मुंबई विद्यापीठ (UM) यांच्या आस्थापनेवरील सरकारी अनुदानित (Government Aided Posts) पुढील एकूण १५२ पदांची भरती. (१) असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट लायब्ररियन, (२) असोसिएट प्रोफेसर/डेप्युटी लायब्ररियन, (३) डिन्स ऑफ फॅकल्टीज अँड प्रोफेसर्स. (१) असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट लायब्ररियन : ७३ पदे (अजा - ९, अज - ३, विजा-अ - ४, भज-ब - २, भज-क - १, भज-ड - १, विमाप्र - २, इमाव - १९, सा.शै.मा.व. ७, ईडब्ल्यूएस - ७, खुला - २८). आरक्षित पदे : महिला ३० टक्के एकूण - २२, खेळाडू - ४, अनाथ - १, दिव्यांग - ३ (कॅटेगरी - A-१, B-१, C-१). विषयवार रिक्त पदांचा तपशिल : इकॉनॉमिक्स - ५, सोशिऑलॉजी - २, स्टॅटिस्टिक्स - ४, सायकॉलॉजी - ६, लॉ - २, मॅथेमॅटिक्स - २, केमिस्ट्री - ४, फिजिक्स - ६, हिंदी - २, हिस्ट्री - २, जीओग्राफी - ३, म्युझिक - २, लाईफ सायन्स - २, उर्दू - ४, फिलॉसॉफी - २, आर्किटेक्चर - १० (सिव्हीक्स अँड पॉलिटिक्स, आफ्रिकन स्टडीज, युरेशियन स्टडीज, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, रशियन, अरेबिक, मराठी, एज्युकेशन, सिंधी, कन्नडा, कॉमर्स, असिस्टंट लायब्ररियन, असिस्टंट प्रोफेसर (स्टुडंट्स मुव्हमेंट) प्रत्येक १ पद). पात्रता : संबंधित विषयातील मास्टर्स डिग्री किमान ५५ टक्के गुणांसह किंवा समतूल्य पॉईंट स्केलवरील ग्रेडसह उत्तीर्ण आणि नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (NET). स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट (SET), स्टेट लेव्हल इलिजिबिलिटी टेस्ट (SLET) किंवा पीएच.डी. आर्किटेक्चर विषयातील असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी बी.आर्च. किंवा समतूल्य पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव किंवा बी.आर्च. आणि आर्किटेक्चरमधील मास्टर्स डिग्री किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव. किमान पात्रता गुणांमध्ये मागासवर्गीय (अजा/ अज/ इमाव) आणि दिव्यांग आणि दि. १९ सप्टेंबर १९९१ पूर्वीचे पीएच.डी. पदवीधारक उमेदवारांना ५ टक्के गुणांची सूट. (२) असोसिएट प्रोफेसर/डेप्युटी लायब्ररियन : ५४ पदे (अजा - ५, अज - ५, विजा-अ - २, भज-ब - १, भज-क - २, भज-ड - १, विमाप्र - २, इमाव - १४, सा.शै.मा.व. ५, ईडब्ल्यूएस - ५, खुला - १२). आरक्षित पदे : महिला १५, खेळाडू - ३, अनाथ - १, दिव्यांग - २ (कॅटेगरी - अ-१, इ-१). पात्रता : संबंधित विषयातील पीएच.डी. डिग्री. (मास्टर्स डिग्रीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक) आणि किमान ८ वर्षांचा अनुभव. डेप्युटी लायब्ररियन पदांसाठी पीएच.डी. पात्रतेची आवश्यकता नाही. (३) डिन्स ऑफ फॅकल्टिज अँड प्रोफेसर्स : २५ पदे (अजा - २, अज - २, विजा-अ - १, भज-ब - १, भज-क - १, विमाप्र - १, इमाव - ६, सा.शै.मा.व. ३, ईडब्ल्यूएस - ३, खुला - ५). आरक्षित पदे : महिला ८, खेळाडू - १, दिव्यांग - १ (कॅटेगरी - अ). पात्रता : संबंधित विषयातील प्रख्यात विद्वान पीएच.डी. पात्रताधारक. ऑनलाईन अर्ज www. mu. ac. in या वेबसाईटवरील career सेक्शनमधील https:// muappointment. mu. ac. in या लिंकवर दि. ७ ऑगस्ट २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट आवश्यक त्या साक्षांकीत कागदपत्राच्या ३ संचांसह ‘ Registrar, University of Mumbai, Room No. sv, Fort, Mumbai - 400032’ यांचेकडे दि. ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत स्वीकारले जातील. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘Application for the post of ..’ असे ठळक अक्षरात लिहावे.