scorecardresearch

Premium

नोकरीची संधी  

निवड प्रक्रियेच्या स्टेज-२ परीक्षेच्या वेळी Provisional Diploma Certificate सादर करणे आणि वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे.

indian coast guard recruitment 2023
इंडियन कोस्ट गार्ड

सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

as expected market, Reserve Bank signal hike interest rates Nifty
Money Mantra: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला मार्केटचा थम्स अप; निफ्टी १९६०० च्या पलीकडे
Northern Coalfields Limited Bharti 2023
नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत ‘या’ पदाच्या ११४० जागांसाठी भरती सुरु, १० वी पास आणि ITI उमेदवार करु शकतात अर्ज
Reconsideration Petition NMMC removal parking condition houses permission redevelopment
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा? पार्किंगची अट काढावी यासाठी महापालिकेची पुनर्विचार याचिका
Parineeti Chopra and Raghav Chadha
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात; ‘अशी’ आहे विधी आणि कार्यक्रमाची वेळ

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) (संरक्षण मंत्रालय)मध्ये नाविक (जनरल डय़ुटी) नाविक (डोमेस्टिक ब्रँच) आणि यांत्रिक पदांची कोस्ट गार्ड एन्रोल्ड पर्सोनेल टेस्ट (CGEPT) मार्फत – ०१/२०२४ बॅचसाठी पुरुष उमेदवारांना प्रवेश. पदनिहाय रिक्त पदांची संख्या –

(१) नाविक (जनरल डय़ुटी) २६० (अजा – ४२, अज – ३५, इमाव – ५२, ईडब्ल्यूएस – २७, खुला – १०४).

पात्रता : १२ वी (फिजिक्स आणि मॅथ्स विषयांसह) उत्तीर्ण.

(२) नाविक (डोमेस्टिक ब्रँच) ३० पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).

पात्रता : १० वी उत्तीर्ण.

(३) यांत्रिक (मेकॅनिकल) २५ पदे (अजा – ४, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – ६, खुला – १).

(४) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) २ पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ८).

(५) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा समतूल्य डिप्लोमा.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

यांत्रिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ओरिजिनल डिप्लोमा प्रमाणपत्र धारण करत नसल्यास निवड प्रक्रियेच्या स्टेज-२ परीक्षेच्या वेळी Provisional Diploma Certificate सादर करणे आणि वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच ओरिजिनल डिप्लोमा प्रमाणपत्र निवड प्रक्रियेच्या स्टेज-३ च्यावेळी सादर करणे अनिवार्य आहे.

शारीरिक मापदंड : उंची – १५७ सें.मी., छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात  – १० टक्के

वयोमर्यादा : १८ ते २२ वर्षे. नाविक (जीडी) आणि नाविक (डीबी) पदांसाठी – (उमेदवाराचा जन्म दि. १ मे २००२ ते ३१ एप्रिल २००६ दरम्यानचा असावा.) (अजा/ अज – २७ वर्षेपर्यंत, इमाव – २५ वर्षेपर्यंत)

वेतन : नाविक पदांसाठी – पे-लेव्हल – ३, मूळ वेतन रु. २१,७००/-  इतर भत्ते. यांत्रिक पदांसाठी (पे-लेव्हल – ५) मूळ वेतन रु. २९,२००/- अधिक यांत्रिक पे रु. ६,२००/- आणि इतर भत्ते.

उमेदवारांना रु. ७५ लाखाचे विमा संरक्षण दिले जाईल. उमेदवारांस आणि त्यांच्या कुटुंबासाठी सरकारी निवास उपलब्ध असेल/निवास नको असल्यास ऌफअ दिला जाईल. उमेदवारांना रेशन आणि कपडे पुरविले जातील. स्वत:साठी आणि अवलंबून असलेल्यांसाठी मेडिकल सेवा दिली जाईल. निवृत्तीनंतर एउऌर मेडिकल सेवा उपलब्ध असेल. Canteen Facility (CSD) आणि इतर लोन फॅसिलिटी दिली जाईल.

