● कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना (पुरुष/महिला) AFCAT Ent१८/एन्सीसी स्पेशल एन्ट्रीमधून भारतीय हवाई दलात कमिशन्ड ऑफिसर म्हणून सामील होण्याची सुवर्णसंधी. भारतीय हवाई दल – जुलै, २०२६ पासून सुरू होणाऱ्या कोर्सेसमधील प्रवेशाकरिता एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट परीक्षा दि. २३/२४/२५ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.

(१) फ्लाईंग ब्रँच – शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( SSC) – ३ पदे पात्रता – (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी ५०टक्के गुण आवश्यक) आणि ( i) पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण (कोणतीही शाखा) किंवा ( ii) B. E./ B. Tech. ६०टक्के गुण किंवा ( iii) a. m. i. e. ६०टक्के गुण.

(२) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल ब्रँच) – ( i) एअरोनॉटिकल इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स), AE( L), SSC – १०८ पदे पात्रता – (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी किमान ५०टक्के गुण आवश्यक) आणि कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/ AI Data Science/ AI ML/इलेक्ट्रिकल आय.टी./इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन इ. मधील इंजिनीअरिंग पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि ( i) किंवा ( ii) A. M. I. E. किंवा I. E. T. E. कडील G. M. E. ६०टक्के गुण.

( ii) एअरोनॉटिकल इंजिनीअर (मेकॅनिकल) AE ( M), SSC – ४८ पदे .

पात्रता – (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि मेकॅनिकल/ प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल/ एअरोस्पेस/एअरोनॉटिकल/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल इ. विषयांतील इंजिनीअरिंग पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि/ किंवा A. M. I. E. ६० टक्के गुण.

(३) ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल ब्रँच) –

( i) अॅडमिन – SSC – ५८ पदे (पुरुष – ४६ व महिला – १२). ( ii) लॉजिस्टिक्स – SSC – १५ पदे .

पात्रता – अॅडमिन व लॉजिस्टिक्स ब्रँचसाठी १२ वी आणि पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण.

( iii) अकाऊंट्स – SSC – ११ पदे (पुरुष – ९ व महिला – २).

पात्रता – १२ वी आणि खालीलपैकी एक पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण. (बी.कॉम./बी.बी.ए./बी.एम.एस/बी.बी.एस./ बी.एस्सी.)( iv) एज्युकेशन – SSC – ९ पदे

पात्रता – १२ वी आणि कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि पदवीला किमान ६० टक्के गुण आवश्यक.

( ५) मेटिओरॉलॉजी एन्ट्री – SSC – ८ पदे .

पात्रता – १२ वी आणि B. Sc. (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा B. E./ B. Tech. (कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/मेकॅनिकल इ.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

( vi) व्हेपन सिस्टीम ( WS) – SSC – २४ पदे.

पात्रता – १२ वी (फिजिक्स, मॅथ्स विषयात) किमान ५० टक्के गुण आणि पदवी (कोणतीही शाखा) किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(सी) NCC स्पेशल एन्ट्री – फ्लाईंग ब्रँच – PC – (फक्त पुरुष) आणि SSC – . CDSE मधील १०टक्के जागा ढउ साठी आणि AFCAT ब्रॅंचसाठीच्या जागांच्या १०टक्के जागा SSC साठी.

पात्रता – (A) NCC एअर विंग सिनियर डिव्हीजन ‘सी’ सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. (ब) पदवीला (कोणत्याही शाखेतील) किमान ६०टक्के गुण आवश्यक. (क) १२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५०टक्के गुण आवश्यक.

पदवी परीक्षेतील CGPA ग्रेड टक्केवारीमध्ये रूपांतर (conversion) करण्याचा पुरावा सादर करणे आवश्यक.

वयोमर्यादा – (अ) फ्लाईंग ब्रँच AFCAT आणि NCC स्पेशल एन्ट्रीसाठी – (१ जुलै २०२६ रोजी) २० ते २४ वर्षे DGCA कडील कमर्शियल पायलट लायसन्सधारक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – २६ वर्षे.

(ब) ग्राऊंड ड्युटी – (दि. १ जुलै २०२६ रोजी) २० ते २६ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ जुलै २००० ते १ जुलै २००६ दरम्यानचा असावा.)

शंकासमाधानासाठी संपर्क – ०२०-२५५०३१०५/६. ई-मेल आयडी – afcatcell@cdac. in. इतर चौकशीसाठी ०११-२३०१०२३१, विस्तार क्र. ७६१०, टोल फ्री नंबर १८००-११-२४४८. https:// careerindianairforce. cdac. in किंवा https:// afcat. cdac. in या संकेतस्थळावर वेगवेगळ्या टॅबमधून Afcat Ent१८/ NCC Ent१८ साठी ऑनलाइन अर्ज १ जुलै २०२५ (२३.३० वाजे)पर्यंत करावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237 @gmail. com