● इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. ( IOCL) (भारत सरकारचा एक उपक्रम). IOCL आपल्या ५ झोन्समधील पाइपलाइन डिव्हीजन्समध्ये ३९४ टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ट्रेड अॅप्रेंटिस पदांची भरती.

ट्रेड व झोननिहाय रिक्त पदे – वेस्टर्न रिजन पाइपलाइन्स ( WRPL) – १३६ पदे; ईस्टर्न रिजन पाइपलाइन्स ( ERPL) – १०१ पदे; नॉदर्न रिजन पाइपलाइन्स ( NRPL) – ५४ पदे; सदर्न रिजन पाइपलाइन्स ( SRPL) – ४० पदे; साऊथ ईस्टर्न रिजन पाइपलाइन्स ( SERPL) – ६३ पदे. ( WRPL मध्ये महाराष्ट्र (अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर), गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यांतील IOCL च्या लोकेशन्सचा समावेश होतो.)

(१) टेक्निशियन अॅप्रेंटिस – मेकॅनिकल –

पात्रता – (दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा

(२) टेक्निशियन अॅप्रेंटिस – इलेक्ट्रिकल –

पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(३) टेक्निशियन अॅप्रेंटिस – टेली कम्युनिकेशन अँड इन्स्ट्रूमेंटेशन –

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(४) ट्रेड अॅप्रेंटिस – असिस्टंट ह्युमन रिसोर्स –

पात्रता – पूर्ण वेळ पदवी उत्तीर्ण.

(५) ट्रेड अॅप्रेंटिस – अकाऊंट्स –

पात्रता – कॉमर्समधील पूर्ण वेळ पदवी उत्तीर्ण.

(६) फ्रेशर अॅप्रेंटिससेस – डेटा एन्ट्री ऑपरेटर –

पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण (परंतु अर्ज करण्याच्या दिवशी उमेदवार पदवीधर नसावा.)

(७) डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर)

पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण (परंतु पदवीधर नसावा.) आणि डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेट.

वयोमर्यादा – (३१ जानेवारी २०२६ रोजी) १८-२४ वर्षे. अर्ज कसा करावा – टेक्निशियन अॅप्रेंटिसेस आणि ट्रेड अॅप्रेंटिस (असिस्टंट ह्युमन रिसोर्स/अकाऊंटंट) साठी https:// nats. education. gov. in/ studentregister. php या NATS पोर्टलवर ट्रेड अॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी https:// www. apprenticeshipindia. gov. in या NAPS पोर्टलवर आपले नाव रजिस्टर करावे. (त्यानंतर संबंधित NATS/ NAPS पोर्टलवर यूजर आयडी/ ई-मेल आयडी वापरून लॉगिन करावे आणि आयओसीएलचा एस्टॅब्लिशमेंट आयडी वापरून अर्ज करावेत. इंडियन ऑईल पाइपलाइन पोर्टलवर अर्ज प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करावी.

वेस्टर्न रिजन पाईपलाईन्स (WRPL) संबंधित शंका wrplapprentice@indianoil. in या ई-मेल आयडीवर ट्रेड कोड लिहून पाठवाव्यात.

शंकासमाधानासाठी पोर्टलवरील FAQ पाहून घ्यावे. विस्तृत जाहिरात https:// www. iocl. com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.