निवड पद्धती : उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी https:// joinindiancoastguard. cdac. in/ cgept/ guidelines. html AFd¯F https:// joinindiancoastguard. cdac. in/ cgept/ assets/ img/ downloads/ doc/ various examples regarding document verification. pdf मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

हेही वाचा >>> तब्बल १५० सरकारी पदांसाठी भरती, सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी

उमेदवारांना स्टेज-१ ते स्टेज-४ पूर्ण कराव्या लागतील.

स्टेज-१ : लेखी परीक्षा – कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. (्र) मूळ कागदपत्र पडताळणी – (१) ओरिजिनल आयडेंटीटी प्रूफ, ऑनलाइन अर्जासोबत अपलोड केलेले (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट), (२) ई-अ‍ॅडमिट कार्डची रंगीत कॉपी, (३) ऑनलाइन अर्ज करताना अपलोड केलेल्या पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटोग्राफसारखे २ फोटोग्राफ्स, (४) अजा/ अजसाठी जातीचा दाखल्याच्या स्वयंसाक्षांकीत २ प्रती, मूळ ट्रेन/ बस तिकीट, NEFT पेमेंटसाठी रद्द केलेला चेक आणि ट्रव्हलिंग अलाऊन्स क्लेम करण्यासाठी वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला travel form.

(ii) बायोमेट्रिक रेकॉर्डिग

(iii) पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा द्यावी लागेल. सर्व पदांसाठी सेक्शन-१ अनिवार्य.

(i) नाविक (डीबी) पदांसाठी सेक्शन-१ – (एकूण ६० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे). (ज्यात गणित (२० गुण), विज्ञान (१० गुण), इंग्रजी (१५ गुण) जनरल नॉलेज (५ गुण) आणि रिझिनग (१० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न असतील.)

(ii) नाविक (जीडी) पदांसाठी सेक्शन-१ व सेक्शन-२ (ज्यात १२ वी स्तरावरील गणित आणि फिजिक्स विषयावर प्रत्येकी २५ प्रश्न.) (एकूण ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे); सेक्शन-१ मध्ये पात्रतेसाठी अजा/अजच्या उमेदवारांना २७ गुण आवश्यक. इतर उमेदवारांना ३० गुण; सेक्शन-२ मध्ये पात्रतेसाठी अजा/अजच्या उमेदवारांना १७ गुण आवश्यक, इतरांना २० गुण.

यांत्रिक पदांसाठी सेक्शन-३ (संबंधित इंजिनीअरींग डिप्लोमा स्तरावरील एकूण ५० प्रश्न, ५० गुणांसाठी वेळ ३० मिनिटे) (पात्रतेसाठी अजा/अजच्या उमेदवारांसाठी १७ गुण व इतरांसाठी २० गुण आवश्यक).

चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. (सर्व पदांसाठी स्टेज-१ लेखी परीक्षा डिसेंबर २०२३ मध्यास/ शेवटास होईल.)

स्टेज-२ : (i) चाचणी जानेवारी २०२४ च्या मध्यास/ शेवटास घेतली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीस (PFT) सामोरे जातील. (जी एक-दोन दिवसांची असेल.) PFT मध्ये १.६ कि.मी. ७ मिनिटांत धावणे, २० स्क्वॅटअप्स (उठक बैठक), १० पुशअप्स यांचा समावेश असेल. स्टेज-२ साठीचे ई-अ‍ॅडमिट कार्ड उमेदवारांनी ICG च्या वेबसाईटवर (दिलेल्या मुदतीत (३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ग्राह्य असलेली)) आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच जनरेट करता येतील. (ii) कागदपत्र पडताळणी, (iii) इनिशियल मेडिकल एक्झामिनेशनमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची स्टेज-१ मधील गुणवत्तेनुसार ऑल इंडिया मेरिट लिस्ट बनविली जाईल.

स्टेज-३ साठीचे अ‍ॅडमिट कार्ड एप्रिल २०२४ च्या शेवटास/मे २०२४ च्या सुरुवातीस उपलब्ध होतील. स्टेज-१ व स्टेज-२ मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांचा ज्यांचा ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये समावेश असेल, त्यांनी स्टेज-३ साठी E- admit Card ICG जारी करेल. इंडियन कोस्ट गार्डच्या (www. joinindiancoastguard.gov.in/cgept/ ) या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. (i) कागदपत्र पडताळणी, (ii) फायनल मेडिकल INS Chilk येथे, (iii) मूळ कागदपत्रे, पोलीस व्हेरिफिकेशन व इतर फॉम्र्स दाखल करणे.

