Premium

१२ वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदाकरीता भरतीची अधिसुचना जाहीर झाली आहे. बारावी पास उमेवदवार यासाठी अर्ज करू शकतात.

Indian Army Lieutenant Bharti Through The 50th (10+2) Technical Entry Scheme Apply For 90 Vacancies
१२ वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी! ( फोटो- इंडियन आर्मी अधिकृत वेबसाइट)

Indian Army Notification 2023: देशामध्ये कित्येक तरुण भारतीय सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न पाहतात, कोणाला सैनिक व्हायचे असते तर कोणाला अधिकारी. तुम्हीदेखील जर भारतीय सैन्यामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय सैन्यदलामध्ये पन्नासाव्या टेक्निकल एन्ट्री स्कीमच्या आधारे ( १०+२) लेफ्टनंट पदाकरिता ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या joinindianarmy.nic.inअधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात.

टेक्निकल एंट्री स्ट्रीम

ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा उमेदवारांसाठी UPSC NDA लेखी परीक्षा न देता सशस्त्र दलात भरती होण्याची संधी टेक्निकल एंट्री स्ट्रीम देते. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट भारतीय सैन्यात ९० रिक्त पदे भरणे आहे.

हेही वाचा – IBPS मध्ये मेगाभरती, तब्बल ८६०० जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या कसा करावा अर्ज

शैक्षणिक पात्रता

या पदाकरिता पात्र उमेदवार मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह बारावीची परीक्षा ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. सर्व उमेदवारांना जेईई मेन 2023 मध्ये बसणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

२ जुलै २००४ पूर्वी जन्मलेले आणि १ जुलै २००७च्यानंतर न जन्मलेले अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदासाठी अर्ज करू शकतात.

अधिकृत अधिसुचना – https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/NOTIFICATION_OF_10_2_TES_50_COURSE.pdf

हेही वाचा – दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे समजत नाहीये? हे आहेत १० पर्याय, मिळू शकतो चांगला पगार

उमेदवारांची निवड प्रक्रिया

सर्व्हिस सिलेक्शन बोर्डद्वारे निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल मग या उमेदवाराना मेडिकल फिटनेस टेस्ट आणि फिजिकल फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. एसएसबी मुलाखतीचे आयोजन ऑगस्टमध्ये या सप्टेंबर २०२३ मध्ये जाहीर केले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian army lieutenant bharti through the 50th 102 technical entry scheme apply for 90 vacancies snk