वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, (DMER) आयुष, मुंबई यांच्यामार्फत टेक्निकल/नॉन-टेक्निकल पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा २०२५ घेणार आहे.
(A) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय – एकूण १,१०७ पदे.
(अ) तांत्रिक संवर्ग पदे – एकूण १,०५८.
(१) प्रयोगशाळा सहाय्यक (लॅबोरेटरी असिस्टंट) १७० पदे (अजा – २२, अज – १४, विजा-अ – २, भज-ब – ४, भज-क – ४, भज-ड – ३, विमाप्र – ४, इमाव – २५, एसईबीसी – १७, आदुघ – १९, खुला – ५६).
(२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १८१ पदे (अजा – २७, अज – ९, विजा-अ – ३, भज-ब – ३, भज-क – ७, भज-ड – ३, विमाप्र – ३, इमाव – ३८, एसईबीसी – १८, आदुघ – १८, खुला – ५२).
पद क्र. १ व २ साठी पात्रता – (१) बीपीएमटी इन लॅॅबोरेटरी किंवा बीएससी (पीएमटी) इन लॅबोरेटरी किंवा बीएससी (फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी) आणि लॅबोरेटरीमधील सर्टिफिकेट/डिप्लोमा. (२) महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल ॲक्ट, २०११ अंतर्गत नोंदणी. (शासनमान्य हॉस्पिटलमधील संबंधित १ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
(३) ग्रंथपाल – ५ पदे (अजा – १, भज-ब – १, इमाव – १, एसईबीसी – २).
पात्रता – आर्ट्स, कॉमर्स, सायन्समधील पदव्युत्तर पदवी (शक्यतो M.Sc. (बायोलॉजी किंवा झूऑलॉजी)) आणि लायब्ररी सायन्स पदवी.
(४) ग्रंथालय सहायक – १३ पदे (अजा – २, विजा-अ – १, भज-ड – १, इमाव – २, एसईबीसी – १, आदुघ – १, खुला – ५) (१ पद अपंग कॅटेगरी B/LV साठी राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि ६ महिने कालावधीचा लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स.
(५) सहायक ग्रंथपाल – १७ पदे (अजा – ३, अज – १, विमाप्र – १, इमाव – ५, एसईबीसी – २, आदुघ – १, खुला – ४). पात्रता – आर्ट्स, सायन्स, कॉमर्स पदवी (शक्यतो B.Sc. (बायोलॉजी किंवा झूऑलॉजी)) आणि ६ महिने कालावधीचा लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स.
(६) ई.सी.जी. तंत्रज्ञ – ८४ पदे (अजा – १०, अज – ५, विजा-अ – ३, भज-ब – २, भज-क – २, भज-ड – २, विमाप्र – ३, इमाव – १६, एसईबीसी – ८, आदुघ – १०, खुला – २३). पात्रता – (१) बीएससी (पीएमटी) इन कार्डिओलॉजी किंवा बीएससी (फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी) आणि Cardiology डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट.
(शासनमान्यताप्राप्त हॉस्पिटलमधील ईसीजी टेक्निशिअन पदाचा १ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
(७) आहारतज्ज्ञ – १८ पदे (अजा – २, अज – २, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ४, एसईबीसी – २, आदुघ – २, खुला – ३) (१पद अपंग कॅटेगरी B/LV साठी राखीव). पात्रता – बीएससी (होम सायन्स).
(८) औषध निर्माता – २०७ पदे (अजा – २६, अज – १५, विजा-अ – ४, भज-ब – ६, भज-क – ७, भज-ड – ३, विमाप्र – ४, इमाव – ४३, एसईबीसी – २१, आदुघ – १९, खुला – ५९) (२ पदे अनाथांसाठी राखीव) (८ पदे अपंग कॅटेगरी D/HH – ३, DL/BL – ३, ASD/SLD/MI – २, MD – २ साठी राखीव).
पात्रता – (१) १२ वी उत्तीर्ण, (२) डी. फार्म. किंवा बी. फार्म. (३) फार्मसी अॅक्ट १९४८ अंतर्गत नोंदणी.
(९) प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार (Documentalist/Catalogner) – ३६ पदे (अजा – ६, अज – ३, विजा-अ – १, भज-क – १, विमाप्र – १, इमाव – ८, एसईबीसी – ४, आदुघ – ३, खुला – ९) (१ पद अपंग कॅटेगरी B/LV साठी राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि ६ महिने कालावधीचा लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स.
(१०) समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) – १३५ पदे (अजा – १६, अज – १०, विजा-अ – ५, भज-ब – ४, भज-क – ४, भज-ड – २, विमाप्र – ३, इमाव – २७, एसईबीसी – १४, आदुघ – १५, खुला – ३५) (१ पद अनाथांसाठी राखीव) (४ पदे अपंग कॅटेगरी LV – १, D/HH – १, OA/OL – १, ASD/SLD/MI/MD – १ साठी राखीव).
पात्रता – M.S.W. (फिल्ड वर्कसह).
(११) क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) – ९४ पदे (अजा – ८, अज – ५, विजा-अ – १, भज-ब – ४, भज-क – ५, विमाप्र – ३, इमाव – २३, एसईबीसी – ९, आदुघ – ९, खुला – २७) (१ पद अनाथांसाठी राखीव) (४ पदे अपंग कॅटेगरी LV – १, D/HH – १, OA/OL – १, ASD/MD – १ साठी राखीव).
(१२) क्ष-किरण सहायक (X-ray Assistant) – ३५ पदे (अजा – ४, अज – ३, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ७, एसईबीसी – ४, आदुघ – ४, खुला – १०) (१ पद अपंग कॅटेगरी LV साठी राखीव).
