इंडिया पोस्ट (मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन) देशभरातील ३९ पोस्टल सर्कल्समध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ (Schedule-II-जुलै २०२६) पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – २३,७५७.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱया ब्रँच ऑफिसेसमध्ये ‘ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)’, ‘असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)’/‘डाक सेवक’ च्या एकूण २,४३१ पदांची भरती.

पदनिहाय कामाचे स्वरूप – (१) ब्रँच पोस्टमास्टर (BPM) – ब्रँच पोस्ट ऑफिसचे आणि इंडिया पेमेंट्स बँक (IPPB) चे काम सांभाळणे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱया गावातील/ग्रामपंचायतीमधील पोस्टाचा व्यवसाय सांभाळणे.
(२) असिस्टंट ब्रँच मास्टर (ABPM) – स्टॅंप/स्टेशनरी यांची विक्री, एकूण टपालाची वाहतूक व वितरण, IPPB च्या कामात व पोस्टाच्या इतर कामात ब्रँच पोस्ट मास्टरना मदत करणे.

(३) डाक सेवक – लाईन सब ऑफिसेस, हेड पोस्ट ऑफिसेस आणि रेल्वे मेल सर्व्हिसेस ऑफिसेस इ. मध्ये काम करावे लागेल.
पात्रता – (दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी) सर्व पदांसाठी – (i) १० वी (एस्एस्सी) उत्तीर्ण (गणित, स्थानिय भाषा आणि इंग्रजी विषयांसह).

(ii) पोस्टल सर्कलसाठी नेमलेली अधिकृत भाषा उमेदवारांना अवगत असणे आवश्यक.

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी ऑफिशियल लँग्वेज मराठी आहे. एकूण रिक्त पदे – २,३०१ व कोंकणी/मराठीसाठी एकूण रिक्त पदे – १३०. (गोवा राज्यासाठी); कर्नाटक – कन्नड; गुजरात – गुजराती.

(iii) उमेदवारांनी डिपार्टमेंटल सॉफ्टवेअरवर काम करण्यासाठी कॉम्प्युटर/लॅपटॉप/POS/मोबाईल इ. चालविण्याचे पुरेसे ज्ञान असल्याचे घोषणापत्र Annexure-VI मधील नमुन्यात दाखल करणे आवश्यक आहे.

(ब्रँच पोस्ट मास्टर पदासाठी अर्ज करणाऱया उमेदवारांना आपल्या कार्यक्षेत्रात ब्रँच पोस्ट ऑफिससाठी निवड झाल्यानंतर व कामास सुरूवात करण्यापूर्वी जागा मिळवून द्यावी लागेल.) BPM पदांवरील उमेदवारांना पोस्टाच्या गावी रहावे लागेल. ABPM/डाक सेवक पदांवरील उमेदवारांना पोस्ट ऑफिसच्या वितरण अधिकार क्षेत्रात राहणे आवश्यक.

(iv) उमेदवारांना सायकल चालविता येणे बंधनकारक आहे. सायकल ऐवजी स्कूटर/मोटर सायकल चालविता येत असेल तरी चालेल. यासाठी उमेदवारांनी Annexure-VII मधील घोषणापत्र सादर करणे आवश्यक.

विकलांग कॅटेगरी क्षीण दृष्टी, कर्णबधिर, एक हात, एक पाय, कुष्ठरोग मुक्त, अॅसिड हल्ला बाधित उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. काही पदे (प्रत्येक कॅटेगरीसाठी १ टक्का पदे) विकलांगांसाठी राखीव आहेत.

(v) उमेदवारांनी उपजीविकेसाठी पुरेशी साधनं (Adequate means of livelihood) उपलब्ध असल्याबाबतचं घोषणापत्र Annexure-VI, VII & VIII मध्ये द्यावयाचे आहे.

(vi) तसेच ऑनलाईन अर्जात दिलेली माहिती खरी असल्याबाबतचं घोषणापत्र Annexure-IX मध्ये सादर करावयाचे आहे.

