scorecardresearch

Premium

नोकरीची संधी

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) (संरक्षण मंत्रालय) मध्ये असिस्टंट कमांडंट (ग्रुप-ए गॅझेटेड ऑफिसर) च्या एकूण ४६ पदांवर पदवीधर पुरुष/ महिला उमेदवारांची भरती. (०२/२०२४ बॅच). ब्रँचनुसार रिक्त पदांचा तपशील

job opportunity
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

सुहास पाटील

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) (संरक्षण मंत्रालय) मध्ये असिस्टंट कमांडंट (ग्रुप-ए गॅझेटेड ऑफिसर) च्या एकूण ४६ पदांवर पदवीधर पुरुष/ महिला उमेदवारांची भरती. (०२/२०२४ बॅच). ब्रँचनुसार रिक्त पदांचा तपशील –

India trained seafarers achieve the target of a five lakh crore economy
पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठायचे तर देशाला अधिक प्रशिक्षित खलाशांची गरज
Launch Criiio 4 Good Life Skills Learning Program for Girls
Criiio 4 Good: आता मुली क्रिकेटमधून शिकणार जीवनकौशल्य; शिक्षण मंत्रालय, बीसीसीआय आणि आयसीसीसह युनिसेफने घेतला पुढाकार
barti, nielit, 68 courses for sc candidates, 68 courses for schedule caste candidates, skill development for sc candidates
अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ६८ अभ्यासक्रम; बार्टी, एनआयईएलआयटीतर्फे उपक्रम
chandrapur police, gambling den in chandrapur, police raid gambling den, congress workers cell president vinod sankat arrested
काँग्रेस कामगार सेल जिल्हाध्यक्ष संकत यांच्या जुगार अड्ड्यावर छापा

(४) असिस्टंट कमांडंट – लॉ एन्ट्री – १ पद (पुरुष/ महिला) (खुला).

पात्रता – डिग्री इन लॉ किमान ६० टक्के गुण.

सर्व पदांसाठी अजा/ अज उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक.
पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार (ज्यांनी शेवटच्या सेमिस्टपर्यंत किमान सरासरी ६० टक्के गुण मिळविलेले आहेत.) ते अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना डिग्री सर्टिफिकेट दि. ३० मे २०२४ पर्यंत सादर करावे लागेल.

शारीरिक मापदंड – उंची (जीडी/ टेक्निकल पदांसाठी) – १५७ सें.मी., CPL- SSA साठी १६२.५ सें.मी. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात – १० टक्के. छाती – योग्य प्रमाणात असावी आणि किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. दृष्टी – असिस्टंट कमांडंट (जीडी) आणि CPL- ररअ साठी – चष्म्याशिवाय – ६/६, ६/९, चष्म्यासह – ६/६, ६/६. असिस्टंट कमांडंट (टेक्निकल) साठी – चष्म्याशिवाय – ६/३६, ६/३६, चष्म्यासह – ६/६, ६/६.

वयोमर्यादा – जनरल डय़ुटी आणि टेक्निकल ब्रँचसाठी २१ ते २५ वर्षे. उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै १९९८ ते ३० जून २००२ दरम्यानचा असावा. CPL- SSAपदांसाठी १९ ते २५ वर्षे. उमेदवाराचा जन्म १ जुलै १९९८ ते ३० जून २००४ दरम्यानचा असावा. असिस्टंट कमांडंट – लॉ एन्ट्री ब्रँचसाठी २१ ते ३० वर्षे. उमेदवाराचा जन्म १ जुलै १९९३ ते ३० जून २००२ दरम्यानचा असावा. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे; क्र. १ ECGD ICGकिंवा आर्मी/ नेव्ही/ एअरफोर्समधील कर्मचारी – ५ वर्षे; पद क्र. २ CPL/ SSA, पद क्र. ३ AC Tech ICG कार्यरत कर्मचारी ५ वर्षे)

निवड पद्धती – स्टेज-१ – (CGCAT) कॉम्प्युटर बेस्ड स्क्रीनिंग टेस्ट देशभरातील विविध केंद्रांवर डिसेंबर २०२३ मध्ये घेतली जाईल. MCQ पॅटर्न १०० प्रश्न, ४०० गुणांसाठी, वेळ २ तास. (प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.)

लॉ ब्रँच वगळता सर्व ब्रँचेसमधील पदांसाठी – (१) इंग्लिश, (२) रिझिनग अॅण्ड न्यूमरिकल अॅबिलिटी, (३) जनरल सायन्स अँड मॅथेमॅटिक्स अॅप्टिटय़ूड, (४) जनरल नॉलेज प्रत्येकी २५ प्रश्न.

स्टेज-२ प्रीलिमिनरी सिलेक्शन बोर्ड (PSB) (मुंबई/ गोवा, नॉयडा, चेन्नई आणि कोलकता केंद्र) – CGCAT परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची प्रीलिमिनरी सिलेक्शन एक्झामिनेशन जानेवारी, २०२४ मध्ये घेतली जाईल. (कॉम्प्युटराईज्ड, कॉग्निटिव्ह बॅटरी टेस्ट (CCBT) (ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टसाठी फक्त इंग्रजी माध्यम असेल.) आणि पिक्चर परसेप्शन अॅण्ड डिस्कशन टेस्ट (PP & DT) (उमेदवारांना हिंदीमधून बोलण्याची मुभा असेल.) यांचा समावेश असेल. ही फक्त पात्रता स्वरूपाची असेल. फोटो आणि बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणी PSB केंद्रावर केली जाईल.

