Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तर मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पनवेल महानगरपालिका भरती २०२३ –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
एकूण पदसंख्या – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS
नोकरीचे ठिकाण – पनवेल, रायगड
वयोमर्यादा – ७० वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता –
- पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६
मुलाखतीची तारीख – ४ ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com
पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ६० हजारांपर्यंत पगार मिळणार.
असा करा अर्ज –
- या भरतीसाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी हजर राहणं आवश्यक आहे.
- पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीसाठी ४ ऑक्टोबर २०२३ ला वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1LwoBy0gTUOOXRKQDWsFV–_QL_rKkA5V/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.