डिपार्टमेंट ऑफ स्पेस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO). ISRO सेंट्रलाईज्ड् रिक्रूटमेंट बोर्ड (ICRB) मार्फत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर्सची ISRO च्या घटक केंद्रांमध्ये ‘सायंटिस्ट/इंजिनिअर एस्सी’ ग्रुप-ए (गॅझेटेड) पदांची भरती. एकूण रिक्त पदे – 175. (Advt. No. ISRO:ICRB:03 (EMC)2026 dtd. 22.08.2026)
इस्त्रोच्या घटक संस्था – (1) एचएसएफसी, बेंगलुरू; (2) आयपीआरसी, महेंद्रगिरी; (3) एलपीएसी, वलियमला; (4) एसएसी, अहमदाबाद; (5) यूआरएससी, बेंगलुरू.

(1) सायंटिस्ट/इंजिनिअर एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) (Post Code BE001) – 99 पदे (21 पदे दिव्यांग (कॅटेगरी A-1, B-16, C-3, D-1, E-1) उमेदवारांसाठी राखीव) (Post Code BE001A) 1 पद (स्वायत्त संस्था PRL साठी)
पात्रता – B.E./B.Tech. (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरींग) सरासरी 65… गुणांसह (CGPA 6.84/10) उत्तीर्ण.
(2) सायंटिस्ट/इंजिनिअर एस्सी (मेकॅनिकल) (Post Code BE002) – 52 पदे (17 पदे दिव्यांग (कॅटेगरी A-3, B-9, C-4, E-1) साठी राखीव). (Post Code BE002A) 1 पद (स्वायत्त संस्था PRL साठी)

पात्रता – B.E./B.Tech. (मेकॅनिकल इंजिनिअरींग) सरासरी 65… गुणांसह (CGPA 6.84/10) उत्तीर्ण.

(3) सायंटिस्ट/इंजिनिअर एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) (Post Code BE003) – 21 पदे (9 पदे दिव्यांग (कॅटेगरी A-4, B-2, C-1, D-1) साठी राखीव) (Post Code BE003A) 1 पद (स्वायत्त संस्था PRL साठी)
पात्रता – B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग) सरासरी 65… गुणांसह (CGPA 6.04/10) उत्तीर्ण.
डिग्रीच्या अंतिम परीक्षेस 2024-25 मध्ये बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. निकाल दि. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावा लागेल.

वरील सर्व पदांसाठी संबंधित इंजिनिअरींग पदवीबरोबर अलाईड इंजिनिअरींग पदवीधारकसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत. (ISRO च्या वेबसाईटवरील FAQ सेक्शनमध्ये अलाईड इंजिनिअरींग पदवीची लिस्ट उपलब्ध आहे.)
वयोमर्यादा – (दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी) 28 वर्षे (दिव्यांग/माजी सैनिक/शासकीय कर्मचारी यांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.)

वेतन – पे-मॅट्रिक्स लेव्हल-10 रु. 56,100/- अधिक इतर भत्ते अंदाजे वेतन दरमहा रु. 1.15 लाख.
अर्जाचे शुल्क – रु. 750/-. (अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2026 आहे.) (अर्जाचे शुल्क भरण्यासाठी लिंक ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर ISRO च्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल.) लेखी परीक्षेस बसलेल्या अजा/अज/माजी सैनिक/दिव्यांग/महिला उमेदवारांना रु. 750/- परत केले जातील. इतर उमेदवारांना रु. 500/- परत केले जातील. त्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सिस्टीम जनरेटेड ई-मेलद्वारे पेमेंटची पावती मिळाल्याची खात्री करून घेणे आवश्यक.

निवड पद्धती – लेखी परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद, अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, नवी दिल्ली इ. 37 केंद्रांवर घेतली जाईल.
लेखी परीक्षा 120 मिनिटांसाठी एक पेपर ज्यात पार्ट-ए विषयाशी संबंधित 80 ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ प्रश्न विचारले जातील. वेळ 90 मिनिटे. प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.

पार्ट-बी – अॅप्टिट्यूड/अॅबिलिटी टेस्ट ज्यात 20 गुणांसाठी 15 MCQ प्रश्न विचारले जातील. न्यूमरिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, Diagrammatic Reasoning, अॅब्स्ट्रक्ट रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंग यावर आधारित. वेळ 30 मिनिटे. यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
पार्ट-सी – मुलाखत – मुलाखतीमधील गुणांची विभागणी (1) टेक्निकल नॉलेज – 40 गुण, (2) स्पेशलायझेशनशी संबंधित जनरल अवेअरनेस – 20 गुण, (3) प्रेझेंटेशन/कम्युनिकेशन स्किल – 20, (4) कॉम्प्रिहेन्शन – 10 गुण, (5) अॅकॅडेमिक अचिव्हमेंट्स – 10 गुण, एकूण 100 गुण. लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित रिक्त पदांच्या 5 पट उमेदवार इंटरह्यूकरिता निवडले जातील.

लेखी परीक्षेतील गुणांना 50… वेटेज व मुलाखतीमधील गुणांना 50… वेटेज देऊन अंतिम निवड यादी बनविली जाईल.
शंकासमाधानासाठी उमेदवारांनी ISRO च्या वेबसाईटवरील फ्रीक्वेंटली आस्क्ड् क्वेश्चन (FAQ) चे अवलोकन करावे. FAQ मध्ये उत्तर न मिळाल्यास rmt-icrb@isro.gov.in वर मेल पाठवावा.

लेखी परीक्षेनंतर 3 कामकाजाच्या दिवसांनंतर ISRO च्या वेबसाईटवर उत्तर तालिका (Answer Keys) प्रसिद्ध केल्या जातील. ज्यावरील आक्षेप उमेदवारांना 5 दिवसांच्या आत लेखी परीक्षेनंतर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमधून घेता येतील.
ऑनलाइन अर्ज http://www.isro.gov.in या संकेतस्थळावर दि. 16 सप्टेंबर 2026 (23.55 वाजे)पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जासोबत जाहिरातीमधील पॅरा 10(iii) मध्ये नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.
सुहास पाटील 9892005171