इंडियन आर्मीमध्ये अविवाहीत पुरुष व महिला उमेदवारांना ‘अधिकारी’ पदावर भरती होण्यासाठी शॉर्टसर्व्हिस कमिशन मिळविण्याकरिता ऑक्टोबर, २०२६ पासून सुरू होणाऱ्या एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम १२४ व्या कोर्ससाठी प्रवेश.———— प्रवेश क्षमता – NCC (पुरुष) – ७० जागा (६३ जागा जनरल कॅटेगरीसाठी; ७ जागा युद्धात कामी आलेल्या इंडियन आर्मी कर्मचाऱ्यांच्या (Battle Casualty) पाल्यांसाठी). NCC (महिला) – ६ जागा (५ जागा जनरल कॅटेगरीसाठी आणि १ जागा युद्धात कामी आलेल्या इंडियन आर्मी कर्मचाऱ्यांचे पाल्य यांच्सासाठी).

पात्रता – (१) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. (पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना दि. १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.) (२) उमेदवारांनी किमान २/३ शैक्षणिक वर्षेपर्यंत एन्सीसीच्या सिनियर डिव्हीजन/विंगमध्ये काम केलेले असावे. (३) एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षेत किमान ‘बी’ ग्रेड मिळालेले असावे. (युद्धात कामी आलेल्या सैन्य दलातील कर्मचाऱयांच्या मुलांना एन्सीसी ‘सी’ सर्टिफिकेट आवश्यक नाही.)

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात वजन असावे. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२६ रोजी) १९ ते २५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै २००१ ते १ जुलै २००७ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती – SSB इटरव्ह्यूकरिता शॉर्टलिस्ट करण्यासाठी गुणवत्ता ठरविताना उमेदवारांचे NCC-C सर्टिफिकेट (ए-ग्रेडसाठी ५० गुण, बी-ग्रेडसाठी २५ गुण) आणि पदवीमधील प्राप्त गुणांनुसार बोनस गुण दिले जातील. शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना सिलेक्शन सेंटर वाटप जाहिर झाल्याचे कॉल अप लेटर संबंधित सिलेक्शन सेंटरकडून ई-मेल/एस्एम्एस्द्वारे कळविले जाईल. त्यानंतर उमेदवारांनी इंडियन आर्मीच्या संकेतस्थळावर लॉगइन करून एसएसबीसाठीची तारीख निश्चित करावयाची आहे. एसएसबी इटरव्ह्यू ५ दिवसांपर्यंत चालेल. एसएसबी इटरव्ह्यूच्या स्टेज-२ मधून उत्तीर्ण उमेदवारांना मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागेल. अंतिम निवड SSB इटरव्ह्यूनुसार केली जाईल.

एसएसबी सेंटर्स – प्रयागराज, भोपाळ, बंगळुरू, जालंधर येथील सिलेक्शन सेंटर्सवर एसएसबी इटरव्ह्यू घेण्यात येतील.

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना ४९ आठवड्यांचे ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA), चेन्नई येथे दिले जाईल. ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना लग्न करता येणार नाही. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रटेजिक स्टडीज’ मद्रास विद्यापीठातर्फे दिला जाईल.

प्रोबेशन – कालावधी ६ महिन्यांचा असेल. निवडलेल्या उमेदवारांना ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना लागू असलेले इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल. ट्रेनिंगनंतर ‘लेफ्टनंट’ पदावर कमिशन दिले जाईल. २ वर्षं पूर्ण झाल्यावर कॅप्टन पदावर बढती मिळेल. ६ वर्षं पूर्ण झाल्यावर मेजर पदावर बढती मिळेल. १३ वर्षं पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळेल.

वेतन – डिफेन्स पे-मॅट्रिक्स लेव्हल-१० (रु. ५६,१००/- – १,७७,५००/-) अधिक मिलिटरी सर्व्हिस पे (MSP) रु. १५,५००/- व इतर भत्ते. (रु. १७-१८ लाख प्रतिवर्ष सीटीसी) कॅडेट्सना रु. १.२५ कोटीचा विमा संरक्षण दिले जाईल.

