scorecardresearch

Premium

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! MESCO अंतर्गत ‘ड्रायव्हर’ पदासाठी भरती सुरु, महिना ३१ हजारांहून अधिक पगार मिळणार

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ भरती २०२३ संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया.

MESCO Pune Bharti 2023
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ भरती २०२३. (Photo: MESCO )

MESCO Pune Bharti 2023: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाने पुणे येथे ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ६० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. मुलाखत १ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालये आणि फायर पॉईट येथे ६० वाहन चालक पदांची कंत्राटी पध्दतीने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातुन नेमणूक करण्यात येणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना महिना ३१,३१४ इतका पगार मिळणार आहे. तर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ., कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA) व मॅच्युटीचे फायदे देखील मिळणार आहेत. तर या भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ भरती २०२३

Maratha
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती ‘या’ तारखेपासून मराठवाडा दौऱ्यावर
Academic Bank of Credit website
‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ संकेतस्थळावरील विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्राची आघाडी, देशभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
resort Administration in womens hand
तीन ‘रिसॉर्ट’चा संपूर्ण कारभार महिलांहाती; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा नवा प्रयोग
Shinde Fadnavi Newspaper Ad
“दोन कोटी रुपये खर्चून वृत्तपत्रात पानभर जाहिरातींसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण…”, रोहित पवारांचा टोला

पदाचे नाव – ड्रायव्हर

एकूण पदसंख्या – ६०

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1AlJeQTiuHS6itkVrYoSjAaeKl_mAdR2u/view) या लिंकवरील भरतीची जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – पुणे</strong>

हेही वाचा- ‘या’ उमेदवारांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी, असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या पात्रता आणि निकष

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची पत्ता – मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१.

मुलाखतीची तारीख – १ सप्टेंबर २०२३ सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत

अधिकृत वेबसाईट – http://www.mescoltd.co.in

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity in pune recruitment for the post of driver under mesco bharti 2023 jap

First published on: 29-08-2023 at 09:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×