IOCL Bharti 2024 : तुम्ही नोकरीच्या शोधात आहे का? तुम्हाला इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) कंपनीत नोकरी करायची इच्छा आहे? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे, असे म्हणावे लागेल. इंडियन ऑईल iocl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ ऑक्टोबर २०२४ आहे. चला तर या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Law Officer in Grade A: लॉ ऑफिसर इन ए ग्रेड : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये लॉ ऑफिसर इन ए ग्रेड या पोस्टसाठी भरती आहे.

पात्रता : कामाचा अनुभव पात्रतेमध्ये मोजला जाईल

१. न्यायालये किंवा न्यायाधिकरणांमध्ये वकील म्हणून सराव करणारे उमेदवार
२. लॉ फर्म्समध्ये काम करणारे उमेदवार
३. खाजगी/सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसोबत काम करणारे उमेदवार
४. केंद्र/राज्य सरकारांसोबत काम करणारे उमेदवार

वयाची अट : या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आली आहे. ३० वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे शिक्षणाच्या अटीमध्ये थोडी सूटही देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया : PG CLAT 2024 परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप टास्कदेखील दिले जातील. शेवटी उमेदवाराला मुलाखतदेखील द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल

इंडियन ऑईल अधिकारी पगार

या पदांसाठी निवडलेल्यांना ५०,००० रुपये प्रति महिना मूळ वेतन मिळेल आणि त्यांना ५०,००० ते १,६०,००० रुपये वेतनश्रेणीमध्ये ठेवण्यात येईल. याशिवाय, त्यांना महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्ते मिळतील. इतर फायद्यांमध्ये वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी इत्यादींचा समावेश होतो.

हेही वाचा >> RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा

इंडियन ऑईल लॉ ऑफिसर भरती 2024 – अर्ज कसा करावा

सध्याच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केले जाऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक इंडियन ऑईलच्या https://iocl.com/latest-job-opening http://www.iocl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करावे.

अर्ज प्रक्रियेच्या सुरुवातीला उमेदवाराला भरती पोर्टलवर खालील तपशील विचारले जातील:
PG CLAT 2024 प्रवेशपत्र क्रमांक
PG CLAT 2024 अर्ज क्रमांक
जन्मतारीख
PG CLAT 2024 मध्ये मिळालेला स्कोअर
त्यानंतर अर्ज प्रक्रियेत पुढे जाण्याची परवानगी फक्त तेव्हाच दिली जाईल, जेव्हा केलेल्या नोंदी PG CLAT 2024 डेटाबेसशी जुळत असल्याचे आढळून येईल.