स्टेज – ३ फायनल सिलेक्शन बोर्ड (FSB) फायनल सिलेक्शन – जानेवारी ते एप्रिल, २०२४ दरम्यान CGSB नॉयडा केंद्रावर (कालावधी ५ दिवस) होईल, ज्यात सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप टास्क आणि पर्सोनॅलिटी टेस्ट यांचा समावेश असेल.) अॅप्टिटय़ूड टेस्ट फक्त इंग्रजी माध्यमातून घेतल्या जातील.

स्टेज-४ – मेडिकल एक्झामिनेशन – स्पेशल मेडिकल बोर्ड (SMB) (जानेवारी ते मे २०२४) यातून अनफिट ठरलेल्या उमेदवारांना ४२ दिवसांच्या आत DGAFMS कडे डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल सव्र्हिसेस/ CGHQ मार्फत अपिल करता येईल. स्टेज-५ – स्टेज-१ व स्टेज-३ मधील एकत्रित गुणवत्तेनुसार ऑल इंडिया गुणवत्ता यादी बनविली जाईल.

अजा/ अजच्या उमेदवारांना स्टेज-१ (CGCAT) करिता जाण्या-येण्याचे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचे तिकिटाचे/ बसच्या तिकिटाचे पैसे परत केले जातील. त्यांना ICG वेबसाईटवरून Travel Form डाऊनलोड करून कउॅ कडे सुपूर्द करावा लागेल.

स्टेज-२ ( PSB)/स्टेज-३ (FSB) करिता जाण्या-येण्याचे रेल्वेच्या AC III/ Chair Car/ बसच्या तिकीटाचे पैसे परत केले जातील. FSB करिता पहिल्यांदाच बसणाऱ्या उमेदवारांनाच असे प्रवासाचे पैसे परत केले जातील. (ही अट अजा/ अजसाठी लागू नाही.)

वेतन – असिस्टंट कमांडंट पदाकरिता वेतन ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाप्रमाणे पे-लेव्हल – १० (मूळ वेतन रु. ५६,१००/- अधिक इतर भत्ते). अंदाजे वेतन दरमहा रु. १.०५ लाख, नाममात्र भाडे (लायसन्स फी) घेवून उमेदवारांना शासकीय निवास दिला जाईल.

ट्रेनिंग – इंडियन नेव्हल अॅकॅडमी इझिमाला, केरळ येथे निवडलेल्या उमेदवारांना जून, २०२४ पासून सुरू होणाऱ्या २२ आठवडय़ांच्या नेव्हल ओरिएंटेशन कोर्स ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. त्यांचा १.२५ कोटी रुपयांचा विमा उतरविला जाईल.

अंतिम निवड यादी जून, २०२४ च्या मध्यावर इंडियन कोस्ट गार्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. पात्रता/ निवड पद्धती इत्यादी विषयी शंकासमाधानासाठी ई-मेल/फोन नं. स्टेज-१, स्टेज-२ (सुरू होईपर्यंत), ४ व ५ साठी dte- rectofficer@indiancoastguard. nic. in, फोन नं. ०१२०-२२०१३४०.
स्टेज २ व ३ साठी fsb- noida@indiancoastguard. nic. in, फोन नं. ०१२०-२२०१३१६. ऑनलाइन रजिस्ट्रेशन/फी भरणे/ई-अॅडमिट कार्डविषयी शंकासमाधानासाठी icg- officers@cdac. in, फोन नं. ०२०-२५५०३१०८/१०९.

परीक्षा केंद्र – उमेदवाराने एकूण ५ परीक्षा केंद्रां (शहर) साठी पसंतीक्रम देणे आवश्यक. आपल्या रहिवासापासून ३० कि.मी. अंतराच्या आतील असलेल्या केंद्रास पहिला पसंतीक्रम द्यावा; तसे ३० कि.मी. अंतराच्या आतील केंद्र नसल्यास नजिकच्या परीक्षा केंद्रास प्रथम पसंती द्यावी. जर उमेदवारांनी या सूचनेप्रमाणे परीक्षा केंद्राची प्रथम पसंती दिली नसेल तर कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारी रद्द केली जाईल.

अॅडमिट कार्ड – उमेदवारांना स्टेज-१ साठीचे परीक्षा केंद्र ‘Candidates Log- in’ वर परीक्षेपूर्वी किमान १० दिवस अगोदर ICG च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेपूर्वी २-३ दिवस अगोदर ई-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याविषयीची सूचना रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर पाठविली जाईल. अर्जाचे शुल्क – रु. २५०/-. (अजा/ अज उमेदवारांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज www. joinindiancoastguard. cdac. in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जासोबत (१) लाईट बॅकग्राऊंडमधील रंगीत फोटो (चष्मा न घालता काढलेला) (फोटो काढताना काळय़ा पाटीवर उमेदवाराने आपले नाव आणि फोटो काढल्याचा दिनांक पांढऱ्या खडूने लिहून पाटी छातीसमोर धरावी.) (२) सिग्नेचर. (३) डाव्या, उजव्या हाताच्या अंगठय़ाचे ठसे. (४) जन्मतारखेचा पुरावा म्हणून १० वीचे गुणपत्रक. (५) आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधारकार्ड किंवा वोटर आयडी किंवा पासपोर्ट किंवा ड्रायिव्हग लायसन्स. (६) उमेदवार ICG किंवा माजी सैनिक असल्यास सव्र्हिस सर्टिफिकेट. (७) उंचीमध्ये सवलत मागणाऱ्या उमेदवारांनी डोमिसाईल सर्टिफिकेट (रेसिडेंट सर्टिफिकेट चालत नाही.) स्कॅन करून (jpeg format) अपलोड करणे आवश्यक.

(उत्तरार्ध)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity indian coast guard recruitment of candidates degree examination amy

First published on: 06-09-2023 at 02:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×