पद क्र. ११ व १२ साठी पात्रता – (१) B.P.M.T. in Radiography किंवा B.Sc. (PMT in Radiography) किंवा B.Sc. (Physics and Chemistry or Biology) आणि शासनमान्य संस्थेकडील रेडिओग्राफीमधील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट.
(२) (शासनमान्यताप्राप्त हॉस्पिटलमधील किमान १ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य)
(१३) भौतिकोपचार तज्ज्ञ – १७ पदे (अज – १, विजा-अ – १, इमाव – ४, एसईबीसी – २, आदुघ – २, खुला – ७).
पात्रता – (१) १२ वी उत्तीर्ण, (२) फिजिओ थेरपीमधील पदवी आणि (३) ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपी ॲक्ट अंतर्गत नोंदणी.
(१४) दंत तंत्रज्ञ – ९ पदे (भज-ब – १, विमाप्र – १, इमाव – १, एसईबीसी – १, खुला – ५).
(१५) वाहन चालक – ३७ पदे (अजा – १, अज – ३, विजा-अ – १, भज-ब – २, भज-क – १, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ९, एसईबीसी – ४, आदुघ – ५, खुला – ९) (१ पद अपंग कॅटेगरी OL, LC साठी राखीव).
पात्रता – (१) १० वी उत्तीर्ण, (२) LMV किंवा MPMV किंवा HMV किंवा HPMV ड्रायव्हिंग लायसन्स, (३) हिंदी आणि मराठी उत्तम प्रकारे बोलता यावी, (४) संबंधित क्षेत्रांची topography माहित असावी आणि मोटर दुरूस्तीचे ज्ञान असावे (जसे की जीप) आणि सुदृढ शरीरयष्टी असावी.
(क) अतांत्रिक संवर्ग (मुंबई बाहेरील पदे) ४९ पदे.
(१६) उच्च श्रेणी लघुलेखक – १२ पदे (अजा – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ३, एसईबीसी – २, आदुघ – २, खुला – २).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि शॉर्ट हँड स्पीड १२० श.प्र.मि. आणि टायपिंग इंग्लिश ४० श.प्र.मि. किंवा मराठी ३० श.प्र.मि.
(१७) निम्न श्रेणी लघुलेखक – ३७ पदे (अजा – ८, अज – १, विजा-अ – १, भज-ड – १, इमाव – ६, एसईबीसी – ४, आदुघ – ३, खुला – १३) (१ पद अपंग कॅटेगरी B/LV साठी राखीव).
पात्रता – शॉर्ट हँड स्पीड १०० श.प्र.मि., टायपिंग स्पीड इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा मराठी ३० श.प्र.मि.
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. (Domicile Certificate सादर करावे लागेल.)
वयोमर्यादा – (दि. ९ जुलै २०२५ रोजी) खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आदुघ – ४३ वर्षे, अपंग/ प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – ४५ वर्षे, पदवीधर अंशकालीन – ५५ वर्षे.
निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे (MCQ) प्रश्न.
परीक्षेचे माध्यम – मराठी आणि इंग्रजी.
अतांत्रिक पदांसाठी –
(१) (परीक्षेचे स्वरूप) व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे (वाहन चालक/उच्च श्रेणी लघुलेखन/निम्न श्रेणी लघुलेखक)
(१) मराठी भाषा आणि व्याकरण – १५ प्रश्न, (२) इंग्रजी भाषा आणि व्याकरण – १५ प्रश्न, (३) सामान्य ज्ञान – १५ प्रश्न, (४) लॉजिकल ॲबिलिटी – १५ प्रश्न.
प्रत्येक ग्रुपच्या २० प्रश्नांसाठी वेळ १५ मिनिटे, एकूण ६० प्रश्न, वेळ ६० मिनिटे. प्रत्येक विषयाचे प्रश्न ४ विभागांत विभागून दिले जातील.
(२) व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे उर्वरित १४ पदे –
(१) मराठी भाषा आणि व्याकरण – १५ प्रश्न, (२) इंग्रजी भाषा आणि व्याकरण – १५ प्रश्न, (३) सामान्य ज्ञान/लॉजिकल अॅबिलिटी – ३० प्रश्न, (४) तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान – ४० प्रश्न.
प्रत्येक ग्रुपच्या २०प्रश्नांसाठी वेळ १८ मिनिटे, एकूण १०० प्रश्न, वेळ ९० मिनिटे.
उमेदवारांना कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात.
आधीच्या ग्रुपसाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही. पुनरावलोकनासाठी चिन्हांकीत केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल, हे लक्षात घ्या.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात ३ परीक्षा केंद्रांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे.
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी २ गुण दिले जातील. पात्रतेसाठी ऑनलाइन चाचणीत किमान ४५ टक्के गुण मिळविणे आवश्यक. तात्पुरती गुणवत्ता यादी ऑनलाइन टेस्टमधील गुणांकानुसार बनविली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी कागदपत्र पडताळणीनंतर प्रसिद्ध केली जाईल.
अर्जाचे शुल्क – खुला प्रवर्ग रु. १,०००/-, इतरांसाठी रु. ९००/-.
उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात.
अर्जासोबत फोटो, स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक.
या भरतीविषयी विस्तृत माहिती http://www.med-edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज http://www.med-edu.in या संकेतस्थळावर दि. ९ जुलै २०२५ पर्यंत करावेत.
शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर – ०२२-६१०८७५१८, ई-मेल आयडी – dmercot२०२५@gmail.com