सुहास पाटील पशुसंवर्धन आयुक्तालय (AHD), महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे - ४११ ०६७. पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांची सरळसेवा भरती. (१) पशुधन पर्यवेक्षक (गट-क) एकूण रिक्त पदे - ३७६ (अजा - २८, अज - २०, विजा-अ - ६, भज-ब - १३, भज-क - ९, भज-ड - ४, विमाप्र - ६, इमाव - ७४, आदुघ - ३८, खुला - १७८) (१५ पदे दिव्यांग (कॅटेगरी अस्थिव्यंग - ७, कर्णबधिर - ८) साठी राखीव). पात्रता : (दि. १ मे २०२३ रोजी) (i) १० वी उत्तीर्ण, (ii) पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण. किंवा बी.व्ही.एस.सी. किंवा बी.व्ही.एस.सी. अॅण्ड अॅनिमल हजबंड्री पदवी उत्तीर्ण. (२) वरिष्ठ लिपिक (गट-क) एकूण रिक्त पदे - ४४ (अजा - ७, अज - २, विजा-अ - २, भज-ब - २, भज-क - २, भज-ड - १, विमाप्र - १, इमाव - ८, आदुघ - ५, खुला - १४) (२ पदे दिव्यांग (कॅटेगरी अंध/अल्पदृष्टी - १, अस्थिव्यंग - १) साठी राखीव). पात्रता : पदवी उत्तीर्ण. (३) लघुलेखक (उच्च श्रेणी) (गट-क) एकूण रिक्त पदे - २ (विजा-अ - १, खुला - १). पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक). (४) लघुलेखक (निम्न श्रेणी) (गट-क) एकूण रिक्त पदे - १३ (अजा - २, अज - १, विजा-अ - १, भज-क - १, इमाव - २, आदुघ - २, खुला - ४) (१ पद दिव्यांग अंध/ अल्पदृष्टीसाठी राखीव). पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) लघुलेखनाचा वेग १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक). (५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) एकूण रिक्त पदे - ४ (विजा-अ - १, इमाव - १, आदुघ - १, खुला - १). पात्रता : रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सूक्ष्मजीव शास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवी उत्तीर्ण आणि प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा उत्तीर्ण. (६) तारतंत्री (गट-क) एकूण रिक्त पदे - ३ (अजा - १, इमाव - १, खुला - १). पात्रता : आयटीआयकडील तारतंत्री ट्रेडचे सर्टिफिकेट आणि विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरुस्तीचा १ वर्षांचा अनुभव. (७) यांत्रिकी (गट-क) एकूण रिक्त पदे - २ (विजा-अ - १, खुला - १). पात्रता : (१) १० वी उत्तीर्ण, (२) डिझेल मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट, (३) यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरुस्तीचा २ वर्षांचा अनुभव. (८) बाष्पक परिचर (बॉयलर अटेंडंट) (गट-क) एकूण रिक्त पदे - २ (अज - १, खुला - १). पात्रता : (१) १० वी उत्तीर्ण, (२) बॉयलर अटेंडंट द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र, (३) Boiler Attendent Act 2011 अंतर्गत ब किंवा क प्रमाणपत्र, (४) उमेदवार नोंदी ठेवण्यात आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असावा. महिलांसाठी - ३० टक्के, माजी सैनिक - १५ टक्के, खेळाडू - ५ टक्के, प्रकल्पग्रस्त - ५ टक्के, भूकंपग्रस्त - २ टक्के, अंशकालीन - १० टक्के, दिव्यांग - ४ टक्के, अनाथ - १ टक्के जागा राखीव आहेत. वयोमर्यादा : दि. १ मे २०२३ रोजी १८-३८ वर्षे (कमाल वयोमर्यादा - मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ - ४३ वर्षे, दिव्यांग - ४५ वर्षे, अंशकालीन उमेदवार - ५५ वर्षेपर्यंत, माजी सैनिक - सेना दलातील सेवा + ३ वर्षे) वेतन श्रेणी : पद क्र. १ पशुधन पर्यवेक्षक आणि पद क्र. २ वरिष्ठ लिपिक - एस - ८ (२५,५००-४१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४५,००० पद क्र. ३ लघुलेखक (उच्च श्रेणी) एस -१५ (४१,८०० - १,३२,३००) अंदाजे वेतन दरमहा रु. ७३,००० पद क्र. ४ लघुलेखक (निम्न श्रेणी) एस -१४ (३८,६०० - १,२२,८००) अंदाजे वेतन दरमहा रु. ६७,०००पद क्र. ५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ - एस -१३ (३५,४०० - १,२२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ६३,००० पद क्र. ६ तारतंत्री, पद क्र. ७ यांत्रिकी, पद क्र. ८ बाष्पक परिचर पदांसाठी - एस -६ (१९,९०० - ६३,२००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३४,००० आरक्षणाचा अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विहीत नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून दि. ११ मे २०२३ रोजी वैध असणारे प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक. निवड पद्धती : सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिह्यांच्या मुख्यालयी घेण्यात येईल. प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही, अशा पदांकरिता ऑनलाइन परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रत्येकी ५० गुण, एकूण २०० गुण असतील. कालावधी - २ तास. शारीरिक चाचणी/ व्यावसायिक चाचणी ८० गुणांची राहील, कालावधी २ तास. ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे. अशा पदांकरिता ऑनलाइन परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रत्येकी ३० गुण आणि संबंधित पदाचे तांत्रिक विषयासाठी ८० गुण असे एकूण २०० गुण, वेळ २ तास. परीक्षा शुल्क : खुला - रु. १,०००/-; मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांग/ माजी सैनिक - रु. ९०० ऑनलाइन अर्जासोबत पुढील कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक. (१) पासपोर्ट आकाराचा (४.५ बाय ३.५ सें.मी.) फोटोग्राफ, (२) स्वत:चा स्वाक्षरी (काळय़ा शाईने), (३) स्वत:च्या डाव्या अंगठय़ाचा ठसा (काळय़ा किंवा निळय़ा शाईने पांढऱ्या कागदावर), (४) इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकूर असलेले स्व-हस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र (काळय़ा शाईने पांढऱ्या कागदावर). हस्तलिखित घोषणेचा मजकूर - क, (name of the candidate) hereby declare that all the inform, ation submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. उमेदवाराची स्वाक्षरी अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संकेतस्थळावर दि. ११ जून २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही. अंतिम निकाल विभागाच्या या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. suhassitaram@yahoo.com