सर्व्हिस कालावधी – पुरुष/महिला यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन १ वर्षांसाठी दिले जाईल. नंतर तो कालावधी ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. १० वर्षांच्या सर्व्हिसनंतर पात्र असल्यास उमेदवार परमनंट कमिशनसाठी निवडले जाऊ शकतात. (उमेदवारांना ५ वर्षांनंतर सेवामुक्त होण्याचा पर्याय उपलब्ध आहे.)

ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. १६ मार्च २०२६ (१५.०० वाजे)पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर Feedback/Queries पर्याय उपलब्ध आहे.

इंजिनीअरिंग ट्रेनी पदे

टाटा स्टील लिमिटेड (TSL), जबलपूर, रजिस्टर्ड ऑफिस, मुंबई. ‘मुंबई अस्पायरिंग इंजिनीअर प्रोग्राम (AEP) २०२६’ करिता टाटा स्टीलच्या देशभरातील ऑपरेशन्स, मायनिंग, मेंटेनन्स आणि इंजिनीअरिंग अँड प्रोजेक्ट्समध्ये ‘इंजिनीअरिंग ट्रेनी’ पदांची भरती.—–

पात्रता – सिरॅमिक, केमिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेंटेशन / आयइएम डिसिप्लिनमधील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६५टक्के गुणांसह (६.५ सीजीपीएसह) २०२५ मध्ये उत्तीर्ण. (महाराष्ट्र, पंजाब, झारखंड आणि ओरिसा राज्यातील उमेदवारांना प्राधान्य.)

वय – (दि. १ जानेवारी २०२६ रोजी) ३० वर्षे. (अजा/अज/अपंग – ३२ वर्षे)

निवड पद्धती – पात्र उमेदवारांची कार्यात्मक डोमेन चाचणी (Functional Domain Test) नंतर वर्तणूक मूल्यमापन चाचणी (Behavioral Assessment Test) (एप्रिल २०२६ मध्ये) घेतली जाईल. यातून निवडलेल्या उमेदवारांना ‘डोमेन स्पेसिफिक’ इंटरह्यूसाठी (मे २०२६ मध्ये) बोलाविले जाईल.

स्टायपेंड – १ वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान इंजिनीअर ट्रेनीजना दरमहा रु. ३०,०००/- स्टायपेंड दिला जाईल. ट्रेनिंग दरम्यान वेळोवेळी तपासलेल्या कामगिरीनुसार ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्यांना असिस्टंट मॅनेजर पदावर (वेतन रु. ७.४ लाख सीटीसी आणि इतर भत्ते) नेमणूकीचा प्रस्ताव दिला जाईल. ट्रेनीजना आरोग्यविमा पॉलिसी अंतर्गत रु. २.५ लाखपर्यंतची वार्षिक भरपाई मिळू शकेल.

नेमणूकीचे ठिकाण – टाटा स्टील लि. च्या विविध डिव्हिजन्स/सबसिडिअरीज आणि जॉईंट व्हेंचर्स

या भरतीविषयी माहिती वेळोवेळी https://tatasteel.com/careers वर उपलब्ध करून दिली जाईल. ऑनलाइन लेखी परीक्षेसाठीचे कॉललेटर ऑफिशियल ई-मेल आयडी career@tatasteel.com वरून पाठविले जातील.

शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी – career@tatasteel.com मार्च २०२६ च्या दुसऱया/तिसऱया आठवड्यात सोडले जातील.

अर्ज कसा करावा – https://www.tatasteel.com/ या वेबसाईटवरील `Aspiring Engineer Programme २०२६’ टॅबवर क्लिक करून >; apply now लिंकवर ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म अॅक्सेस करता येईल. https://tslhr.tatasteel.co.in/recruit/AEP२६.aspx या लिंकवरून ९ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.