सुहास पाटील

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट (रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिव्हीजन) सेंट्रल ऑफिस, मुंबई ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत ३,००० ॲप्रेंटिसेस पदावर २०२४-२५ साठी पदवीधर उमेदवारांच्या भरतीकरिता जाहिरात दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर केली होती. आता शुद्धीपत्रकानुसार अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन विंडो दि. ७ जून ते १७ जून २०२४ पर्यंत रिओपन करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी दि. २१ फेब्रुवारी २०२४ च्या जाहिरातीनुसार अर्ज सादर केले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या उमेदवारांनी दि. २१ फेब्रुवारी २०२४ च्या जाहिरातीनुसार रजिस्ट्रेशन केले होते, परंतु फी भरली नव्हती अशा उमेदवारांसाठीसुद्धा ॲप्लिकेशन विंडो रिओपन आहे. काही राज्यांतील रिक्त पदांचा तपशील –

(१) महाराष्ट्र – ३२० (स्थानिय भाषा – मराठी).

(२) गुजरात – २७० (गुजराती).

(३) आंध्र प्रदेश – १०० (तेलुगू/उर्दू).

(४) कर्नाटक – ११० (कन्नड).

(५) मध्य प्रदेश – ३०० (हिंदी).

(६) छत्तीसगड – ७६ (हिंदी).

(७) तेलंगणा – ९६ (तेलुगू/उर्दू).

(८) गोवा – ३० (कोंकणी).

महाराष्ट्र राज्यातील रिजननिहाय रिक्त पदांचा तपशील – अहमदनगर – २८, अकोला – ३०, अमरावती – ३६, औरंगाबाद – २३, जळगाव – २३, नागपूर – २७, नाशिक – ३३, पुणे – २६, सोलापूर – २०, ठाणे – २३़, ठटफड – २२, पणजी – ७, रटफड – २२.

वयोमर्यादा : दि. ३१ मार्च २०२४ रोजी २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००४ दरम्यानचा असावा.) (इमाव – ३१ वर्षे, अजा/ अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षे)

पात्रता : दि. ३१ मार्च २०२४ रोजी पदवी उत्तीर्ण. उमेदवारांना ज्या राज्यातील जागांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील निर्दिष्ट स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे. (उमेदवारांनी ८ वी/ १० वी/ १२ वी/ पदवीला स्थानिय भाषा अभ्यासलेली असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक.)

ट्रेनिंगचा कालावधी : १ वर्षे. १ वर्षाचा ॲप्रेंटिसशिप कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या ॲप्रेंटिसेसना बँकेमधील भरतीमध्ये नियमानुसार वेटेज/सवलत दिली जाईल. उमेदवारांना असेसमेंट टेस्ट द्यावी लागेल ज्यात थिअरॉटिकल पार्ट आणि ऑन जॉब ट्रेनिंग यांचा समावेश असेल थिअरी असेसमेंट ( इारक) सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया आणि प्रॅक्टिकल असेसमेंट बँकेकडून केली जाईल. लेखी परीक्षेतून पात्र उमेदवारांना इंटरह्यू द्यावा लागेल आणि ( इारक- ररउ यांनी जार्री ( २२४ी)ि केलेले) नॅशनल ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळवावे लागेल.

हेही वाचा >>> डिझाइन रंग-अंतरंग : डिझाइनचे पदवी शिक्षण: भारतात की परदेशात?

स्टायपेंड : ॲप्रेंटिसेसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती : (i) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (१) जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲप्टिट्यूड अँड कॉम्प्युटर नॉलेज, (२) बेसिक रिटेल लायबिलिटी प्रोडक्ट्स, (३) बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट्स, (४) बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स, (५) बेसिक इन्श्युरन्स प्रोडक्ट्स या विषयांवर आधारित प्रश्न

अंतिम निवड वैद्याकीय तपासणीनंतर जाहीर केली जाईल.

लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित राज्यनिहाय व कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

प्रतीक्षा यादी : राज्य/कॅटेगरीनिहाय निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी निकालाच्या दिनांकापासून १ वर्षभरासाठी ठेवली जाईल. ऑनलाइन परीक्षा २३ जून, २०२४ रोजी आयोजित केली जाईल. (tentative). ही जाहिरात ॲप्रेंटिस पदासाठी असून बँकेतील नोकरीसंबंधी नाही, याची नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क : दिव्यांग – रु. ४००/-. (अजा/ अज/ महिला/ ईडब्ल्यूएस रु. ६००/-, इतर उमेदवारांना रु. ८००/-)

उमेदवारांना निवड प्रक्रियेची माहिती बँकेच्या www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर ‘Career Section’मध्ये प्रसिद्ध केली जाईल. अजा/अज, इमाव, ईडब्ल्यूएस, दिव्यांगचे आरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील सर्टिफिकेट्स सादर करणे आवश्यक. परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांना BFSI- SSC मार्फत परीक्षेची तारीख आणि वेळ याविषयी इंटिमेशन पाठविले जाईल. उमेदवारांना ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेले आयडी प्रूफ परीक्षेच्या वेळी Display करावे लागेल. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी https://nats.education.gov.in या ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉगइन करून ऑनलाइन अर्ज दि. १७ जून २०२४ पर्यंत करावा. अर्ज सबमिट केल्यावर उमेदवारांना BFSI SSC ( naik. ashwini@bfsissc.com) कडून ई-मेल पाठविला जाईल.