Intelligence Bureau Bharti 2023: गुप्तचर विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो येथील भरतीसाठीची एक अधिसूचना गृह मंत्रालयाने जाहीर केली आहे. ज्यामध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदांसाठीची भरतीची माहिती देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊया. इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ - पदाचे नाव - कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदसंख्या - ७९७ जागा हेही वाचा- सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कंपनी सचिव पदासाठी भरती सुरु, महिना २ लाखांहून अधिक पगार मिळणार नोकरी ठिकाण - मुंबई, नागपूर वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे अर्ज शुल्क - UR, OBC, आणि EWS पुरुष उमेदवार - ५५० रुपये. इतर श्रेणीतील उमेदवार आणि महिला - ४५० रुपये. अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन महत्वाच्या तारखा - अर्ज सुरू होण्याची तारीख - ३ जून २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २३ जून २०२३ अधिकृत वेबसाईट - www.mha.gov.in शैक्षणिक पात्रता - कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) - Engg. Diploma in ECE/ EEE/ IT/ CS, B.Sc.,Degree in Computer Applications. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात पाहावी. पगार - या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.