इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) (गृहमंत्रालय, भारत सरकार) पुरुष उमेदवारांची हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) ग्रुप-सी पदांवर भरती. एकूण रिक्त पदे – ५१.

(१) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) ४४ पदे (अजा – ७, अज – ७, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – १७). वेतन श्रेणी – लेव्हल-३ (रु. २१,७०० ६९,१००), अंदाजे वेतन दरमहा रु. ५१,०००/-.

All about the Indian Forest Service
नोकरीची संधी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Central Civil Services information in marathi
मुलाखतीच्या मुलखात : केंद्रीय सेवा
Zomato CEO makes new revelation regarding recruitment of Chief of Staff
‘चिफ ऑफ स्टाफ’च्या भरतीबाबत झोमॅटोच्या सीईओनी केला नवा खुलासा! वाचा काय म्हणाले दीपिंदर गोयल?
supreme court recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयात भरती
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी

पात्रता – (१) १० वी उत्तीर्ण आणि (२) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट किंवा संबंधित ट्रेडमधील किमान ३ वर्षांचा अनुभव.

(२) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) ७ पदे (अज – ३, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २). वेतन श्रेणी – लेव्हल-४ (रु. २५,५०० ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४४,०००/-.

पात्रता – (१) १२ वी उत्तीर्ण आणि (२) संबंधित ट्रेडमधील नावाजलेल्या वर्कशॉपमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरींगमधील ३ वर्षं कालावधीचा डिप्लोमा.

वयोमर्यादा – (दि. २२ जानेवारी २०२५ रोजी) १८ ते २५ वर्षे.

हेही वाचा >>> ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?

शारीरिक मापदंड – उंची – १७० सें.मी., छाती – ८०८५ सें.मी. (गडचिरोली, गोंदिया जिह्यातील अनुसूचित जमातीचे उमेदवार – उंची – १६२.५ सें.मी., छाती – ७६८१ सें.मी.)

दृष्टी – जवळची दृष्टी (चष्म्याशिवाय चांगला डोळा – एन-६, खराब डोळा – एन-९; दूरची दृष्टी – चष्म्याशिवाय – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/९).

निवड पद्धती – भरती प्रक्रियेसाठी अॅडमिट कार्ड उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येतील. (http://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावेत.)

फेज-I (१) शारीरिक क्षमता चाचणी (PET) (I) १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे. (II) लांब उडी – ११ फूट, (III) उंच उडी – ३ १/२ फूट (लांब उडी व उंच उडीसाठी ३ प्रयत्न देण्यात येतील.)

(२) शारीरिक मापदंड चाचणी (PST) शारीरिक क्षमता चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची उंची, छाती आणि वजन मोजले जाईल. कमी वजनाचे किंवा जास्त वजनाचे उमेदवारांना PSTमधील पात्रता तपशिलवार वैद्याकिय तपासणी (DME) च्या वेळी ठरविली जाईल.

फेज-II (३) PET/PST उत्तीर्ण उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी बोलाविले जाईल.

(४) लेखी परीक्षा – १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न, वेळ २ तास (सामान्यज्ञान – १० प्रश्न, गणित १० प्रश्न, हिंदी किंवा इंग्रजी – २० प्रश्न, ट्रेड संबंधित – ६० प्रश्न) हिंदी विषयाचे प्रश्न वगळता इतर विषयांचे प्रश्न हिंदी/इंग्रजी भाषेत विचारले जातील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुला/ईडब्ल्यूएस – ३५गुण व मागासवर्गीय – ३३ गुण मिळविणे आवश्यक.

फेज-III – (५) प्रॅक्टिकल (स्किल) टेस्ट – लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांमधून रिक्त पदांच्या १० पट उमेदवार प्रॅक्टिकल टेस्टसाठी निवडले जातील.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- ऑनलाइन मोडने भरावे. (अजा/अज/माजी सैनिकांना फी माफ आहे.)

शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी comdtrect@itbp.gov.in किंवा हेल्पलाईन नंबर ०११२४३६९४८२/२४३६९४८३ वर संपर्क साधा.

ऑनलाइन अर्ज http://recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. suhaspatil237@gmail.com

Story img Loader