Indian Air Force Recruitment : भारतीय हवाई दलाने (AFCAT) कमीशंड ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३१७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२३ आहे. तर भारतीय हवाई दल भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पदाचे नाव - कमीशंड ऑफिसर कोर्सचे नाव - भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-01/2024: NCC Special Entry एकूण रिक्त पदे - ३१७ पदानुसार शैक्षणिक पात्रता - AFCAT एंट्री-फ्लाइंग : ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.E/ B.Tech. AFCAT एंट्री-ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह B.E/ B.Tech. AFCAT एंट्री-(नॉन टेक्निकल) : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Com/ 60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स). NCC स्पेशल एंट्री-फ्लाइंग : NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र. वयोमर्यादा - फ्लाइंग ब्रांच - जन्म २ जानेवारी २००१ ते १ जानेवारी २००५ दरम्यान. ग्राउंड ड्युटी (टेक्निकल/ नॉन टेक्निकल) - जन्म २ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २००५ दरम्यान. अर्ज फी - AFCAT एंट्री - ५५० रुपये. NCC स्पेशल एंट्री आणि मेट्रोलॉजी एंट्री - फी नाही. नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत. अधिकृत बेवसाईट - महत्वाच्या तारखा - ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात - १ डिसेंबर २०२३ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० डिसेंबर २०२३ भरती संबधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.