इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये (CME) असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होणार आहे. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे, ते इच्छुक उमेदवारांना त्यांचा बायोडेटा फक्त PDF स्वरूपात fcivilcme@gmail.com वर १५ मार्चपर्यंत पाठवू शकतात. असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांमधील वेगवेगळ्या ७१ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारांना ई-मेल किंवा फोन कॉलद्वारे भरतीसंदर्भात सूचित केले जाईल आणि मार्चमध्ये मुलाखत घेतली जाईल.

या’ रिक्त पदांसाठी होणार भरती प्रक्रिया

असोसिएट प्रोफेसर

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: १ पद

असिस्टंट प्रोफेसर

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: ४ पदे
  • इलेक्ट्रॉनिक्स: १ पद
  • थर्मल इंजिनिअरिंग: ११ पदे
  • मशीन डिझाइन: ६ पदे
  • फिजिक्स : २ पदे
  • केमिस्ट्री : २ पदे
  • कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी : ५ पदे
  • स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग: १२ पदे
  • सॉईल मेकॅनिक्स : २ पदे
  • वॉटर रिसोर्से इंजिनिअरिंग: १ पद
  • ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग : २ पदे
  • कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट : ८ पदे
  • एन्व्हायरमेंट इंजीनियरिंग : २ पदे
  • कंस्ट्रक्शन Drg/ आर्किटेक्चर Drg/ बिल्डिंग डिझाइन आणि Drg: ३ पदे
  • मॅथेमॅटिक्स : ६ पदे
  • जियोलॉजी: १ पद
  • इंग्रजी: १ पद
  • REVIT: १ पद

पगार:

उमेदवारांना असोसिएट प्रोफेसर पदासाठी ४०,००० आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ३१,५०० रुपये महिन्याचा पगार असेल.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
t plus zero settlement system marathi news, what is t plus zero settlement in marathi
विश्लेषण: आजच व्यवहार, आजच सेटलमेंट… शेअर बाजाराच्या T+0 प्रणालीचे आणखी कोणते फायदे?
Raghuram Rajan on PM narendra modi
‘मोदींचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे’, रघुराम राजन यांची टीका

वयोमर्यादा:

नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ६० वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त बोर्ड/संस्था/विद्यापीठातून संबंधित विषयात बॅचलर/मास्टर्स उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी, उमेदवारांना या अधिकृत लिंकवर क्लिक करा.