इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरॉलॉजी (IITM), पुणे (पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार) प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट कन्स्लटंट्स, प्रोग्राम मॅनेजर पदांची करार पद्धतीने अल्पकालीन भरती. एकूण रिक्त पदे – ५५.

(I) प्रोजेक्ट असोसिएट- I – एकूण ३२ पदे (अजा – ६, अज – १, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १६).

Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
Police recruitment exam for two posts on same day confusion among candidates
पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा, उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

(१) प्रोजेक्ट असोसिएट- I (Post Code NMM २०२४-००१) – २५ पदे.

पात्रता : फिजिक्स, अॅप्लाईड फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, अॅप्लाईड मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, अॅटमॉस्फेरिक सायन्सेस, मेटीओरॉलॉजी, ओशिनोग्राफी, क्लायमेट सायन्स.

एनव्हायर्नमेंट सायन्सेस, जीओफिजिक्स (मेटीओरॉलॉजी या एका विषयासह) किंवा तत्सम विषयातील पदव्युत्तर पदवी

किंवा इंजिनीअरिंग पदवी किंवा समतूल्य पदवी.

इष्ट पात्रता (Desirable) : Fortran, GrADS, NCL, Pytholn, Matlab इ. सॉफ्टवेअरचे ज्ञान आणि पावसाळा आणि त्यात होणारे बदल याविषयी ज्ञान.

हेही वाचा >>> Success Story Of Ashok Khemka : ३३ वर्षांच्या कारकिर्दीत ५७ वेळा बदली! वाचा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याची कहाणी

(२) प्रोजेक्ट असोसिएट- I (Post Code CAIPEEX २०२२-००१) – २ पदे.

(३) प्रोजेक्ट असोसिएट- I (Post Code URBMET २०२४-००४) – ४ पदे.

(४) प्रोजेक्ट असोसिएट- I (Post Code MAQWS २०२१-००८) – १ पद.

पद क्र. २ ते ४ साठी पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स, केमिस्ट्री, अॅटमॉस्फेरिक फिजिक्स/अॅटमॉस्फेरिक सायन्सेस/ मेटीओरॉलॉजी).

इष्ट पात्रता : अॅटमॉस्फेरिक डेटा अॅनालिसिस, न्यूमरिकल मॉडेल्स, Fortran/ Python/ C/ C मधील प्रोग्रामिंग स्किल्स आणि Meoscale Models वापरून अॅटमॉस्फेरिक फ्लोव्ह्जचे सिम्युलेशनमधील अनुभव.

(II) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I – एकूण ९ पदे (अजा – ३, अज – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

(१) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I (Post Code URBMET २०२४-०३) – २ पदे.

पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स/ केमिस्ट्री/ इन्स्ट्रूमेंटेशन/ अॅटमॉस्फेरिक फिजिक्स/ अॅटमॉस्फेरिक सायन्सेस/ मेटीओरॉलॉजी/ एन्व्हिरॉन्मेंटल सायन्सेस/ जीओफिजिक्स) किंवा बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ EEE/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ एअरोस्पेस) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(२) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I (SolParGeo Project) – २ पदे.

पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स/ केमिस्ट्री/ मेटीओरॉलॉजी/ अॅटमॉस्फेरिक सायन्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(३) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I (Climate Variability and Production) – १ पद.

पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स/ केमिस्ट्री/ मेटीओरॉलॉजी/ अॅटमॉस्फेरिक सायन्स) किंवा बी.ई./बी.टेक. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(४) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I (Atmospheric Electric Observatory and Simulation Lab) – १ पद.

पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ मेटीओरॉलॉजी/ अॅटमॉस्फेरिक सायन्सेस) किंवा बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ EEE/ E T/ मेकॅनिकल) किमान ६० गुणांसह उत्तीर्ण.

(५) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I (ARTs/ Radar Remote Sensing) – १ पद. (कामाचे ठिकाण – महाबळेश्वर) (Post Code – HACPL-००१).

(६) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I (Post Code HACPL २०२२) – १ पद. (कामाचे ठिकाण – महाबळेश्वर)

(७) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I (Post Code ARTPune २०२४-१) – १ पद.

पद क्र. ५ ते ७ साठी पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स/ मेटीओरॉलॉजी/ अॅटमॉस्फेरिक सायन्सेस/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ EEE/ ECE/ ET/ रेडिओ फिजिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वेतन : प्रोजेक्ट असोसिएट- I पदांसाठी रु. २५,०००/- एचआरए २७ टक्के (रु. ६,७५०/-) एकूण रु. ३१,७५०/- (NET/ CSIR- UGC/ GATE किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण पात्रताधारकांसाठी प्रोजेक्ट असोसिएट पदांवर नेमणूक झाल्यास वेतन रु. ३१,०००/- एचआरए (२७ टक्के) (रु. ८,३७०/-) (http://www.tropmet.res.in/careers एकूण रु. ३९,३७०/-)

प्रोजेक्ट सायंटिस्ट- I पदासाठी रु. ५६,०००/- एचआरए २७ टक्के (रु. १५,१२०/-) एकूण रु. ७१,१२०/-. ऑनलाइन अर्ज http://www.tropmet.res.in/careers या संकेतस्थळावर ५ डिसेंबर २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

Story img Loader