ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा (Unit of Munitions India Ltd.) (संरक्षण मंत्रालय, भारत सरकारचा उपक्रम) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत ग्रॅज्युएट्स अॅप्रेंटिस, टेक्निशियन अॅप्रेंटिस व जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस पदांची सन २०२४-२५ करिता १ वर्ष कालावधीच्या अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी प्रवेश. एकूण – ४९ पदे.

डिसिप्लिननुसार रिक्त पदांचा तपशील –

नोकरीची संधी: केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधील भरती
नोकरीची संधी: केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधील भरती
SBI Recruitment 2024
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निघाली भरती! ४५ लाखांपर्यंत मिळेल वार्षिक पगार, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
IAS Pooja Khedkar Mother
पूजा खेडकरांच्या आईची पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी, म्हणाल्या, “मी सगळ्यांना…”
Suchitra Krishnamoorthi attended naked party
बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”
Institute of Banking Personnel Selection has released the IBPS Clerk recruitment notification 2024 for CRP Clerks XIV Before 21 July
IBPS Clerk Recruitment 2024: तरुणांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! सहा हजार पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा, फी किती? जाणून घ्या सर्व माहिती!
Gulanchwadi, truck, funeral crowd,
पुणे : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला; चिरडून तीन जणांचा मृत्यू
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Modi in rajyasabha
Rajyasabha : मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग; सभापती खंत व्यक्त करीत म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, मर्यादा…”

( I) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस २ पदे. स्टायपेंड दरमहा रु. ९,०००/-.

(१) केमिकल इंजिनीअरिंग १ पद (खुला).

(२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग १ पद (खुला).

पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी पदवी.

(II) टेक्निशियन अॅप्रेंटिस ७ पदे. स्टायपेंड दरमहा रु. ८,०००/-.

(१) केमिकल इंजिनीअरिंग २ पदे (खुला).

(२) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग २ पदे (खुला).

(३) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग २ पदे (खुला).

(४) मेकॅनिकल इंजिनीअरिंग १ पद (खुला).

पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी डिप्लोमा.

(III ) जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस ४० पदे. स्टायपेंड दरमहा रु. ९,०००/-.

(१) बॅचलर ऑफ आर्ट्स (आर्ट) १२ पदे (अजा २, अज २, इमाव ३, खुला ५) (१ पद दिव्यांग कॅटेगरी LV साठी राखीव)

(२) बॉ. कॉम. ४ पदे (इमाव १, खुला ३).

(३) बी.एससी. (केमिस्ट्री मुख्य विषयासह) २० पदे (अजा २, अज २, इमाव ५, खुला ११).

(४) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (B.C.A.) २ पदे (इमाव १, खुला १).

(५) बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट २ पदे (खुला).

पात्रता : संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण.

संबंधित पदवी/डिप्लोमा दि. ३० सप्टेंबर २०१९ नंतर उत्तीर्ण केलेला असावा.

संबंधित पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवाराकडे १ वर्ष किंवा अधिक वर्षांचा कामाचा अनुभव नसावा.

वयोमर्यादा : (दि. १३ जुलै २०२४ रोजी) किमान १४ वर्षे पूर्ण.

निवड पद्धती पदवी/डिप्लोमाच्या अंतिम वर्षी मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी बनविली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, वैद्याकीय तपासणी आणि पोलीस पडताळणी (Vertification) अहवाल.

जर पदवी/डिप्लोमाचे गुण CGPA/ SGPA ग्रेडिंगमध्ये दिले गेले असल्यास उमेदवारांना त्यांच्या विद्यालया/ विद्यापीठाकडून ग्रेडिंगचे टक्केवारीमध्ये रूपांतर करण्याचा पुरावा सादर करावा लागेल.

निवडलेल्या उमेदवारांना ऑर्डनन्स फॅक्टरीबरोबर करार करावा लागेल, जो बोर्ड ऑफ अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT, WR, Mumbai) कडे रजिस्टर करावा लागेल.

अॅप्रेंटिसेसना कंपनीकडून राहण्याची व्यवस्था पुरविली जावू शकते. तसेच त्यांना वैद्याकीय सुविधा कंपनीकडून पुरविली जाईल. अर्जाचा विहीत नमुना https://munitionsindia.in/career/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती जोड्न पुढील पत्त्यावर दि. १३ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील असे पोस्टाने पाठवावेत.

