एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL), ओल्ड एअरपोर्ट, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००२९ ( Ref. No. AIESL/ WR- HR/2024 dt. 25.06.2024). एअरक्राफ्ट टेक्निशियन्स आणि ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन पदांची ठरावीक मुदतीकरिता करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे १००.

(१) एअरक्राफ्ट टेक्निशियन (B1)/ ट्रेनी टेक्निशियन (B1) (मेंटेनन्स अँड ओव्हरहॉल शॉप्स) ७२ पदे.

Tata Curvv
बाकी कंपन्यांची उडाली झोप, टाटाची नवी SUV येतेय बाजारात, पेट्रोल, डिझेल अन् इलेक्ट्रिक पर्यायात उपलब्ध, ‘इतकी’ मिळेल रेंज
Confusion over CrowdStrike company Falcon Sensor software update
प्रतीक्षा, खोळंबा, अपरिहार्यता! संगणकीय व्यवस्थेतील एका दोषाने जगभर गोंधळ
Microsoft, microsoft outage,
विश्लेषण : एका ‘मायक्रोसॉफ्ट’मुळे जग का कोलमडले? ‘क्राऊडस्ट्राइक’ बिघाड काय होता?
Top recharge plans with OTT subscription
Reliance Jio vs Airtel vs Vodafone Idea: एकाच रिचार्जमध्ये दोन्ही गोष्टींचा लाभ; पाहा तिन्ही कंपन्यांचे ओटीटी सबस्क्रिप्शनचे प्लॅन्स
Job Opportunity Opportunities in Rashtriya Chemicals and Fertilizers Limited
नोकरीची संधी: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेडमधील संधी
News About Cartoon Network
#RIPCartoonNetwork एक्सवर का चर्चेत आलाय हा ट्रेंड? कार्टून नेटवर्क खरंच बंद होणार?
Niva Bupa Health Insurance Proposal for IPO
निवा बूपा हेल्थ इन्शुरन्सचा ‘आयपीओ’साठी प्रस्ताव
job opportunities
नोकरीची संधी : बँक नोट पेपर मिल इंडिया प्रा.लि.मधील संधी

पात्रता – (दि. १ जून २०२४ रोजी) एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा/ DGCA मान्यताप्राप्त संस्थेकडील एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग सर्टिफिकेट (मेकॅनिकल स्ट्रीमधील) किंवा मेकॅनिकल/ एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग किंवा समतुल्य डिप्लोमा किंवा माजी सैनिकांसाठी संबंधित ट्रेडमधील DGCA मान्यताप्राप्त पात्रता.

(२) एअरक्राफ्ट टेक्निशियन (B2)/ ट्रेनी टेक्निशियन (B2) २८ पदे.

पात्रता – DGCA मान्यताप्राप्त संस्थेकडील एव्हिऑनिक्स स्ट्रीममधील अटए डिप्लोमा/सर्टिफिकेट किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ रेडिओ/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंडियन एअरफोर्समध्ये ऊॅउअ मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंडियन नेव्हीमधील DGCA मान्यताप्राप्त एअरक्राफ्ट इलेक्ट्रिकल आर्टिफिसर/एअर इलेक्ट्रिकल रेडिओ आर्टिफिसर किवा समतूल्य पात्रता,

सर्व पात्रता परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेल्या असाव्यात. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण)

दोन्ही पदांसाठी अनुभव एअरक्राफ्ट मेंटेनन्स /ओव्हर हॉल्व शॉपमधील किमान १ वर्षाचा एव्हिएशन अनुभव आवश्यक किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा ट्रेनी टेक्निशियन कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. १ जून २०२४ रोजी) खुला/ईडब्ल्यूएस ३५ वर्षे, इमाव ३८ वर्षे, अजा/अज ४० वर्षे.

कराराचा कालावधी सुरुवातीला उमेदवार ५ वर्षाच्या कालावधीसाठी नेमले जातील. त्यानंतर अकएरछ कंपनीची गरज आणि उमेदवारांची कामगिरी पाहून करार आणखी ५ वर्षांसाठी वाढविला जावू शकतो.

वेतन – एअरक्राफ्ट टेक्निशियन रु. २७,९४०/- दरमहा

स्टायपेंड ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन रु. १५,०००/- दरमहा, ज्या उमेदवारांकडे १ वर्षापेक्षा कमी अनुभव आहे, त्यांना ६ महिन्यांकरिता ट्रेनी टेक्निशियन पदावर नेमणूक दिली जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवार ५ वर्षाच्या कालावधीसाठी एअरक्राफ्ट टेक्निशियन पदावर नियमित केले जावू शकतात.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना प्री-इंटरव्यू फॉरमॅलिटिजसाठी ई-मेलद्वारे सूचित केले जाईल. उमेदवारांची निवड स्किल टेस्ट ट्रेंड टेस्ट आणि टेक्निकल असेसमेंट व पर्सोनल इंटरव्यू घेवून केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट द्यावी /लागेल.

ऑनलाइन अर्ज www. aiest. in/ Careers या संकेतस्थळावर दि. २५ जून २०२४ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह प्री-इंटरव्यू फॉरमॅलिटिजच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.