स्टेज-४ जे उमेदवार स्टेज-३ मधील कागदपत्र पडताळणी पूर्ण करतील त्यांची फायनल मेरिट लिस्टप्रमाणे ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल.

उमेदवारांनी अर्जासोबत पुढील मूळ कागदपत्रे ((jpeg/ jpg format मध्ये) स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे.

(१) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (८ जून, २०२३ नंतर चष्मा न घालता काढलेला) (फोटो काढताना उमेदवारांनी कॅपिटल लेटरमध्ये आपले नाव आणि फोटो काढल्याचा दिनांक पांढऱ्या खडूने पाटीवर लिहून पाटी छातीजवळ पकडलेली असावी.) (२) उमेदवाराची स्कॅण्ड सिग्नेचर. (३) स्कॅण्ड डाव्या हाताच्या अंगठय़ाची प्रतिमा. (४) १० वीचे गुणपत्रक किंवा जन्मतारखेचा दाखला. (इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील). (५) ईडब्ल्यूएस/ अजा/ अज/ इमाव (NCL) सर्टिफिकेट्स. (६) फोटो आयडेंटिटी प्रूफकरिता – आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड इ.

स्टेज-२ साठी शॉर्टलिस्ट झाल्यास काही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. दोन्ही पदांसाठी (१) कॅटेगरी सर्टिफिकेट (अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस) (२) १० वीचे गुणपत्रक, (३) १० वीचे प्रमाणपत्र याशिवाय नाविक (जीडी) पदांसाठी, (४) १२ वीचे गुणपत्रक, (५) १२ वीचे प्रमाणपत्र, (६) यांत्रिक पदांसाठी १२ वी उत्तीर्ण (केली असल्यास) प्रमाणपत्र व गुणपत्रक तसेच डिप्लोमा प्रमाणपत्र आणि डिप्लोमाच्या सर्व सेमिस्टर्सचे गुणपत्रक.

स्टेज-१ व स्टेज-२ साठी परीक्षा केंद्र – उमेदवारांनी आपल्या राहत्या घरापासून ३० कि.मी. अंतराच्या आतील असलेल्या परीक्षा केंद्राला प्रथम पसंती देणे आवश्यक आहे. जर राहत्या घरापासून ३० कि.मी. अंतराच्या आत परीक्षा केंद्र नसल्यास सर्वात जवळच्या परीक्षा केंद्रास प्रथम पसंती द्यावी. एकूण ५ केंद्रांना पसंती देणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क : रु. ३००/- (फक्त ऑनलाइन मोडने). (अजा/अजसाठी फी माफ आहे.)

ट्रेनिंग : नाविक (जीडी) व नाविक (डीबी) व यांत्रिक पदासाठी एप्रिल, २०२४ च्या शेवटास किंवा मे २०२४ च्या सुरुवातीस कठर, चिल्का येथे ट्रेनिंग सुरू होईल. त्यानंतर दिलेल्या ट्रेडमधील प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाईल.

उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज https://www.joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या संकेतस्थळावर दि. २२ सप्टेंबर २०२३ (१७.३० वाजे) पर्यंत भरावयाचे आहेत.

शंकासमाधानासाठी फोन नं. ०२०-२५५०३१०८/२५५०३१०९ किंवा ई-मेल icgcell@cdac. in वर संपर्क साधावा. स्टेज-१ साठी परीक्षा केंद्राचे (शहराचे) नाव परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उमेदवारांना Candidate Login वर उपलब्ध करून दिले जाईल. अ‍ॅडमिट कार्ड परीक्षेच्या पूर्वी २-३ दिवस अगोदर Candidates login वर आणि ई-मेल द्वारे उपलब्ध करून दिले जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian coast guard recruitment 2023 job opportunities in indian coast guard zws

First published on: 21-09-2023 at 04:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×