The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara (Unit of Munitions India Ltd.) – 441 906 (MS). अर्जाच्या लिफाफ्यावर ‘Applications for Graduate/ Technician/ General Stream Graduate Apprenticeship Training in O. F., Bhandara’ असे ठळक अक्षरात लिहावे.

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : ‘पुष्पक’ लाँच व्हेईकलची यशस्वी चाचणी अणि श्रीनगरला मिळालेला ‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’चा दर्जा , वाचा सविस्तर…

भारतीय वायुसेनेतील संधी

भारतीय वायुसेना (इंडियन एअर फोर्स) (IAF), बेस रिपेअर डेपो, एअर फोर्स, ओझर ट्रेनिंग करिता निवड करण्यासाठी एअरफोर्स अॅप्रेंटिस ट्रेनिंग रिटन टेस्ट (AATWT) कोर्सेस १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार आहेत. पुरुष/ महिला उमेदवारांना अॅप्रेंटिसशिप 01/2024 घेणार आहे. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग एन्ट्री/०१/२०२४ करिता टेक्निकल ट्रेड्स, कोर्स नंबर, प्रवेश क्षमता यांचा तपशिल –

(१) मशिनिस्ट (कोर्स नं. 01/ M/2024) एकूण ५ जागा.

(२) शीट मेटल (कोर्स नं. 01/ SM/2024) एकूण १५ जागा.

(३) वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिकल) (कोर्स नं. 01/ W/2024) एकूण ४ जागा.

(४) मेकॅनिक रेडिओ रडार एअरक्राफ्ट इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (कोर्स नं. 01/ ERR/2024) एकूण २० जागा.

(५) कारपेंटर (कोर्स नं. 01/ C/2024) एकूण १ जागा.

(६) पेंटर (जनरल) (कोर्स नं. 01/ P/2024) एकूण ४ जागा.

(७) मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर वेहिकल) (कोर्स नं. 01/ MD/2024) – एकूण २ जागा.

(८) इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट (कोर्स नं. 01/ EA/2024) – एकूण ३५ जागा.

(९) फिटर/मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स (कोर्स नं. 01/ F/2024) एकूण ३४ जागा.

पात्रता : (दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी) १० वी उत्तीर्ण आणि किमान सरासरी ४० गुणांसह संबंधित विषयातील आयटीआय पात्रता.

इष्ट पात्रता (Desirable) : १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व पदांसाठी १५ ते ३५ वर्षे (सर्व कॅटेगरींसाठी).

स्टायपेंड : दरमहा रु. ९,५००/- ट्रेनिंगच्या कालावधीत उमेदवारांना स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती निवड प्रक्रिया दि. १ ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान बेस रिपेअर डेपो, एअरफोर्स, ओझर येथे घेतली जाईल. (लेखी परीक्षा, स्किल टेस्ट/प्रॅक्टिकल परीक्षा/शारीरिक मापदंड चाचणी आणि कागदपत्र पडताळणी) लेखी परीक्षेत गणित, जनरल सायन्स आणि जनरल नॉलेज या विषयांवरील प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षा दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी घेतली जाईल.

शारीरिक मापदंड : उंची किमान १५२ सें.मी. वजन किमान ४८ किलो. दात किमान १४ डेंटल पॉईंट्स.

इंटरव्ह्यू/प्रेक्टिकल : दि. ३, ४ सप्टेंबर २०२४ रोजी.

मेडिकल/कागदपत्र पडताळणी: दि. १ सप्टेंबर २०२४.

निवड यादी जाहीर करण्याचा दि. १७ सप्टेंबर २०२४.

जॉईनिंग इन्स्ट्रक्शन्स पाठविण्याचा दि. १८ सप्टेंबर २०२४.

कोर्स सुरू होण्याचा दि. १५ ऑक्टोबर २०२४.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन http://www.apprenticeship.gov.in या पोर्टलवर १५ जुलै २०२४ पर्यंत करता येईल. ऑनलाइन अर्जासोबत पुढील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक. (१) १० वी /१२ वीचे गुणपत्रक, (२) आयटीआय (NCVT) गुणपत्रक, (३) हलक्या (light background) पार्श्वभूमीवर काढलेला पासपोर्ट आकाराचा (size upto 50 KB) रंगीत फोटोग्राफ (फोटो काढताना उमेदवाराने काळ्या रंगाची पाटी (slate) छातीसमोर धरावी. ज्यावर पांढऱ्या रंगाच्या खडूने उमेदवाराने आपले नाव कॅपिटल लेटर्समध्ये स्पष्ट लिहिलेले असावे.) (४) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी. (५) उमेदवाराची स्वाक्षरी.