(vii) अजा/अज/इमाव/ईडब्ल्यूएस उमेदवारांनी Annexure-V मध्ये दिलेल्या नमुन्यातील दाखले सादर करणे आवश्यक.

(viii) उमेदवारांनी Annexure-IV मध्ये दिलेल्या नमुन्यातील घोषणापत्र सादर करणे आवश्यक.

(ix) उमेदवारांनी API Setu मार्फत मार्कशीट तपासणीसाठी अनुमती Annexure-X मध्ये द्यावयाची आहे.

वयोमर्यादा – (दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी) १८ ते ४० वर्षे. (इमाव – ४३ वर्षेपर्यंत; अजा/अज – ४५ वर्षेपर्यंत; (विकलांग उमेदवार – खुला गट – ५० वर्षेपर्यंत, इमाव – ५३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५५ वर्षेपर्यंत). ईडब्ल्यूएस् उमेदवारांना वयात कोणतीही सूट नाही याची नोंद घ्यावी.

टाईम रिलेटेड कंटीन्यूइटी अलाऊन्स (TRCA) महागाई भत्ता – ब्रँच पोस्ट मास्टर्स (BPM) यांना दरमहा (रु. १२,००० – २९,३८०) अंदाजे वेतन दरमहा रु. १९,२००/- व ABPM/डाक सेवक यांना (रु. १०,००० – २४,४७०) अंदाजे वेतन दरमहा रु. १६,०००/- TRCA दिले जातील. उमेदवार भारत सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या महागाई भत्ता मिळण्यास पात्र असतील.

अर्जाचे शुल्क – खुलागट, इमाव, ईडब्ल्यूएस्चे फक्त पुरुष उमेदवारांसाठी रु. १००/-. (निवडलेल्या डिव्हीजनमधील सर्व पदांच्या पसंतीसाठी) महिला/अजा/अज/विकलांग/ट्रान्सवुमन उमेदवारांना शुल्क माफ आहे.

निवड पद्धती – इ. १० वी (एस्एस्सी) मधील गुणवत्तेनुसार आणि उमेदवारांनी पदांसाठी दिलेल्या पसंतीक्रमाप्रमाणे निवड केली जाईल. अंतरिम निवड यादीनुसार उमेदवारांना (Annexure-IX मध्ये नमूद केलेले) हमीपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर उमेदवारांना जाहिरातीच्या पॅरा ९ मध्ये नमूद केलेली कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. निवड प्रक्रिया दि. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल.
महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत डिव्हीजन्समधील रिक्त पदे –

अहिल्यानगर – ६४, अकोला – ४८, अमरावती – ७८, छ. संभाजी नगर – ७८, बीड – ५१, बारामती – ५६, भुसावळ – २९, बुलढाणा – ४४, चंद्रपूर – ६०, चिपळूण – ८१, गडचिरोली – ५०, धुळे – १०५, गोवा – १३०, जळगाव – ३८, कोल्हापूर – १०७, कराड – ५९, लातूर – १९, मालेगाव – ५७, नागपूर शहर – ८, नागपूर ग्रामीण – ११९, नांदेड – ५५, नाशिक – ३५, नवी मुंबई – ३८, धाराशीव – १५, पालघर – ५३, परभणी – ५२, पुणे ग्रामीण – ९४, रायगड – १०१, सातारा – ७६, श्रीरामपूर – ५९, ठाणे – ५०, वर्धा – ३८, यवतमाळ – ६६, रत्नागिरी – ६५, सांगली – १००, पुणे शहर पश्चिम – १५, पुणे शहर पूर्व – ३१, पंढरपूर – ५५, RMS BM DN मिरज – ७, RMS DN पुणे – १, सिंधुदुर्ग – ७६, सोलापूर – ४९, मुंबई शहर उत्तर पश्चिम – १२, मुंबई उत्तर – २, मुंबई उत्तर पूर्व – ३, मुंबई दक्षिण – १, मुंबई पश्चिम – १.

ऑनलाइन अर्ज https://indiapost.gov.in/gdsonlineengagement या संकेतस्थळावर दि. २ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.