scorecardresearch

‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! महापारेषण अंतर्गत २,५४१ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण २५४१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Mahatransco Bharti 2023
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mahatransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) येथे ‘विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २’ या पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण २५४१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३

jobs in india
‘मनरेगा’साठी १२६६ कंत्राटी अभियंत्यांची भरती
Academic Bank of Credit website
‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ संकेतस्थळावरील विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्राची आघाडी, देशभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
gold and ed
कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीचं आरोपपत्र दाखल, अधिकाऱ्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे, बार अन्…
School Ministry
“शाळांऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्या”, महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती आक्रमक

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २

एकूण पदसंख्या – २,५४१

शैक्षणिक पात्रता –

विद्युत सहाय्यक (पारेषण) – राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.

वरिष्ठ तंत्रज्ञ/तंत्रज्ञ १/ तंत्रज्ञ २ – शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.

वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २० नोव्हेंबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

असा करा अर्ज –

  • उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/131xCxvAy1fAbFsAscldLbzVQY5SZ_EzX/view

https://drive.google.com/file/d/1tib-lNGRRgMmc9GHGqCHv3rmoJ0nUGV7/view

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunities for these candidates in mahatransco recruitment starts for 2541 posts under mahapareshan apply today jap

First published on: 20-11-2023 at 12:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×