहे.
तसेच, उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरावा. उशिरा पाठविण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १८ जून २०२४ अशी आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचनेची लिंक वर नमूद केलेली आहे.