सुहास पाटील भारतीय नौसेना (Indian Navy) (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) वेस्टर्न नेव्हल कमांड (WNC) मुंबई, ईस्टर्न नेव्हल कमांड (ENC) विशाखापट्टणम, सदर्न नेव्हल कमांड (SNC) कोची, अंदमान-निकोबार कमांड (anc) पोर्ट ब्लेअर या नेव्हल कमांड मुख्यालयांतर्गत जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप-बी आणि ग्रुप-सीमधील पदांच्या भरतीकरिता इंडियन नेव्ही सिव्हिलियन एन्ट्रन्स टेस्ट INCET - ०१/२०२४ घेणार आहे. एकूण रिक्त पदे - ७४१. (I) ग्रुप-सी मधील रिक्त पदांचा तपशील - (१) फायरमन : एकूण ४४४ पदे (ANC - ४८, SNC - ६०, ENC - ९९ WNC- २३७ पदे) . पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेकडील फायर फायटींग कोर्स. इष्ट पात्रता : अवजड वाहन (HMV) चालविण्याचा परवाना उमेदवाराकडे असावा. शारीरिक मापदंड : उंची - १६५ सें.मी. (अनुसूचित जमातीसाठी १६२.५ सें.मी.); छाती - ८१.५-८५ सें.मी.; वजन - किमान ५० कि.ग्रॅ.; दृष्टी - ६ सहनशक्ती चाचणी (Endurance Test) : (i) ६३.५ कि.ग्रॅ. वजनाचा माणूस उचलून १८३ मीटर अंतर ९९ सेकंदांत पार करणे. (Fireman Lift) (ii) २.७ मीटर रुंदीचा खंदक (ditch) उडी मारून पार करणे. (लांब उडी मारून दोन्ही पायांवर उतरणे.) (iii) हाता-पायांचा वापर करून ३ मीटर उंचीच्या दोरावर चढणे. चष्मा घालणारे, तिरळ्या डोळ्यांचे आणि रंगांधळेपणा असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. (२) फायर इंजिन ड्रायव्हर : ५८ पदे (ANC - १६, ENC - ३१, WNC, मुंबई - ११ पदे) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन (HMV) चालविण्याचा परवाना. शारीरिक मापदंड आणि सहनशक्ती चाचणीचे निकष पद क्र. १ (फायरमन) प्रमाणे. (३) ट्रेड्समन मेट : १६१ पदे (ईस्टर्न नेव्हल कमांड - १५ पदे, सदर्न नेव्हल कमांड - ११ पदे, वेस्टर्न नेव्हल कमांड - १३५ पदे) (१३ पदे माजी सैनिकांसाठी राखीव) (६ पदे दिव्यांग कॅटेगरी VH - २, HH - १, OH - १, Others - २ साठी राखीव). पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट. पात्र आयटीआय ट्रेडची यादी जाहिरातीमधील Annexure- I मध्ये दिलेली आहे. जसे की, कारपेंटर, COPA, सिव्हील इंजिनिअर असिस्टंट, सेंट्रल एअर कंडिशन प्लांट मेकॅनिक, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, डोमॅस्टिक पेंटर, ड्राफ्ट्समन सिव्हील, कटींग अँड Sewing, ड्रेस मेकींग, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फिटर, फाऊंड्रीमॅन, इंडस्ट्रियल पेंटर, ICTSM, IT, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, लिफ्ट अँड एस्कलेटर मेकॅनिक, लेदर गुड्स मेकर, मशिनिस्ट, मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट), मरिन इंजिन फिटर, मरिन फिटर, मेसॉन (बिल्डींग कस्न्ट्रक्टर), मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर वेहिकल, मेकॅनिक ट्रक्टर, पेंटर (जनरल), प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन, शीट मेटल वर्कर, सर्व्हेअर, टूल अँड डाय मेकर, टर्नर, वेल्डर, वायरमन इ. (एकूण ६४ ट्रेड्स) (४) ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) : २ पदे. पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) २ वर्षं कालावधीचा आयटीआय ड्राफ्ट्समनशिप सर्टिफिकेट किंवा ३ वर्षांची अॅप्रेंटिसशिप आणि AutoCAD कोर्स. (५) पेस्ट कंट्रोल वर्कर : १८ पदे (SNC - १; WNC - १७) पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि हिंदी किंवा स्थानिय भाषा उमेदवारास अवगत असावी. (६) मल्टि टास्किंग स्टाफ : SNC - १६ पदे. पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण किंवा (ii) आयटीआय ट्रेड सर्टिफिकेट. (७) कुक : ९ पदे (SNC) (१ पद दिव्यांग कॅटेगरी VH साठी राखीव). पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव. (II) ग्रुप-बी मधील रिक्त पदांचा तपशील : (१) चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप) : १ पद (खुला). पात्रता : B. Sc. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स) विषयांसह उत्तीर्ण किंवा केमिकल इंजिनिअरींग डिप्लोमा. (२) चार्जमन (फॅक्टरी) : १० पदे. पात्रता : बी.एस्सी. