scorecardresearch

Premium

पदवीधरांना कृषी विभागात नोकरीची मोठी संधी! कृषी सेवक पदाच्या २०७० जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर

कृषी विभाग महाराष्ट्र भरती मंडळाने सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीत एकूण २०७० जागांसाठी भरती जाहीर केला आहे.

Krushi Sevak Bharti 2023
कृषी विभाग भरती २०२३. . (Photo : Mahasarkar)

Krushi Sevak Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागाने “कृषी सेवक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी विभाग महाराष्ट्र भरती मंडळाने सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीत एकूण २०७० रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर केला आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कृषी विभाग भरती २०२३.

Urban Planning Exam marathi news
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी
Will the candidates be affected by the delay in the MPSC exam
‘एमपीएससी’च्या परीक्षा लांबल्याने उमेदवारांना फटका बसणार का?
OBC hostels
ओबीसींची ७२ वसतिगृहांऐवजी ५२ वसतिगृहांवर बोळवण; विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी ५ मार्चपासून अर्ज आमंत्रित
जलसंधारण अधिकारी परीक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडली!

विभागाचे नाव – कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य.

पदाचे नाव – कृषी सेवक.

एकूण रिक्त पदे – २०७०.

शहरानुसार पदसंख्या –

लातूर – १७०, पुणे -१८८ पदे,औरंगाबाद – १९६, अमरावती – २२७, कोल्हापूर – २५०, ठाणे – २५५ नाशिक – ३३६ पदे, नागपूर – ४४८

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

हेही वाचा- पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक

शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

अधिकृत बेवसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/

वयोमर्यादा –

  • सर्वसाधारण प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
  • मागास प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये.
  • मागासवर्गीय – ९०० रुपये.

पगार – उमेदवारांना महिना १६ हजार पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1ZynXAim1Q8RY7k3W9yvS9Z83awRPO4cG/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity for graduates in agriculture department recruitment for 2070 vacancies of krishi sevak post know details jap

First published on: 13-09-2023 at 11:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×