IAF Agniveervayu Recruitment 2024 : १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय हवाई दलात अग्निवीर बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय वायुसेनेने नुकतीच अग्निवीर वायू भरती २०२४ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्यानुसार, अग्निवीर वायू भरतीसाठी ८ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ जुलै आहे, तर ऑनलाइन परीक्षा १८ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार आहे. या भरती अंतर्गत एकूण किती रिक्त जागा भरल्या जाणार हे अद्याप निश्चित नाही.

या पदांसाठी पात्र उमेदवार ८ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवाराने भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली पाहिजे.

पदाचे नाव

अग्निवीर वायू इनटेक

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वीमध्ये विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित) आणि इंग्रजीत ५०% गुण मिळवले आहेत ते अर्ज करू शकतात किंवा उमेदवाराकडे तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका पदवी असावी. याशिवाय भौतिकशास्त्र आणि गणित यासारख्या विषयांसह दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात ५०% गुण असले पाहिजेत.

विज्ञान शाखेशिवाय कोणत्याही विषयात ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात, पण इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

मुंबईतील माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १० वी उत्तीर्ण उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर

वयोमर्यादा

पात्र उमेदवारांचा जन्म ३ जुलै २००४ ते ३ जानेवारी २००८ दरम्यान झालेला असावा. म्हणजेच वयोमर्यादा २१ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क

५०० रुपये + जीएसटी

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : ८ जुलै २०२४

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जुलै २०२४

परीक्षा (Online): १८ ऑक्टोबर २०२४ पासून

या भरती प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

indianairforce.nic.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक

agnipathvayu.cdac.in/avreg/candidate/login