भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC), ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट – इंजिनीअिरग पोस्ट ग्रॅज्युएट्सना डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी (DAE) डॉक्टोरल फेलोशिप स्कीम (DDFS) प्रोग्राम – २०२५ अंतर्गत पीएच.डी. (Ph. D.) साठी प्रवेश. जुलै २०२५ च्या तिसरम्या आठवडय़ापासून सुरू होणारा  DDFS प्रोग्राम हा होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट (HBNI) (एक मानीव विद्यापीठ –  a deemed to be university) च्या छत्रछायेमध्ये चालविला जातो.

निवडलेल्या उमेदवारांना HBNI च्या पुढील घटक संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.

mumbai metropolitan region development planning by mmrda
एमएमआर ग्रोथ हबसाठी अंमलबजावणी कक्षनियोजन विभागाकडून स्थापना, आर्थिक विकास वाढीसाठी अनेक प्रकल्प
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mahavitaran 100 days target news
मागेल त्याला सौर कृषी पंप; ‘महावितरण’चे १०० दिवसांचे उद्दिष्ट ६० दिवसांत पूर्ण
Nuclear Reactor Understanding how it works
कुतूहल : अणुभट्ट्या आणि त्यांचे कार्य
solarium green energy to raise rs 105 crore through ipo
सोलेरियम ग्रीन एनर्जी ‘आयपीओ’द्वारे १०५ कोटी उभारणार!
article on cheaper electricity in loksatta pahili baaju
विजेचे अनाकलनीय गणित
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
Uraninite and monazite assessment in marathi
कुतूहल: युरेनिनाइट आणि मोनाझाइट

(१) भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC), मुंबई</p>

(२) इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रिसर्च (IGCAR), कल्पक्कम

(३) इन्स्टिटय़ूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च (IPR), गांधीनगर

(४) वेरिएबल एनर्जी सीक्लोट्रॉन सेंटर (VECC), कोलकता

या संस्थांमध्ये इंजिनीअिरगच्या विविध ब्रँचेसमध्ये संशोधन केले जाते. जसे की, केमिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, मेकॅनिकल, मेटॅलर्जिकल किंवा मटेरियल्स अँड न्यूक्लियर. डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जीचा अणुऊर्जा कार्यक्रमाचा विस्तार पाहता इंजिनीअिरग सायन्सेसमधील पीएच.डी. प्रोग्राम हा अत्यंत आव्हानात्मक आहे.

DDFS प्रोग्राम अंतर्गत मिळणारे फेलोशिप आणि भत्ते – दरमहा रु. ८०,०००/-. फेलोशिप आणि पीएच.डी. संबंधित खर्चासाठी वार्षिक रु. ६०,०००/- आकस्मिक  अनुदान दिले जाते. 

पीएच.डी. प्रोग्रामच्या वेळी विद्यार्थ्यांना वसतीगृह निवास अनिवार्य आहे.

पात्रता : (केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, मेकॅनिकल, मेटॅलर्जी/मटेरियल सायन्स आणि सिव्हील इंजिनीअिरगमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी सरासरी किमान ६० टक्के गुणांसह (६.०  CGPA on the scale of १०.०) उत्तीर्ण. (इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पात्रता परीक्षेच्या अंतिम परीक्षेला बसणारे उमेदवार ज्यांना दुसऱ्या सेमिस्टपर्यंतचे  CGPA गुण निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील.

कमाल वयोमर्यादा : २८ वर्षे. खुला प्रवर्गामधील उमेदवाराचा जन्म दि. १ ऑगस्ट १९९७ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. 

अर्जाचे शुल्क : रु. ५००/-. 

निवड पद्धती :  DDFS प्रोग्रामसाठी निवड दोन चरण प्रक्रियेतून केली जाईल. (१) ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षेतील कामगिरी आणि पात्रता परीक्षेतील गुण यांना समान वेटेज देऊन उमेदवार इंटरव्ह्यूकरिता शॉर्टलिस्ट केले जातील. (२) सिलेक्शन इंटरव्ह्यू.

ऑनलाइन  DDFS–२०२५ स्क्रीनिंग परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण ३०० गुण, वेळ १२० मिनिटे) देशभरातील ५० केंद्रांवर ८ व ९ मार्च २०२५ रोजी घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.

स्क्रीनिंग टेस्टचा अभ्यासक्रम हा संबंधित इंजिनीअिरग पदवीच्या अभ्यासक्रमासारखा असेल. सिलेक्शन इंटरव्ह्यूकरिता शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी  https://www.barcocesexam.in पोर्टलवर एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध केली जाईल. सिलेक्शन इंटरव्ह्यू  BARC ट्रेनिंग स्कूल, मुंबई येथे १८ ते २० जून २०२५ रोजी घेतले जातील. बाहेर गावाकडील उमेदवारांना सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी येण्या-जाण्याचा प्रवासखर्चाचा परतावा दिला जाईल. (AC- III रिटयर रेल्वे भाडे)

इंटरव्ह्यूच्या वेळी उमेदवारांना त्यांच्या एम.टेक. मधील प्रोजेक्टबद्दल १० मिनिटांचे प्रेझेंटेशन द्यावे लागेल.

तात्पुरती निवड यादी/अंतिम निवड यादी जून २०२५ च्या शेवटच्या आठवडय़ात प्रसिद्ध केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएस द्वारा सूचित केले जाईल. त्यांची मेडिकल टेस्ट १८ जुलै २०२५ रोजी घेतली जाईल.

उमेदवार फक्त एकाच  DDFS स्क्रीनिंग एक्झामिनेशन डिसिप्लिनसाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करावयाची कागदपत्रे – ४.५ x ३.५ सें.मी. आकाराचा फोटोग्राफ (JPG/ JPEG format file size २०-५०  KB), सिग्नेचर (२ x ४.५ सें.मी.) (JPG/ JPEG format, file size 10-20 KB), सेम-१, सेम-२ स्कोअर कार्ड आणि जातीचा दाखला (लागू असल्यास) (file size 200-300 KB)  PDF किंवा JPG/ JPEG format

ऑनलाइन अर्जात काही सुधारणा/बदल करावयाचा असल्यास correction window दि. ७ ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करता येईल.

ऑनलाइन अर्ज  https://www.barcocesexam.in या संकेतस्थळावर दि. २६ जानेवारी २०२५ पर्यंत करता येतील.

Story img Loader