दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC Bank) (दी विदर्भ को-ऑप. बँक लिमिटेड अंतर्भूत) (शेड्यूल्ड बँक), मुंबई (Advt. No. qs/ MSCBank/२०२४-२०२५) ट्रेनी ऑफिसर्स (ज्युनियर ऑफिसर ग्रेड) आणि ट्रेनी असोसिएट पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ७५.

(१) ट्रेनी असोसिएट्स – एकूण ५० पदे.

EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा

पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) किमान ५० गुणांसह उत्तीर्ण. (उमेदवाराने १० वीची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.)

टायपिंगचे शासकीय कमर्शियल प्रमाणपत्र मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि MS- CIT सर्टिफिकेशन असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा : २१ ते २८ वर्षे.

स्टायपेंड : १२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २५,०००/- स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना ‘असोसिएट’ पदावर (वेतन दरमहा रु. ३२,०००/-) बँकेत कायम केले जाईल.

(२) ट्रेनी ज्युनियर ऑफिसर – एकूण २५ पदे.

पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) किमान ५० गुणांसह उत्तीर्ण. उमेदवाराने १० वीची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

विधी पदवी/पदव्युत्तर पदवीधारक किंवा JAIIB/ CAIIB/ MS- CIT सर्टिफिकेशन किंवा ट्रेझरी/इंटरनॅशनल बँकींग डिव्हीजनमधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

अनुभव : बँकिंग क्षेत्रातील २ वर्षांचा ऑफिसर पदावरील अनुभव. (प्राधान्याने अर्बन/ डीसीसी बँकेमधील अनुभव.)

वयोमर्यादा : (दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी) २३ ते ३२ वर्षे.

स्टायपेंड : दरमहा रु. ३०,०००/- स्टायपेंड दिले जाईल. १२ महिन्यांचा ट्रेनिंग कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना ज्युनियर ऑफिसर पदावर (वेतन दरमहा रु. ४९,०००/-) नियमित नेमणूक दिली जाईल. तत्पूर्वी ट्रेनीजना ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

निवड पद्धती : ट्रेनी असोसिएट पदांसाठी – (१) पूर्वपरीक्षा पात्रता स्वरूपाची. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील कामगिरीवर आधारित केली जाईल. पूर्वपरीक्षा १०० प्रश्न, १०० गुण, वेळ १ तास. (i) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, (ii) रिझनिंग अॅबिलिटी – ३५ प्रश्न, (iii) न्यूमरिकल अॅबिलिटी – ३५ प्रश्न, वेळ प्रत्येक टेस्टसाठी २० मिनिटे. पूर्वपरीक्षेसाठी किमान ५० कटऑफ गुण मिळविणारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील.

(२) मुख्य परीक्षा – २०० प्रश्न, २०० गुण, वेळ १५० मिनिटे. (१) जनरल अँड फिनान्शियल अवेअरनेस (क्रेडिट को-ऑपरेटिव्ह अवेअरनेससह) ४० प्रश्न, (२) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, (३) रिझनिंग अॅबिलिटी – ५० प्रश्न, (४) न्यूमरिकल अॅबिलिटी – ५० प्रश्न, (५) कॉम्प्युटर नॉलेज – २० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण.

पूर्व आणि मुख्य परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल.

मुख्य परीक्षेत किमान ५० गुण (१०० गुण) मिळविणाऱ्या उमेदवारांमधून २०० उमेदवारांची गुणवत्ता यादी बनविली जाईल जी १२ महिन्यांसाठी ग्राह्य धरली जाईल.

परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर मुख्य परीक्षा मुंबई केंद्रांवर घेतली जाईल.

ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी – ऑनलाइन परीक्षा आणि इंटरव्ह्यू.

ऑनलाइन परीक्षा (१) प्रोफेशनल नॉलेज – ४० प्रश्न, ८० गुण; (२) इंग्लिश – ४० प्रश्न, ४० गुण; (३) बँकींग अँड जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, ४० गुण; (४) क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमरिकल अॅबिलिटी – ४० प्रश्न, ४० गुण; एकूण १६० प्रश्न, २०० गुण, वेळ १२० मिनिटे.

ऑनलाइन परीक्षा इंग्रजी भाषेत घेतली जाईल. यातून पात्रतेसाठी किमान ५० गुण आवश्यक. ऑनलाइन परीक्षेतील कामगिरी, शैक्षणिक अर्हता (व्हॅलिडेशन) आणि अनुभव पाहून उमेदवार पर्सोनल इंटरव्ह्यूकरिता शॉर्टलिस्ट केले जातील. ऑनलाइन परीक्षा आणि इंटरव्ह्यूमधील एकत्रित गुणांनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर. पर्सोनल इंटरव्ह्यू मुंबई येथे घेतले जातील.

अर्जाचे शुल्क – फक्त ऑनलाइन मोडने भरावयाचे आहे. ट्रेनी असोसिएट पदासाठी रु. १,१८०/-; ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी रु. १,७७०/- (जीएसटीसह).

उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्जाचे रजिस्ट्रेशन https:// www. mscbank. com/ career या संकेतस्थळावर दि. ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत.

उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. ऑनलाइन अर्जासोबत (१) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (४.५ फूट × ३.५ सें.मी.), (२) स्वाक्षरी, (३) Left thumb impression ( on white paper with black ink), (४) Hand written Declaration स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

Story img Loader