दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहमदनगर (ADCC Bank) एकूण ६९६ रिक्त पदांची सरळसेवा पद्धतीने भरती. भरावयाची श्रेणीनिहाय रिक्त पदे (उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.)
(१) क्लेरिकल – ६८७ पदे (वेतन श्रेणी रु. २२८-१,५१८)
पात्रता : पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि MS- CIT किंवा DOEACC सोसायटीची A, B, C, D किंवा CCC स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण..
बी.ई. (कॉम्प्युटर/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन)/ बी.एससी. (कॉम्प्युटर) उत्तीर्ण असल्यास त्यास MS- CIT व तत्सम अर्हतेची आवश्यकता नाही.
(२) वाहनचालक (सबॉर्डिनेट) – ४ पदे (वेतन श्रेणी रु. १९०-१,४६०).
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना आवश्यक.
उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान ३ वर्षे हलके किंवा अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असावा. उमेदवारास मोटर वाहनाची सर्वसाधारण देखभाल व दुरूस्तीचे ज्ञान असावे. उमेदवारास मराठी, हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक. उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाळ स्वच्छ असावा.
(३) सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट-बी) फक्त पुरुष – ५ पदे (वेतन श्रेणी रु. १७५-१,२७०).
पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण किंवा आर्मी ग्रॅज्युएट (Ex. Servicemen).
बँक सुरक्षारक्षक म्हणून किमान ३ वर्षांचा अनुभव व गन लायसन्स असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : (दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी) क्लेरिकल आणि वाहन चालक पदांसाठी २१ ते ४० वर्षे. सुरक्षा रक्षक पदांसाठी २१ ते ४५ वर्षे.
निवड पद्धती : सर्व पदांकरिता १०० गुणांपैकी ९० गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाइन वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा, प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल, वेळ ९० मिनिटे. (ऑनलाइन परीक्षेसाठी बँकिंग व सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल.) ऑनलाइन परीक्षा प्रामुख्याने अहमदनगर जिह्यांतील केंद्रांवर घेण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमे रिक्त पदांच्या ३ पट उमेदवारांची मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
हेही वाचा : JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
मुलाखतीच्या वेळी कागदपत्रांची तपासणी केली जाईल. (मूळ प्रत व एक प्रमाणित झेरॉक्स प्रत)
मुलाखत एकूण १० गुणांसाठी ५ गुण हे शैक्षणिक अर्हता व अनुभव इ. बाबींसाठी (M. Com./ M. B. A./ M. E. संगणक किंवा आयटी/ एम.एससी. अॅग्री/ एलएलबी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असल्यास १ गुण, CIIB/ JAIIB, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ – १ गुण, GDC A (५० टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण – १ गुण आणि बँकेतील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास २ गुण)) व ५ गुण हे मौखिक मुलाखतीसाठी असतील.
अंतिम निवड मुलाखतीमधील १० पैकी मिळालेले गुण आणि ऑनलाईन परीक्षेतील गुण एकत्रित करून केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडील शारीरिक क्षमतेचे वैद्याकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या www. adccbanknagar. org किंवा भरतीच्या www. adccbanknagar. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्जाचे शुल्क : क्लेरिकल पदांसाठी रु. ७४९/-, वाहनचालक पदांसाठी रु. ६९६/-, सुरक्षारक्षक पदांसाठी रु. ६९६/-.
ऑनलाइन अर्ज www. adccbanknagar. in किंवा www. adccbanknagar. org या संकेतस्थळावर दि. २७ सप्टेंबर २०२४ (सायंकाळी ५.०० वाजे) पर्यंत करावेत. अर्जासोबत स्कॅन केलेले छायाचित्र (फोटोग्राफ), स्वाक्षरी आणि आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक.
शंकासमाधानासाठी ८६००३००२७०/९२२६८८०१९७ किंवा support@adccbanknagar.in या ई-मेलवर संपर्क साधा.