स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांची केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत/ डिपार्टमेंट्स/ विविध संस्था/ कार्यालयामध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्समेशन ऑफिसर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर, सिनियर ट्रान्सलेटर या ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) पदांवर निवड करण्याकरिता घेण्यात येणारी ‘कंबाईंड हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा – २०२४’ दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर झाली आहे.

या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे – (कंसात केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयात/ खाते/ कार्यालयात पदे भरली जातात हे नमूद केले आहे.)

Job Opportunity Opportunities in CISF
नोकरीची संधी: ‘सीआयएसएफ’मधील संधी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
shreyas Iyer buy apartment in Mumbai
Shreyas Iyer : श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईने मुंबईतील वरळी भागात खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट; किंमत ऐकून थक्क व्हाल!
dnyanaradha multistate cooperative society case ED raids in Delhi Jalgaon and Ahmedabad
ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : ईडीकडून दिल्ली, जळगाव व अहमदाबादमध्ये छापे
Report in 10 days on death of CA in Ernst & Young
‘ईवाय’मधील ‘सीए’च्या मृत्यूप्रकरणी १० दिवसांत अहवाल, केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती; मंत्रालयाकडून चौकशी सुरू
Inspection of pit by Geological Survey Further action only after receipt of report
‘भूवैज्ञानिक सर्वेक्षण’कडून खड्ड्याची पाहणी, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही
asiatic society mumbai news
मुंबई: “२२० वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या”, कर्मचाऱ्यांची मोदी सरकारकडे मागणी!
TISS, Progressive Students Forum, TISS lifted ban,
मुंबई : अखेर विद्यार्थ्यांचा विजय… ‘टीस’ने प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमवरील बंदी उठवली

(ए) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) (सेंट्रल सेक्रेटरिएट ऑफिशियल लँग्वेज सर्व्हिस (CSOLS)),

(बी) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स (AFHQ),

(सी) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर /ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर/ ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर (केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ खाती/ ऑफिसेस),

(डी) सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT)/ सिनियर ट्रान्सलेटर (ST) (केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ खाती/कार्यालये).

रिक्त पदांचा तपशील : अंदाजे एकूण ३१२ पदे (रिक्त पदांची नेमकी संख्या योग्यवेळी जाहीर केली जाईल.).

वेतन : पद कोड क्र. (ए) ते (सी) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर/ ज्युनियर ट्रान्सलेटर/ ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-. पद कोड क्र. (डी) सिनियर हिंदी ट्रान्सलेटर/ सिनियर ट्रान्सलेटर पदासाठी पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन दरमहा रु. ८४,८००/-

पात्रता : (सर्व पदांसाठी) (दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी) हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.)

किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा परीक्षेचे माध्यम हिंदी असावे.)

किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील हिंदी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.

किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील इंग्रजी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम हिंदी असावे.

किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदी/ इंग्रजीपैकी एक पदवीचे माध्यम असावे आणि त्यापैकी दुसरा विषय पदवीला अभ्यासलेला असावा.

आणि हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदीमध्ये ट्रान्सलेशन पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण किंवा हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी ट्रान्सलेशनचा केंद्र/ राज्य सरकारचे ऑफिस/ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमधील २ वर्षांचा अनुभव. (सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.)

वयोमर्यादा : (१ ऑगस्ट २०२४ रोजी) ३० वर्षेपर्यंत (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ३५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत).

निवड पद्धती : पेपर-१ – (CBT ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२४ मध्ये घेतली जाईल.) (संगणक आधारित, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न) (i) जनरल हिंदी – १०० प्रश्न, १०० गुण. (ii) जनरल इंग्लिश – १०० प्रश्न, १०० गुण. एकूण २०० गुण, वेळ २ तास. (प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.) पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार पेपर-२ साठी निवडले जातात.

पेपर-२ – (वर्णनात्मक स्वरूपाचा) यात ट्रान्सलेशन आणि निबंध लेखन यांचा समावेश असेल. २०० गुण, वेळ २ तास. दोन उतारे भाषांतरासाठी दिलेले असतील. एक उतारा हिंदीतून इंग्लिश व दुसरा इंग्लिशमधून हिंदी आणि दोन निबंध एक हिंदीमध्ये व दुसरा इंग्लिशमध्ये.

सूचना : उमेदवारांनी पेपर-२ च्या उत्तरपत्रिकेत स्वतची ओळख देणारे आपले नाव, रोल नंबर, मोबाइल नंबर, पत्ता इत्यादी लिहू नये. या सूचनेचे पालन न केल्यास उमेदवारांना पेपर-२ मध्ये ० गुण दिले जातील.

परीक्षा केंद्र : अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ.

(पेपर-१ व पेपर-२ मधील कामगिरीवर आधारित उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी कमिशनच्या वेबसाईटवर उमेदवारांना विविध पदांसाठी ऑनलाइन ऑप्शन – पदनिहाय पसंतीक्रम भरून द्यावा लागेल.) अंतिम निवड आणि मिनिस्ट्रीज/ डिपार्टमेंट्सचे वाटप पेपर-१ व पेपर-२ मधील गुणवत्तेवर आधारित आणि उमेदवारांनी पदांसाठी/ खात्यांसाठी दिलेल्या पसंतीक्रमानुसार केली जाते.

सर्व स्तरावरील परीक्षांचे अॅडमिशन सर्टिफिकेट्स स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या रिजनल ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातात. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागाचा (वेस्टर्न रिजन) www. sscwr. net या संकेतस्थळावरून अॅडमिशन सर्टिफिकेट डाऊनलोड करून प्रिंटआऊट काढता येतील.

शंकासमाधानासाठी SSCWR चा संपर्क क्र. ७७३८४२२७०५/ ९८६९७३०७००.

परीक्षा शुल्क : रु. १००/- ऑनलाइन मोडने दि. २६ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत भरता येईल. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्यपद्धती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावरील जाहिरातीत Annexure- III/ Annexure- IV मध्ये दिलेली आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराचा Live Photograph Capture करण्यासाठी अॅप्लिकेशन मॉड्युल तसे डिझाइन करण्यात आले आहे. त्यासाठी उमेदवारांना तसे सूचित करण्यात येईल. तेव्हा उमेदवाराने कॅमेऱ्यासमोर (डोळ्यांच्या रेषेत कॅमेरा असावा.) बसून चष्मा न घालता Live Photograph Capture केला जाईल. फोटो काढताना मागील बॅकग्राऊंड प्लेन आणि चांगले प्रकाशमान असावे.

परीक्षेला जाताना उमेदवाराने आपल्या अलिकडच्या काळात काढलेल्या पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटोग्राफच्या दोन प्रती आणि एक ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत घेणे आवश्यक.

ऑनलाइन अर्जासोबत स्कॅण्ड सिग्नेचर १०-२० KB (६ x २ cm.) अपलोड करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज https:// www. ssc. gov. in या संकेतस्थळावर दि. २५ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत करता येतील.

उमेदवारांना अर्जामध्ये काही बदल/ सुधारणा करावयाची असल्यास Window for Application Correction दि. ४ व ५ सप्टेंबर २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत https:// www. ssc. gov. in या वेबसाईटवर उपलब्ध असेल.