Premium

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना ६० हजारांहून अधिक पगार मिळणार

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया.

CPCB Bharti 2023
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

CPCB Bharti 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सल्लागार ‘ए’, सल्लागार ‘बी’, सल्लागार ‘सी’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी संबंधित विभागाकडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३

पदाचे नाव – सल्लागार ‘ए’, सल्लागार ‘बी’, सल्लागार ‘सी’

एकूण पदसंख्या – ७४

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.cpcb.nic.in

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! ! DTP विभागांतर्गत शिपाई पदासाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

पदाचे नाव पदसंख्या –

  • सल्लागार ‘ए’ – १९
  • सल्लागार ‘बी’ – ५२
  • सल्लागार ‘सी’ – ३

पगार –

सल्लागार ‘ए’ – ६० हजार रुपये.
सल्लागार ‘बी’ – ८० हजार रुपये.
सल्लागार ‘सी’ – १ लाख.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/12DF2GjKDFledLCqQiFeihWRnj_OL4xgZ/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity in central pollution control board cpcb bharti 2023 for these posts has started see details jap

First published on: 21-09-2023 at 09:36 IST
Next Story
UPSC-MPSC : ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ ही संघटना काय आहे? ती भारतासाठी महत्त्वाची का?