सुहास पाटील
इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया ( IRDAI) ( Ref. HR/ Recruitment/ August/ २०२४ dt. २१.०८.२०२४) ‘असिस्टंट मॅनेजर’च्या एकूण ४९ पदांची भरती. (अजा – ८, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २१) स्ट्रीमनुसार असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांचा तपशील –
(१) जर्नालिस्ट – २४ पदे.
पात्रता : (दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी) पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) रिसर्च – ५ पदे.
पात्रता : इकॉनॉमिक्स/ इकॉनोमॅट्रिक्स/ क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स/ मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/ इंटिग्रेटेड इकॉनॉमिक्स कोर्स/ स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/ अॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉरमेटिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका (२ वर्षं कालावधीची) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(३) आयटी – ५ पदे.
पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
हेही वाचा >>> RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज
किंवा मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि कॉम्प्युटरर्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयातील २ वर्षं कालावधीची पदव्युत्तर पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(४) लॉ – ५ पदे.
पात्रता : कायदा विषयातील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(५) फिनान्स – ५ पदे.
पात्रता : पदवी किमान ६० टक्के गुण आणि ACA/ ACWA/ ACMA/ ACS/ CFA.
(६) अॅक्च्युरियल – ५ पदे.
पात्रता : पदवी किमान ६०टक्के गुण आणि IAI चे ७ पेपर्स उत्तीर्ण.
अजा/अज उमेदवारांना पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण आवश्यक.
वेतन श्रेणी : मूळ वेतन रु. ४४,५००/- डी.ए. एचआरए क्वालिफिकेशन अलाऊन्स सिटी कॉम्पेसेंटरी अलाऊन्स ग्रेड अलाऊन्स आणि इतर भत्ते. अंदाजे दरमहा वेतन रु. १,४६,०००/-.
वयोमर्यादा : (दि. २० सप्टेंबर २०२४) रोजी २१ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/ अज – ५ वर्षे; दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे)
निवड पद्धती : फेज-१ ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन १६० प्रश्न, १६० गुणांसाठी वेळ ९० मिनिटे. (ऑब्जेक्टिव्ह टाईप) पात्रता स्वरूपाची यातून १०० गुणांचे ३ पेपर्स. फेज-२ डिस्क्रीप्टिव्ह एक्झामिनेशनसाठी रिक्त पदांच्या २० पट उमेदवार निवडले जातील. फेज-३ इंटरह्यू. अंतिम निवड फेज-२ मधील गुणांना ८५ टक्के वेटेज व इंटरह्यूमधील गुणांना १५ टक्के वेटेज देवून केली जाईल.
परीक्षा केंद्र : (फेज-१ व फेज-२ साठी महाराष्ट्रातील) मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR Region.
अर्जाचे शुल्क आणि इंटिमेशन चार्जेस : रु. ७५०/- (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी रु. १००/-) (फक्त इंटिमेशन चार्जेस)
प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग :- मुंबई/ दिल्ली/ हैदराबाद येथे दिले जाईल.
उमेदवारांनी Annexure-t मधील अर्ज CGM ( HR), IRDAI, Survey No. ११५/१,, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032 येथे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पाठवावेत.
www.irdai.gov.in या वेबसाईटवरील ‘Careers’ Tab वर विस्तृत जाहिरात उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०२४ आहे.