ISRO Recruitment 2023: इस्त्रोमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इस्त्रोतर्फे एक अधिसूचना जाहीर केली आहे ज्यानुसार, विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये टेक्निशिअन ए, ड्राफ्टसमन बी आणि रेडिओग्राफर ए या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या मोहिमेनुसार इच्छूक उमेदवार इस्त्रोच्या अधिकृत संकेतस्थळ vssc.gov.in आणि isro.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेतंर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ४ मे पासून सुरु झाली आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२३ आहे. इस्त्रो भरती २०२३ : तपशील या भरती मोहिमेतंर्गत संस्थेमध्ये ४९ पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशिअन ए साठी ४३ पदे, ड्राफ्ट्समॅन बी पदासाठी ५ पदे आणि रेडिओग्राफर पदासाठी एका पदावर भरती केली जाईल. इस्त्रो भरती २०२३ : शैक्षणिक पात्रता या भरती प्रक्रियेतंर्गत या पदासाठी अर्ज करणारा इच्छूक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून १० वी पास असला पाहिजे. तसेच उमेदवाराला संबधित ट्रेड आयटीआय पास ( ITI pass) असणे आवश्यक आहे. हेही वाचा : बँक ऑफ बडोदामध्ये १५७ पदांसाठी होणार भरती, ८० हजारांहून अधिक मिळू शकतो पगार, या तारखेपूर्वी भरा अर्ज इस्त्रो भरती २०२३ : वयोमर्यादा या भरती मोहिमेंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त असू नये इस्त्रो भरती २०२३ : किती मिळेल पगार टेक्निशिअन ए लेवल ०३- २१७०० रुपये पासून ६९१०० रुपयेड्राफ्ट्समॅन-बी- लेवल ०३ - २१७०० रुपये पासून ६९१०० रुपयेरेडियोग्राफर-ए- लेवल ०४- ३५५०० रुपये पासून ८११०० रुपये हेही वाचा : भारतीय समुद्री विश्वविद्यालयात नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता निकष इस्त्रो भरती २०२३ : या तारखांकडे ठेवा लक्ष ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची सुरूवात ४ मे २०२३ऑनलाई अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ मे २०२३ इस्त्रो भरती २०२३ : इतके अर्ज शुल्क भरावे लागेल या भरती अभियांनातंर्गत सामान्य व ओबीसी वर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. जेव्हा आरक्षित श्रेणीच्या उमेदवारांसाठी शुल्क शुन्य रुपये करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाची मदत घेऊ शकता.