नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क, गट-ब आणि गट-अ मधील विविध संवर्गातील रिक्त पदांची सरळसेवा पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – १३२. (I) गट-क संवर्गातील एकूण १२ पदांची भरती.

(१) कनिष्ठ अभियंता (विद्युत) ८ पदे (अजा – १, विजा-अ – १, विमाप्र – १, इमाव – २, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – १).

(२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ४ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, इमाव – १).

पद क्र. १ व २ साठी पात्रता – संबंधित इंजिनीअरिंग शाखेची पदवी. वेतन स्तर – एस-१४ (३८,६०० १,२२,८००).

(II) गट-ब संवर्गातील एकूण ७ पदांची भरती.

(१) सहायक आयुक्त – ५ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, साशैमाव – १, खुला – १).

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. वेतन स्तर – एस-१६ (४४,९०० १,४२,८००).

(२) महापालिका उपसचिव – १ पद (खुला).

पात्रता – विधी शाखेची पदवी आणि शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

वेतन स्तर – एस-१५ (४१,८०० १,३२,३००).

(३) सहायक विधी अधिकारी – १ पद (खुला).

पात्रता – विधि शाखेची पदवी आणि न्यायालयांमध्ये किमान ३ वर्षे अभिवक्ता/वकील म्हणून किंवा शासकीय/स्थानिय स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

वेतन स्तर – एस-१५ (४१,८०० १,३२,३००).

(III) गट-अ संवर्गातील एकूण ११३ पदांची भरती.

(१) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – १७ पदे (अजा – ३, अज – १, भज-ब – १, भज-ड – १, इमाव – ४, साशैमाव – २, आदुघ – २, खुला – ३).

(२) मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी – १ पद (विजा-अ).

पात्रता – वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.). वेतन स्तर – एस-१६ (४४,९०० १,४२,४००).

(३) पशुवैद्यकीय अधिकारी १ पद (खुला).

पात्रता – पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी. (महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकिय काऊन्सिल अंतर्गत नोंदणी आवश्यक.)

वेतन स्तर – एस-२० (५६,१०० १,७७,५००).

(४) वैद्यकशास्त्र – १ पद (खुला). (५) इंटेन्सिव्हिस्ट – ४ (६) शल्य चिकित्सक – १०

(७) भूलतज्ज्ञ – ५ (८) स्त्रीरोग तज्ज्ञ – २१ (९) अस्थिव्यंग तज्ज्ञ – ४

(१०) बालरोग तज्ज्ञ – १७ (११) त्वचारोग तज्ज्ञ – १ (१२) क्ष-किरण तज्ज्ञ – ११

(१३) रक्त संक्रमण अधिकारी – १ (१४) विकृतीशास्त्र तज्ञ – २

(१५) वैद्यकीय अधिकारी (उरोरोग व क्षयरोग तज्ञ) २

पद क्र. ४ ते १५ साठी (i) पात्रता – संबंधित वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी. (एमडी/एमएस)

(ii) वेतन स्तर – एस-२० (५६,१०० – १,७७,५००).

पद क्र. १ ते १५ (पद क्र. २ वगळता) सर्व पदांसाठी महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल अंतर्गत नोंदणी आवश्यक.

वयोमर्यादा – ( १ डिसेंबर २०२५ रोजी) सर्व पदांसाठी १८ ते ३८ वर्षे; मागासप्रवर्ग/अनाथ/खेळाडू – १८ ते ४३ वर्षे; अपंग /प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १८ ते ४५ वर्षे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे नियमित कार्यरत कर्मचारी – मागासवर्गीय ५० वर्षे, खुला प्रवर्ग – ४५ वर्षे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे करार पद्धतीवरील कार्यरत कर्मचारी – कोणतीही वयोमर्यादा नाही.

निवड पद्धती – प्राप्त अर्जांची संख्या वाजवीपेक्षा जास्त असेल आणि सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणेत येईल. परीक्षेचे ठिकाण, वेळ, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. (www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.) परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविले जाईल.

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी http://www.nmmc.gov.in या वेबसाईटवर जावून जाहिरात सविस्तर अभ्यासावी नंतरच आपला अर्ज भरावा.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन क्र. ०२२-२७५६७१८९.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-

ऑनलाइन अर्ज http://www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ५ जानेवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ (२३.५५ वाजे) दरम्यान भरावेत.

यूपीएससीमार्फत भरती

एक्झामिनर ऑफ ट्रेड मार्क्स अँड जीओग्राफिकल इंडिकेशन्स (ग्रुप-बी) पदांची भरती. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रि अँड इंटर्नल ट्रेड, ऑफिस ऑफ दी कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स अँड ट्रेड मार्क्स यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या भरती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत होणार आहे.

पदाचे नाव – एक्झामिनर ऑफ ट्रेड मार्क्स अँड जीओग्राफिकल इंडिकेशन्स – एकूण १०० पदे (अजा – १७, अज – ६, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ९, खुला – ४८) (८ पदे दिव्यांग कॅटेगरी (LV – २, HH – २, LD/CP – २, MD – २) साठी राखीव).

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ७ (रु. ४४,९००/- मूळ वेतन) दरमहा वेतन रु. ८७,०००/-. इंटरह्यूच्यावेळी उमेदवार गुणवत्तापूर्ण आढळल्यास सुरूवातीचे वेतन वाढवून दिले जाईल.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२६ रोजी) खुला/ईडब्ल्यूएस – ३० वर्षे, इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे, दिव्यांग – ४० वर्षे.

पात्रता – (दि. १ जानेवारी २०२६ रोजी) कायदा विषयातील पदवी.

अनुभव – कोर्ट केसेस आणि इतर लिगल मॅटर्स किंवा ट्रेड मार्क्स अँड जीओग्राफिकल इंडिकेशन्स संबंधित मॅटर्स हाताळण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता – इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी विषयातील पदव्युत्तर पदवी.

कामाचे स्वरूप – इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी विषयक कायद्यांची अंमलबजावणी करणे.

कामाचे ठिकाण – मुख्यालय, नवी दिल्ली (ऑल इंडिया सर्व्हिस).

प्रोबेशन कालावधी – २ वर्षांचा असेल.

निवड पद्धती – जर प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास (इंटरह्यूकरिता बोलाविल्या जाणाऱया उमेदवारांची संख्या) इष्ट पात्रता आणि अनुभव यांचा विचार करून किंवा लेखी परीक्षा घेवून नियंत्रित केली जाईल. इंटरह्यूमधील गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षा घेतल्यास अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुण आणि इंटरह्यूमधील गुण एकत्र करून केली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. २५/-. (अजा/अज/दिव्यांग यांना फी माफ आहे.)

विविध प्रमाणपत्रांचे विहीत नमुने https://upsc.gov.in या संकेतस्थळावरील https://upsc.gov.in/recruitment/recruitment-performas या लिंकवर उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १ जानेवारी २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.