IOCL Apprentice Recruitment 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पहात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइलने २०२५ सालासाठी अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत १,७७० रिक्त पदांवर उमेदवारांची नियुक्त केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार iocl.com वेबसाइटवर जाऊन अर्ज भरण्यासह भरतीसंदर्भात सर्व माहिती मिळवू शकतात.
रिक्त जागा
या भरती प्रक्रियेअंतर्गत ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदाच्या १,७७० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
इंडियन ऑइलमधील ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर उमेदवार B.Sc (Maths, Physics, Chemistry, Industrial Chemistry) किंवा ITI (Fitter) किंवा B.A./B.Sc/B.Com किंवा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical /Mechanical/Electrical and Electronics/Instrumentation Engg/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation) मध्ये पदवी प्राप्त केलेला असावा. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा
इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ मे २०२५ पर्यंत १८ ते २४ वर्षेदरम्यान असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क नाही.
निवड प्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा? (IOCL Recruitment 2025 How To Apply Online)
१) तुम्ही सर्वप्रथम iocl.com या वेबसाइटवर जा.
२) यानंतर Apprentice Recruitment 2025 सेक्शनवर क्लिक करा.
३) यानंतर रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा.
४) आता फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
५) शेवटी सर्व फॉर्म नीट वाचून सबमिट करा आणि प्रिंटआउट काढा.