इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) (रिफायनरिज डिव्हीजन) (IOCL च्या गुजरात, गुवाहाटी, बरौनी, हालदिया, मथुरा, पानिपत, दिग्बोई, बोंगाइगाव, पॅरादिप रिफायनरिजमध्ये) नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ३९४. पोस्ट कोडनिहाय रिक्त पदांचा तपशील –
(२०१) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – एकूण २३२ (गुजरात – ७५ (अजा – ५, अज – ११, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३२); मथुरा – १२, पानिपत – १९ इ.).
पात्रता – केमिकल/पेट्रोकेमिकल/रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.एससी. (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्री).
(२०२) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट-IV (पी अँड यू) – एकूण ३७ (गुजरात – ११ (अजा – १, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४); मथुरा – ०, पानिपत – ० इ.).
पात्रता – मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम इ. विषयांतील इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.एससी. (मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
आणि दुसऱया वर्गासह बॉयलर कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट किंवा बॉयलर अटेंडंट ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC).
(२०३) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट-IV (पी अँड यू – ओ अँड एम) – २२ (गुजरात – ०; मथुरा – ०, पानिपत – १९ (अजा – ४, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९) इ.).
(२०४) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्यु. टेक्निकल असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल) – १२ (गुजरात – १ (अज); मथुरा – ०, पानिपत – ० इ.).
पद क्र. २०३ व २०४ साठी पात्रता – इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम इ. इंजिनीअरिंग विषयातील डिप्लोमा.
(२०५) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्यु. टेक्निकल Deefmemìbì-IV (मेकॅनिकल) – १४ (गुजरात – ०, मथुरा – ०, पानिपत – २ (इमाव – १, खुला – १) इ.).
पात्रता – मेकॅनिकल/मेकॅनिकल (प्रोडक्शन) इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(२०६) ज्यु. इंजिनीअरिंग असिस्टंट-IV/ज्यु. टेक्निकल असिस्टंट-IV (इन्स्ट्रूमेंटेशन) – ६ (गुजरात – १ (खुला), मथुरा – ०, पानिपत – २ (खुला) इ.).
पात्रता – इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(२०७) ज्यु. क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट – २० (गुजरात – ४ (इमाव – १, खुला – ३), मथुरा – ०, पानिपत – ४ इ.).
पात्रता – बी.एससी. (मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्री).
(२०८) ज्यु. इंजिनीअरिंग Deefmemìbì-IV (फायर अँड सेफ्टी) – ५१ (गुजरात – ८ (अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४), मथुरा – ४, पानिपत – ५ इ.).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि शासनमान्य संस्थेकडील सब-ऑफिसर कोर्स उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना.
पात्रता परीक्षा (इंजिनीअरिंग डिप्लोमा/बी.एससी.) किमान सरासरी ५० टक्के (खुला/ईडब्ल्यूएस/इमाव), ४५ टक्के (अजा/अज/ अपंग) गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा – (दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी) १८ ते २६ वर्षे
निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) (अंदाजे जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केली जाईल.) आणि स्किल/प्रोफिशियन्सी/फिजिकल टेस्ट (SPPT) आणि मेडिकल फिटनेस टेस्ट यांचा समावेश असेल.
परीक्षेचे माध्यम हिंदी/इंग्रजी. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
परीक्षा केंद्र – मुंबई/नवी मुंबई/ठाणे/एमएमआर इ.
लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १:२ प्रमाणात उमेदवार SPPT साठी निवडले जातील.
महिला उमेदवार फक्त पोस्ट कोड २०४, २०५ आणि २०६ साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
उमेदवार कोणत्याही एक रिफायनरी युनिटमधील फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.
अर्जाचे शुल्क – खुला, इमाव, ईडब्ल्यूएस – रु. ३००/-.
ऑनलाइन अर्ज http://www.iocl.com या संकेतस्थळावर दि. ९ जानेवारी २०२६ (२३.५५ वाजे)पर्यंत करावेत.
(संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये पॅरा-पी मध्ये अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती उपलब्ध आहे.) (अर्जासोबत अपलोड करावयाच्या कागदपत्रांविषयी माहिती Annexure-I मध्ये उपलब्ध आहे.)
शंकासमाधानासाठी https://cgrs.ibps.in किंवा टोल फ्री नं. १८००२२२३६६ किंवा १८००१०३४५६६ वर संपर्क साधा.