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स) विषयांसह उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनिअरींग डिप्लोमा. (३) चार्जमन (मेकॅनिक) : १८ पदे. पात्रता : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अॅश्युरन्स टेस्टींग, प्रोडक्शन ऑफ इंजिनीअरिंग इक्विपमेंट्स कामाचा २ वर्षांचा अनुभव. (४) सायंटिफिक असिस्टंट : ४ पदे. पात्रता : B. Sc. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ओशियानोग्राफी) आणि (i) मटेरियल (मेटल, अलाईज, रबर) अॅनालिसिस आणि टेस्टींग टेक्निक्स किंवा (ii) मशिनरी नॉईस आणि व्हायब्रेशन मूव्हमेंट्स, अॅनालिसिस आणि रिडक्शन टेक्निक्स किंवा (iii) केमिकल अॅनालिसिस ऑफ ऑईल, ल्युब्रिकंट्स इलेक्ट्रोलाईट आणि वॉटर इ. किंवा (v) स्टडी अँड अॅनालिसिस ऑफ करोजन प्रोसेस अँड मिरिएशन टेक्निक्समधील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा : (दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी) चार्जमन (अॅम्युनिशन वर्कशॉप) चार्जमन फॅक्टरी/ ट्रेड्समन मेट/ पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक, मल्टि टास्कींग स्टाफ (मिनिस्ट्रीयल), ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शन पदांसाठी १८ ते २५ वर्षे; फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर पदांसाठी १८ ते २७ वर्षे; चार्जमन (मेकॅनिक), सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी - १८ ते ३० वर्षे. सर्व पदांसाठी उच्च पात्रताधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. वेतन : चार्जमन/ सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी पे-लेव्हल - ६ रु. ३५,४००/- मूळ वेतन + रु. १७,७००/- डीए + इतर भत्ते. ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) : पे-लेव्हल - ४, मूळ वेतन रु. २५,५००/- + डी.ए. रु. १२,७५०/- + इतर भत्ते. फायरमन व कुक : पे-लेव्हल - २, मूळ वेतन रु. १९,९००/- + डी.ए. रु. ९,९५०/- + इतर भत्ते. फायर इंजिन ड्रायव्हर : पे-लेव्हल - ३, मूळ वेतन रु. २१,७००/- डी.ए. रु. १०,८५०/- इतर भत्ते. ट्रेड्समन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, मल्टि टास्कींग स्टाफ : पे-लेव्हल - १, मूळ वेतन रु. १८,०००/- + डी.ए. रु. ९,०००/- + इतर भत्ते. निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी (कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन) बोलाविले जाईल. ज्यात १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यासी प्रश्न हिंदी/ इंग्रजी भाषेत असतील. परीक्षेचा अभ्यासक्रम इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल www. indiannavy. gov. in या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये दिलेला आहे. (सेक्शन-ए - जनरल इंटेलिजन्स - २५ प्रश्न; सेक्शन-बी - जनरल अवेअरनेस - २५ प्रश्न, सेक्शन-सी - क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड - २५ प्रश्न, सेक्शन-डी - इंग्लिश लँग्वेज - २५ प्रश्न. एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ९० मिनिटे. गुणवत्ता यादी इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हर पदांसाठी शारीरिक मापदंड चाचणी आणि सहनशक्ती चाचणी (फक्त पात्रता स्वरूपाची) साठी बोलाविले जाईल. अर्जाचे शुल्क : रु. २९५ (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) परीक्षा केंद्र : ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक. ग्रुप-बी आणि ग्रुप-सी पदांसाठीचा अभ्यासक्रम जाहिरातीमधील पॅरा ११(सी) मध्ये उपलब्ध आहे. अॅडमिट कार्ड www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. शंकासमाधानासाठी ई-मेल - support- incet@cdac. in हेल्पडेस्क नं. ९३६१३२६१६०. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर दि. २ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. (Join Navy; Ways to join; civilian ; INCET-01/2024) ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन सूचना इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवरील जाहिरातीमधील पॅरा १३ मध्ये दिलेल्या आहेत. पॅरा १३(ङ) मधील आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. पुढील अपडेट्ससाठी उमेदवारांनी www. joinindiannavy. gov. in किंवा www. indiannavy. nic. in ही संकेतस्थळे फॉलो करावीत.